
Contents
- 1 माईलस्टोन फेस्टिवल 2025 मधे लगानग्यांनी विविध गुण दर्शनाद्वारे जिंकली प्रेक्षकांची मने ! ( पहा व्हिडिओ सह. ..)
- 1.1 माईलस्टोन फेस्टिवल 2025 कारेगाव येथे वरिष्ट पोलिस अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत पडले पार !
- 1.1.1 शिरुर , दिनांक 13 फेब्रुवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 माईलस्टोन फेस्टिवल 2025 कारेगाव मधे संपन्न —
- 1.1.3 माईलस्टोन फेस्टिवल 2025 : श्रेय जाते ते राजाराम सोनवणे व सौ. सोनवणे यांना !
- 1.1.4 माईलस्टोन फेस्टिवल 2025 हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम !
- 1.1.5 माईलस्टोन फेस्टिवल 2025 मधे वरिष्ट पोलिस अधिकारी व मान्यवर उपस्थित !
- 1.1.6 About The Author
- 1.1 माईलस्टोन फेस्टिवल 2025 कारेगाव येथे वरिष्ट पोलिस अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत पडले पार !
माईलस्टोन फेस्टिवल 2025 मधे लगानग्यांनी विविध गुण दर्शनाद्वारे जिंकली प्रेक्षकांची मने ! ( पहा व्हिडिओ सह. ..)
माईलस्टोन फेस्टिवल 2025 कारेगाव येथे वरिष्ट पोलिस अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत पडले पार !
शिरुर , दिनांक 13 फेब्रुवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
माईलस्टोन फेस्टिवल 2025 मधे लगानग्यांनी विविध गुण दर्शनाद्वारे प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. हे माईलस्टोन फेस्टिवल 2025 कारेगाव येथे वरिष्ट पोलिस अधिकारी व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. हा वार्षिक स्नेहसंमेलन, पारितोषिके वितरण आणि विद्यार्थांचे विविध गुणदर्शन यांसह रंगारंग असा कार्यक्रम झाला. तो पाहण्यासाठी कारेगाव चे नागरीक ,पालक,विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहिले. यावेळी या माईलस्टोन इंटरनेशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांनी गाणी ,नृत्य इ.कार्यक्रम अफलातुन सादर करत सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.
Read more>>
चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयात दि. २७-२८ डिसेंबर २०२४ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन !
विद्याधाम प्रशाला शिरुर चे पाच विद्यार्थी आंतरशालेय बुद्धीबळ स्पर्धेसाठी जिल्हा स्तरावर निवड !
माईलस्टोन फेस्टिवल 2025 कारेगाव मधे संपन्न —
Memories are Tresures असे म्हटले जाते. आठवणी या संपत्तीसारख्या असतात. त्यात अगदी बालवयातील , प्राथमिक शाळा आणि त्या शाळेतील झालेले वार्षिक स्नेहसंमेलन हे जवळ जवळ सर्वांच्या वाट्याला येते ! ते आयुष्यभर आठवणीत राहते. या प्रसंगांमधील घटना आणि मित्र ,मान्यवर कायम लक्षात राहतात. हे नक्की !
माईलस्टोन फेस्टिवल 2025 हे माईलस्टोन इंटरनेशनल स्कूल व माणिकचंद ताराचंद ओस्तवाल प्री प्रायमरी स्कुल यांनी संयुक्तपणे आयोजित केले होते. ते कारेगाव, तालुका – शिरुर , जिल्हा – पुणे या ठिकाणी पार पडले. ही रांजणगाव एम आय डी सी परिसरातील एक वसाहत आहे. आम्ही नेहमी रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन च्या हददीतील बातम्या सत्यशोधक न्युज मधुन देत असतो. आता मात्र ताणविरहित अशी ही बातमी देताना आम्हाला आनंद होत आहे.
Read more>>
शिक्षणाचा खेळ खंडोबा थांबवा नाही तर ‘ खाली डोके वर पाय’ ? का? आणि कुणाचे करणार?…
माईलस्टोन फेस्टिवल 2025 : श्रेय जाते ते राजाराम सोनवणे व सौ. सोनवणे यांना !

आम्ही स्वतः या प्रसंगी उपस्थित राहुन बातमी कव्हर करत असताना या शाळेतील मुलांनी जे विविध गुणदर्शन कार्यक्रम केले. ते पाहुन मंत्रमुग्धच झालो खरे !
या माईलस्टोन फेस्टिवल 2025 या कार्यक्रमाचे श्रेय खरे जाते ते मुख्याध्यापक राजाराम सोनवणे व सौ.सोनवणे यांना ! त्यांनी सर्व कार्यक्रमाची आखणी , सादरीकरण आणि सुत्रसंचलन केले. हा कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचे आई, वडील ,पालक ,मित्र ,मैत्रीणी, कारेगाव मधील नागरीक आणि पर प्रांतीय लोकही सहभागी झालेले दिसले.
Read more>>
AI अर्थात आर्टिफिशल इंटेलीजेंस, कृत्रीम बुद्धिमत्ता म्हणजे काय आहे.
माईलस्टोन फेस्टिवल 2025 हा वार्षिक स्नेह संमेलनाचा कार्यक्रम !

माईलस्टोन फेस्टिवल 2025 हा वार्षिक स्नेहसंमेलन, विविध गुण दर्शन, पारितोषिके वितरण असा भरगच्च कार्यक्रम होता. दिनांक
12 फेब्रुवारी , बुधवार सायंकाळी 5 वाजता कार्यक्रमाची सुरुवात झाली.
Read more>>
चॅरिटेबल ट्रस्ट, ‘ममता’ कडून शिरुरमधे गरीब ,निराधार व होतकरु विद्यार्थ्यांना मदतीचा हात !
माईलस्टोन फेस्टिवल 2025 मधे वरिष्ट पोलिस अधिकारी व मान्यवर उपस्थित !
यावेळी माणिकचंद ताराचंद ओस्तवाल चे
सुनिल शेठ ओस्तवाल,अध्यक्ष माणिकचंद ताराचंद ओस्तवाल प्री प्रायमरी स्कुल, , संदिप पवार ,
बाळकृष्ण कळमकर ,पोलीस अधिकारीमहादेव वाघमोडे ,किसनराव खोडदे ,नाथाभाऊ शेवाळे,तात्यासाहेब सोनवने, नाथाभाऊ शिवराम पाचर्णे,वृशालीताई गवारे,निर्मला ताई नवले,मिनाताई गवारे,मोहनशेठ नवले,प्रकाश गवारे, योगेश पाचंगे ,पोपटराव पाचर्णे ,प्रशांत ढोले, संदेश केंजळे ,रघुनाथ राव पवार ,विश्वास आबा कोहकडे,विजय दुगड,विठोबा निंबाळकर,तुषार नवले,पुष्पलता ओस्तवाल ,तुळशीदास दुंडे, राहुल गवारे ,प्रविण ओस्तवाल ,शकील मनियार,
अनिल सोनवणे तसेच सत्यशोधक न्युज चे संपादक डॉ. नितीन पवार हे उपस्थित होते.
या मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थांना प्रमाण पत्र, स्मरण चिन्ह देण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी भोजनाचा आस्वादही सर्वांनी घेतला.
1 thought on “माईलस्टोन फेस्टिवल 2025 मधे लगानग्यांनी विविध गुण दर्शनाद्वारे जिंकली प्रेक्षकांची मने ! ( पहा व्हिडिओ सह. ..)”