
Contents
- 1 कफे चालकावर गुन्हा दाखल : कफे मधे मुला मुलींना, ‘ खास ‘ पार्टिशन?
- 1.1 कफे चालकावर गुन्हा दाखल केलेल्या कफे चे नाव THE STEAM ROOM !
- 1.1.1 शिरुर , दिनांक, 14 फेब्रुवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )
- 1.1.2 ‘ मामा वडापाव द्याना घेऊन .आज काहीच खायला नाही ‘—
- 1.1.3 काही एच आय व्ही ग्रस्त?
- 1.1.4 ‘ निसंकोच सज्जन कुटुंबेही इथे आहेत ‘—
- 1.1.5 ‘कामातुरा ना भय ना लज्जा ‘ —
- 1.1.6 शिरुर पोलिस निरीक्षकांची एक्शन —
- 1.1.7 THE STEAM ROOM इंग्लिश नाव ?
- 1.1.8 About The Author
- 1.1 कफे चालकावर गुन्हा दाखल केलेल्या कफे चे नाव THE STEAM ROOM !
कफे चालकावर गुन्हा दाखल : कफे मधे मुला मुलींना, ‘ खास ‘ पार्टिशन?
कफे चालकावर गुन्हा दाखल केलेल्या कफे चे नाव THE STEAM ROOM !
शिरुर , दिनांक, 14 फेब्रुवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )

कफे चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . कफे मधे मुला मुलींना, ‘ खास ‘ पार्टिशन (? ) करुन दिले होते. साध्या वेशात शिरुर पोलिसांनी स्टिंग आॅपरेशन करत कफे चालकावर गुन्हा दाखल केला आहे. कफे चे नाव THE STEAM ROOM असे आहे. ते शिरूर शहरातील रेव्हेन्यू कालनी येथे आहे. अशी ताजी बातमी रात्री उशिरा सत्यशोधक न्युज ला प्राप्त झाली आहे. अशा या लिंगपिसाट मुले ,मुली, स्री,पुरुष यांबाबतच्या बातम्या सत्यशोधक न्युज ने दिल्या होत्या. पण परिणाम फारसा झाला नव्हता. अर्थातच हे हिमनगाचे फक्त दिसणारे टोक आहे. ‘पाण्याखालील दोन तृत्यांश भाग शोधणे हे पोलिसांचे काम आहे.
Read more>>
रात्रीस खेळ चाले…..’ या बातमीनंतर येत आहे आणखीन माहिती उघडकीस ? ( पहा व्हिडीओ सह)
‘ मामा वडापाव द्याना घेऊन .आज काहीच खायला नाही ‘—
शिरुर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांना गुप्त सोर्सेस कडुन माहिती मिळाली. शिरुर शहरात अनेक कफे चालकांनी आपल्या कफे मधे ‘ रंगेल ‘ व तत्सम शौकिनांसाठी ‘खास’ पार्टिशन केलेले आहेत. त्यामधे तरुण , तरुणी , बाया ( पण पंजाबी ड्रेस घातल्याने ) ,मुली दिसतात . वय कमी दिसते .काही गरीबीचे नाटक करुन ,’ मामा वडापाव द्याना घेऊन .आज काहीच खायला नाही ‘ असे सांगुन प्रथम ओळख करुन घेतात. नंतर वारंवार पैसे मागतात. ‘बाहेर’ येण्याचे अमिश दाखवतात. पाचशे रूपये घेतात. तुम्ही पुढे चला. मी मागुन ‘त्या’ ठिकाणी येते.’ असे सांगुन पैसे घेवून पळ काढतात.तर काही खरोखरच जातात.तर काही शहरातील लाज वर बेकायदा वेश्या म्हणुन काम करतात. काहींनी पारनेर हददीतील लाज व एक कुरुंदकडे जाणार्या एका लाज/हाटेल व सतरा कमीनीलगतचे एक लाज गाठुन बेकायदा वेश्या व्यवसाय करतात.अशी माहिती आहे.
Read more>>
शिरुर च्या नदीकाठी आरामात गांजा ओढत होते ; पण नियतीला हे मंजुर नव्हते ! कसे ते वाचा…
काही एच आय व्ही ग्रस्त?
यातील काही एच आय व्ही ग्रस्त आहेत.अशी माहिती देखील तेथेच राहणारे इतर तरुण लोक देतात.वरील पाचशे रूपये वाला ,: शौकीन ‘ याने हा प्रकार सत्यशोधक न्युज ला काही दिवसांपूर्वी सांगितला होता. पण तो काहीच करु शकत नव्हता. कारण तो ही बेकायदा काम करत होता. आणि वर इज्जतीचा प्रश्न ! बारीक तोंड करून तो निघुन गेला.बाई पाचशे रूपये घवुन पसार ! याचे केंद्र जवळची झोपडपट्टी आहे. असे दिसते.तिथे ‘काही’ हे काम करत असल्याचे तेथीलच काही लोक सांगतात.तर काहींना नातेवाईकच हे करायला सांगतात.बहाणा नवरा दारुडा आहे. विधवा झाली आहे. आमच्यात अशी पद्धतच आहे.असे सरळपणे निर्लज्जपणे सांगतात. पण पैसा, वर खायला ! आणि ‘ते ‘ पण! मग त्याची चटक लागली असल्याचेही त्यांचे इतर दोस्त सांगतात.
‘ निसंकोच सज्जन कुटुंबेही इथे आहेत ‘—
काही नि:संकोच सज्जन कुटुंबे इथे आहेत. त्यांच्या मुला मुलींची लग्ने ठरायला समस्या निर्माण होतात. म्हणुन खास महिला पोलिस लावुन यांना पोलिसी खाक्या दाखवला जाण्याची आवश्यकता आहे. एक केस तर अशी सांगितली गेली आहे की ,’ हे मुल (जे कडेवर मुद्दाम घेतलेले असते.) ते तुझेच आहे.असा आरोप पोलिस स्टेशन ला देईन ! नाहीतर पैसे दे ‘! असे ब्लॅकमेल करणे चालु आहे. अशी माहिती एकाने सांगितली आहे. पिडीत भाजी बाजार येथील आहे.असे समजते ! म्हणुन यांचा पुर्ण बंदोबस्त करावा,अशी मागणी नागरीक सत्यशोधक न्युज जवळ करतात.
शिरुर मधे ‘रात्री खेळ चाले’! शासकीय आवारामध्ये रात्री अपरात्री काय चालते? ते वाचा ….
Read more>>
‘कामातुरा ना भय ना लज्जा ‘ —
तर या पार्टीशन चा आधार घेऊन आत ‘काहीतरी’ (?) करतात. कफे चालकांना इंटरेस्ट अर्थात पैशाशी असतो. तेथे एक प्रकारे ‘जागा’ उपलब्ध करुन ते देतात. याला साध्या भाषेत ,’ दलाली’ म्हणतात. तर ZP भाषेत ,’ भाग खाणे ‘ म्हणतात .ते ‘ कार्य’ हे लोक पैशासाठी करतात. कार्ल मार्क्स ने आर्थिक प्रेरणा म्हणुन सर
वात प्रभावी मानवी प्रेरणा आहे. असा सिद्धांत मांडुन दोनशे वर्ष उलटली आहेत. पण मार्क्स तत्वज्ञ होते. तत्व दिर्घकालीन सत्य असतात. शिवाय सिगमंड फ्राईडने ,’ काम/लैंगिक प्रेरणा मानवी जीवनात फार महत्त्वाची असते. असा सिद्धान्त मांडला. त्यालाही जवळपास दोनशे वर्ष उलटुन गेली ‘आहेत. आता या दोन्ही प्रेरणा नव्या काळात बाजारु नफेखोर व्यवस्थेने व्यक्तीच्या उफाळुन वर काढायला सुरुवात केली. प्राचीन संस्कृत मधे म्हण आहे. ,’ कामातुरा ना भय ना लज्जा ‘ ! असा हा प्रकार आहे.
शिरुर पोलिस निरीक्षकांची एक्शन —

तर साहेबांना ही माहिती मिळाली. जर काही बेकायदेशीर असेल तर पोलिसांनी त्यात लक्षात घातलेच पाहिजे. नाहीतर समाजाचे एकुण स्वास्थ बिघडते. पुढे जाऊन त्याचा त्रास सर्वांना होतो.
म्हणुन पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी महिला पोलिस पोलिस हवालदार जाधव , पोलिस कान्सेबल थोरात, पोलिस कान्स्टेबल शिंदे ,पोलीस कान्टेबल आव्हाड यांनी साध्या, वेशात रेव्हेन्यू कालनी येथे The Steam Room कफे मधे शिरुर, तालुका – शिरुर, जिल्हा -पुणे येथे जाऊन नाष्ट्याची आर्डर दिली. पाहणी सुरु केली. कफे चालकाला व ‘येणार्या’ लैला मजनुंना याचा थांगपत्ता लागु दिला नाही. ते आले व कफे चालकाने पार्टीशन करुन दिलेल्या जागेत बसुन अश्लील व असभ्य कृत्य करु लागले.त्याच बरोबर आणखीन काही शाळकरी मुले व मुली येथे येतात. अशी माहिती मिळाली.
Read more>>
ब्रेकिंग न्युज : अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथे?
THE STEAM ROOM इंग्लिश नाव ?
याबाबत शिरुर पोलिस स्टेशन चे कांस्टेबल रविंद्र बापुराव आढाव THE STEAM ROOM चा कफे चालक ऋषिकेश रामदास ढवळे ,वय 23 वर्ष ,राहणर- ढवळगाव , तालुका – श्रिगोंदा ,जिल्हा – अहमदनगर याच्या विरूध्द शाळकरी मुला मुलींना अश्लील वर्तन करण्यास मुभा दिल्या बद्दल गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास सहायक फौजदार श्री. साबळे हे पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
या कारवाईत वरिष्ट पोलिस अधिकारी लक्ष घालत आहेत. पोलिस अधिक्षक ,पुणे ग्रामीण श्री. पंकज देशमुख, अपर पोलीस अधिक्षक, पुणे विभाग श्री. रमेश चोपडे, उप विगागीय पोलिस अधिकारी, शिरुर विभाग श्री. प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संदेश केंजळे ,पोलीस निरीक्षक ,शिरुर, पोलिस सब इन्पेक्टर श्री. शुभम चव्हाण, पोलिस हवालदार जाधव, पोलिस अंमलदार श्री.रावडे, पोलिस अंमलदार श्री.भोई, पोलिस अंमलदार श्री.शिंदे ,पोलिस अंमलदार श्री.आव्हाड, पोलिस अमलदार श्री. थोरात यांनी ही कारवाई केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक फौजदार श्री. साबळे हे करत आहेत.
1 thought on “कफे चालकावर गुन्हा दाखल : कफे मधे मुला मुलींना, ‘ खास ‘ पार्टिशन?”