
Contents
- 1 महिलेचा खुन ? रांजणगाव एम आय डी सी परिसरातील घटना !
- 1.1 महिलेचा खुन ‘ नातेवाईकांकडे लग्नाला जायचे ‘ असे म्हणते म्हणुन ?
- 1.2 मिनाबाई न्यानेश्वर गांगुर्डे, वय -27 वर्ष ,राहणार- – गणेगाव, तालुका -शिरूर जिल्हा -पुणे ,मुळगाव – दडपिंपरी, तालुका- चाळीसगाव ,जिल्हा- जळगाव
- 1.3 ताराचंद सुकलाल मोरे, वय -26 वर्ष ,व्यवसाय – मजुरी ,राहणार- गणेगाव खालसा ,वरुडे रोड, तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे, मुळगाव -सिदवाडी, तालुका -चाळीसगाव, जिल्हा -जळगाव
- 1.4 ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे, राहणार -गणेगाव खालसा, तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे हद्दीत मुळगाव दडपिंपरी, तालुका- चाळीसगाव, जिल्हा- जळगाव.
महिलेचा खुन ? रांजणगाव एम आय डी सी परिसरातील घटना !
महिलेचा खुन ‘ नातेवाईकांकडे लग्नाला जायचे ‘ असे म्हणते म्हणुन ?
शिरुर , दिनांक 13 फेब्रुवारी 2025 : (सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
( Thanks to pixabay.com for featured Image in this content)

महिलेचा खुन केल्याची घटना रांजणगाव एम आय डी सी परिसरातील घडली आहे. महिलेचा खुन ‘ नातेवाईकांकडे लग्नाला जायचे ‘ असे म्हणते म्हणुन ? केला आहे. अशी प्राथमिक माहीती आहे. रांजणगाव एम आय डी सी पोलीस पुढील तपास करत आहेत. या घटनेने मात्र शिरुर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
महिलेचा खुन या प्रकरणातील माहिती पुढील प्रमाणे आहे—-
दिनांक – 11/02/2025 रोजी रात्री 21.00 ते दिनांक 12/02/2025 सकाळी 7.00 वाचण्याच्या दरम्यान ही घटना घडली आहे. गणेगाव , तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत ही घटना घडली आहे. तेथे सुभाष बाबू काळे यांचा जमीन गट क्रमांक 333/4 आहे. त्यातील मोकळ्या जागेत कोपीमध्ये आरोपी व त्याची पत्नी रहात होते.
Read more >>
महिलेचा खुन नातेवाईकांकडे लग्नाला जाण्यास नकार दिला म्हणुन ?
आरोपी ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे, राहणार -गणेगाव खालसा, तालुका- शिरूर जिल्हा – पुणे हद्दीत मुळगाव- दडपिंपरी, तालुका- चाळीसगाव, जिल्हा -जळगाव याने त्याची पत्नी हिला ठार मारले आहे. तिने नाशिक येथे त्यांच्या नातेवाईकांच्या लग्नास जाण्यास नकार दिल्याचा राग मनात धरला. तिला आरोपीने रस्सीने लोखंडी बांबुला बांधून गळा आवळला. तिला जीवे ठार मारून खून केला. ‘महिलेचा खुन’
अशी मयताचा चुलत भाऊ ताराचंद सुखलाल मोरे यांनी फिर्यादी रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन मधे दिली आहे . आरोपी ज्ञानेश्वर गांगुर्डे याच्यावर विरुद्ध कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात करण्यात आला आहे .
Read more >>
रांजणगाव एम आय डी सी पोलिसांचा ‘करेक्ट गेम’! ‘डिझेल चोरां’च्या टोळीचा केला पर्दाफाश !(पहा व्हिडिओसह)
मयत महिला — –
मिनाबाई न्यानेश्वर गांगुर्डे, वय -27 वर्ष ,राहणार- – गणेगाव, तालुका -शिरूर जिल्हा -पुणे ,मुळगाव – दडपिंपरी, तालुका- चाळीसगाव ,जिल्हा- जळगाव
रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन मधे आरोपीवर गुन्हा रजिस्टर नंबर -43/2025 असा आहे . आरोपीवर भारतीय न्याय संहीता कायदा कलम 103 (1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more>>
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
फिर्यादी- —
ताराचंद सुकलाल मोरे, वय -26 वर्ष ,व्यवसाय – मजुरी ,राहणार- गणेगाव खालसा ,वरुडे रोड, तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे, मुळगाव -सिदवाडी, तालुका -चाळीसगाव, जिल्हा -जळगाव
वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी घटना स्थळी भेट दिली आहे. घटनास्थळी भेट दिलेले अधिकारी माननीय उपविभागीय अधिकारी, शिरूर विभाग,
पोलीस निरीक्षक, प्रभारी अधिकारी रांजणगाव एमआयडीसी इ. आहेत.
आरोपी–
ज्ञानेश्वर आत्माराम गांगुर्डे, राहणार -गणेगाव खालसा, तालुका -शिरूर, जिल्हा -पुणे हद्दीत मुळगाव दडपिंपरी, तालुका- चाळीसगाव, जिल्हा- जळगाव.
दाखल अधिकारी श्री. अशोक चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक, रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन हे आहेत.
Read more >>
महिलेच्या खुनाचा तपास रांजणगाव एम आय डी सी पोलिसांकडे—
पुढील तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी मुंडे हे आहेत.आरोपी हा गुन्हा करून फरार झालेला आहे. पोलीस स्टेशन कडील अधिकारी व डीबी पथक यांच्या मार्फत परिसरात शोध सुरू आरोपी अटक करण्याची व पुढील तपास करण्याची दक्षता ठेवली आहे.
अशी माहिती श्री. ममहादेव वाघमोडे, पोलीस निरीक्षक , रांजणगाव पोलीस ठाणे यांनी दिली आहे.