
Contents
- 1 Sudden Death Shirur of 16 years boy : 16 वर्षीय मुलाने बिल्डिंग वरुन उडी मारून केली आत्महत्या? Suicide Note सत्यशोधक च्या हाती ! ‘मोबाइल गेम्स’ चा बळी ? की आणखी काही ?
Sudden Death Shirur of 16 years boy : 16 वर्षीय मुलाने बिल्डिंग वरुन उडी मारून केली आत्महत्या? Suicide Note सत्यशोधक च्या हाती ! ‘मोबाइल गेम्स’ चा बळी ? की आणखी काही ?
Sudden Death Shirur Case मधे शिरुर पोलिस स्टेशन ला आकस्मित मृत्यु ची नोंद! पण…
शिरुर , दिनांक 16 फेब्रुवारी 2025 🙁 Satyashodhak News Report)

Sudden /Accident Death Shirur of 16 years boy : 16 वर्षीय मुलाने बिल्डिंग वरुन उडी मारून आत्महत्या (? ) करण्याची घटना शिरुर येथे घडली आहे. मात्र Suicide Note सत्यशोधक न्युज च्या हाती आली आहे. ‘मोबाइल गेम्स’ चा बळी ? की आणखी काही ? असा प्रश्न या निमित्ताने मिळालेल्या माहिती वरुन निर्मात होत आहे.
Read more >>
शिरुर जवळ 18 वर्षीय तरुण व 16 वर्षीय मुलगी बोलत चालले होते. पण पुढे काय घडले? वाचा सविस्तर !
Sudden Death Shirur Case मधे शिरुर पोलिस स्टेशन ला या घटनेची आकस्मित मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे. पण या घटनेचा तपास सखोल केला जावा.अशी अपेक्षा आहे. या घटनेला इतर आणखीन काही कांगोरे असु शकतात. मात्र केवळ 16 वर्षीय तरुण मुलगा अशा पद्धतीने मृत्युमुखी पडला. याबद्दल शिरुर शहरातील लोक हळहळ व्यक्त करत आहेत.
Satyashodhak News ने माहिती घेतली ती अशी —
1.हा मुलगा सुखवस्तु कुटुंबातील आहे.आई वडील याचे हवे ते लाड, कोडकौतुक करण्यात कधी कमी पडत नव्हते.हरिओम याला संगणक क्षेत्राची आवड असल्याने एक लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा संगणक विकत घेऊन दिला होता.
2.हरिओमला घरामधे स्वतंत्र खोली,त्याची बहिण जी चांगल या क्षेत्रात शिक्षण घेत आहे. ती शनिवार, रविवार घरी सुटीला आली होती .,’ तो स्वतः असे करुच शकत नाही’ असे ती ठामपणे सांगते.
3.हरिओम हा मोबाइल गेम खेळत असे.त्यात त्याला काही लागेल ते वडिल पुरवत होते.खर्चापाण्याची कमी नव्हती.
4.आधीच्या रात्री 11 वाजता तो वडिलांजवळ लाडाने आला.व वडिलांच्या अंगावर लाडाने पहुडला देखील ! त्यावेळी तो खुश होता.मग रात्रीत असे काय घडले?
5.Online की offline त्यावर काही दबाव होता का ?
6.5 मिनिटांचे अंतर त्याचे घर व ती बिल्डींग यांच्यामधे आहे.पहाटे लवकर ‘बाहेर जाऊन येतो.’असे त्याने आईस सांगितले.
7.गेले महा महिने तो सतत अभ्यास करुन उत्तीर्ण होण्यासाठी स्वतः ला घरात जवळ जवळ बंद करुन घेतले होते.
8.त्याने लिहिलेली चिठ्ठी केव्हा लिहिली?चपला ठेवण्याच्या स्टँडवर कधी ठेवली? हे सी सी टी व्ही मधे दिसु शकेल असे वडिल म्हणतात.
9.बहिणीला ठाम पणे वाटते की काहीतरी,कोणीतरी तिच्या भावावर दबाव आणत होते.
10.हे कुटुंब अमरावतीकडे मुलाच्या अंत्यविधीसाठी निघाले.पोलिसांशी जास्त बोलता आले नाही.
11.पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करावा.असे हरिओम याचे वडिल,आई व बहीण देखील सांगत आहेत.
Read more>>
कारला धडक : दगड व हाताने मारहाण ! एका इसमाविरुद्ध गुन्हा दाखल !
Shirur Police नी Sudden Death म्हणजे आकस्मित मृत्यु ही नोंद घाई घाईत केली ?

शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद करण्यात आल्यानुसार घटना अशी आहे. आज दिनांक खबर देणार गजानन भिमराव बाळे, वय – 46 वर्षे, धंदा- सुखवास्तु, राहणार- श्री ओम साई नगर ,गोलेगाव रोड, शिरुर , तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे
हे 16/02/2025 रोजी सकाळी 7:00 वाजण्याचा सुमारास त्यांची पत्नी निशा असे दोघे घरी होते. त्यांचा मुलगा हरीओम गजानन बाळे, वय -16 वर्षे याने ‘ मी बाहेर फिरुण येतो ‘ असे सांगुन घरातुन निघुन गेला होता. त्यानंतर सकाळी 9:30 वाजण्याचा सुमारास त्यांचा मुलगा हरीओम गजानन बाळे, वय -16 वर्षे हा घरी आला नाही.म्हणुन त्यांची पत्नी निशा हिने मुलगा हरीओम गजानन बाळे, वय -16 वर्षे याच्या फोनवर फोन केला होता.
Shirur Police Station कडुन आईला माहिती —
त्यावेळी पोलीसांनी तिला,’ तुमचा मुलगा हरीओम गजानन बाळे, वय- 16 वर्षे याने शिरुर ,तालुका – शिरुर , जिल्हा – पुणे गावच्या हद्दीत सुंदरसृष्टी समोरील मार्वलिन एम्म्पायर सोसायटी मधील नविन बिल्डींगचे काम चालु असलेल्या बिल्डींग वरून उडी मारली आहे” असे सांगितले .
Sudden Death Shirur Case मधे मुलगा बिल्डींगवर का?कधी?आणि कशासाठी गेला ?—
सदरची माहीती त्यांना पत्नी हिने फोन करून सांगितली. नंतर त्या तात्काळ तेथे गेल्या. तेथे असता तेथे पोलीस व इतर लोक जमलेले होते. त्यांचा मुलगा बिल्डींगचे खाली निपचित पडलेला होता. त्यानंतर त्याला त्यांनी अॅम्बुलन्स मधुले ग्रामीण रुग्णालय, शिरुर येथे नेले. नंतर तेथील डॉक्टरांनी त्याला तपासुन्त 19: 45 वाजण्याच्या सुमारास मुलगा हरीओम गजानन बाळे, वय -16 वर्षे ,राहणार- श्री ओमसाईनगर ,गोलेगाव रोड, शिरुर ,तालुका – शिरुर ,जिल्हा – पुणे हा मयत झालेचे घोषीत केले.
Read more>>
मोटर सायकल चोरी ची घटना :मोटर सायकल कामाठीपुर्यातील व्यक्तीची !
शिरूर पोलिस स्टेशन मधे अकस्मात मृत्यु ची नोंद करण्यात आली आहे. रजिस्टर नंबर- 15/2025 असा आहे.भारतीय न्याय संहीता कायदा कलम 194 प्रमाणे ही नोंद करण्यात आली आहे.
मृत 16 वर्षीय नाव —–
हरीओम गजानन बाळे, वय- 16 वर्षे ,राहणार – श्री .ओमसाईनगर, गोलेगाव रोड, शिरुर, तालुका, शिरुर, जिल्हा- पुणे
पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. कोथळकर हे करत आहेत. दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. शिंदे हे आहेत. प्रभारी अधिकारी संदेश केंजाळे , शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.