
Contents
- 1 3 लाखांचा ऊस जळाला ! कोठे व कसा ते वाचा सविस्तर पुढे. ..
- 1.1 3 लाखांचा ऊस जळाल्याची घटना शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे घडली !
- 1.1.1 शिरुर , दिनांक 14 फेब्रुवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट)
- 1.1.2 3 लाखांचा ऊस जळाला याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे–
- 1.1.3 3 लाखांचा ऊस जळाला त्याचे कारण —
- 1.1.4 आग विझविण्याचा प्रयत्न अयशस्वी —
- 1.1.5 शिरुर पोलिस स्टेशन मधे 3 लाखांचा ऊस जळाला याची जळीत म्हणुन नोंद —-
- 1.1.6 About The Author
- 1.1 3 लाखांचा ऊस जळाल्याची घटना शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे घडली !
3 लाखांचा ऊस जळाला ! कोठे व कसा ते वाचा सविस्तर पुढे. ..
3 लाखांचा ऊस जळाल्याची घटना शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे घडली !
शिरुर , दिनांक 14 फेब्रुवारी 2025 : ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट)

3 लाखांचा ऊस जळाला आहे. तो कोठे व कसा ते वाचा सविस्तर पुढे या बातमीत ! 3 लाखांचा ऊस जळाल्याची घटना शिरूर तालुक्यातील आमदाबाद येथे घडली आहे. या जळीताची नोंद शिरुर पोलिस स्टेशन मधे करण्यात आली आहे. शिरुर पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
3 लाखांचा ऊस जळाला असण्याची घटना घडल्यानंतर याची शिरुर पोलिस स्टेशन मध्ये नोंद करण्यात आली आहे.
Read more>>
मंगळसुत्र चोरीची घटना जोशीवाडीजवळ ; 2 अज्ञात चोरट्यांनी बाईकवर येवुन मंगळसुत्र खेचुन झाले लंपास !
उसतोड कामगार देतो म्हणुन 5 लाख 5 हजार रुपयांना गंडा घातला ! 420 पणा केला ! पुढे काय घडले ते वाचा.
3 लाखांचा ऊस जळाला
याची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे आहे–
शिरूर पोलीस स्टेशन अंकित टाकळी हाजी दूरक्षेत्र येथे ही खबर पिडीत व्यक्तीने स्वतः हजर राहून लिहून दिली आहे. खबर देणार प्रकाश वसंत पवार, वय -37 वर्षे, व्यवसाय -शेती ,राहणार – आमदाबाद , तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे येथे राहतात. ते वरील ठिकाणी वडील वसंत बबन पवार, पत्नी सौ. उज्वला, मुलगी आदिती असे एक एकत्रित राहतात. ते शेती करून त्यावर त्यांच्या कुंटूबाची उपजिपीका करतात . त्यांचे वडील वसंत बचन पवार , आमदाबाद ,तालुका – शिरूर ,जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत जमिन गट नं. 635/1 गट नंबर- 635/2 मध्ये होते. त्यांनी एकुण तीन एकर क्षेत्रा पैकी दीड एकर शेत जमीनी मध्ये उसाचे पिक घेतलेले होते. असून त्या उसाचे वय अंदाजे 10 ते 11 महिने इतके होते.
Read more>>
3 लाखांचा ऊस जळाला त्याचे कारण —
दिनांक 12/02/2025 रोजी सांयकाळी 64:50 वाजण्याचा सुमारास ते आमदाबाद फाटा येथे होते. त्यांना शेजारील शेतकरी राहुल रामचंद्र पवार यांचा फोन आला. त्यांनी सांगितले की, ‘ तुमच्य उसाला आग लागली आहे.’ त्यावेळी ते लगेच आमदाबाद फाटा येथून त्यांच्या शेतात गेले. त्यावेळी त्यांच्या ऊसातील क्षेत्रात आग लागली होती. इलेक्ट्रीक तारांमध्ये स्पार्किंग होवून त्याच्या ठिणग्या उसामध्ये पडत होत्या. त्यामुळेच त्यांच्या उसाला आग लागलेली होती .
Read more>>
शिरूर तालुका बारामती जिल्ह्यात जाणार ? कदापी असे होऊ दिले जाणार नाही !
आग विझविण्याचा प्रयत्न अयशस्वी —
त्यावेळी त्यांनी ते व सौ. उज्वला, वडील वसंत बबन पवार तसेच योगेश संतोष सोनवणे , राहणार- आमदाबाद या सर्वांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा संपूर्ण दीड एकर क्षेत्रातील उस जळुन गेला. एकुण अंदाजे ३०००००/-रूपयांचे आर्थिक नुकसान झालेले आहे. तरी पुढील तजविज होण्याची विंनती त्यांनी केली आहे .
Read more>>
शिरुर तालुक्यात अपघातात 43 वर्षीय इसम मृत्युमुखी तर दुसर्या घटनेत एस की बसचे 130 लिटर डिझेल चोरीला !
शिरुर पोलिस स्टेशन मधे 3 लाखांचा ऊस जळाला याची जळीत म्हणुन नोंद —-
शिरूर पोलीस स्टेशन मधे याची जळीत म्हणुन नोंद झाली आहे. नोंद नंबर – 01/2025 असा आहे.दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. बनकर हे आहेत. पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. गरकळ करत आहेत.
प्रभारी अधिकारी संदेश केंजळे , पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.