
Contents
- 1 Shirur Crime आता इलेक्ट्रीक मोटर चोरी चा सिलसिला सुरू !
Shirur Crime आता इलेक्ट्रीक मोटर चोरी चा सिलसिला सुरू !
Shirur Crime शिरुर तालुक्यात पाठोपाठ 2 ठिकाणी इलेक्ट्रीक मोटर चोरीच्या घटना !
Shirur 23 February 2025 , Sunday :

Shirur Crime आता इलेक्ट्रीक मोटर चोरी चा सिलसिला सुरू झाला आहे.काल मोटर सायकल चा नंबर होता. आता इलेक्ट्रीक मोटर चा नंबर आहे. सतत घडणार्या Shirur Crime मधे आज शिरुर तालुक्यात पाठोपाठ 2 ठिकाणी इलेक्ट्रीक मोटर चोरीच्या घटना शिरुर पोलिस स्टेशनमध्ये नोंद झाल्या आहेत. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत. मात्र शिरुर शहर व शिरुर तालुक्यातील नागरिकांची अशी साडेसाती काही हटताना दिसत नाही.
Shirur Crime घटना – 1
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आल्यानुसार घटना अशी की तारिख 20/2/2025 रोजी सांयकाळी 7 वाजण्याच्या ते 21/2/2025 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या दरम्यान शिरूर गावच्या हददीत पवारमळा, शिरूर, तालुका – शिरूर , जिल्हा – पुणे येथील फिर्यादी पोपट शंकर पवार , वय- 19 वर्ष , व्यवसाय- रिटायर, राहणार- पवार मळा ,शिरूर ,तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांच्या शेत जमीनीतील विहीरिवरील लक्ष्मी कंपनीची पाण्यातील इलेक्ट्रीक मोटार ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने अप्रामाणीक पणे मुददाम लबाडीचे इरादयाने चोरी करून चोरून नेली आहे.
Read more>>
रांजणगाव एम आय डी सी पोलिसांचा ‘करेक्ट गेम’! ‘डिझेल चोरां’च्या टोळीचा केला पर्दाफाश !(पहा व्हिडिओसह)
फिर्यादी 1 –
पोपट शंकर पवार, वय- 19 वर्ष ,व्यवसाय- रिटायर ,राहणार- पवार मळा ,शिरूर, तालुका- शिरूर,जिल्हा- पुणे
म्हणुन त्यांनी शिरुर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरटया विरुदध तक्रार दाखल केली आहे.
अज्ञात आरोपीवर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये
गुन्हा रजिस्टर नंबर -124/2015 असा आहे. तर भारतीय न्याय संहीता कायदा कलम 303 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अमंलदार पोलिस हवालदार श्री. मोरे हे आहेत. तर पुढील तपास अमंलदार पोलिस हवालदार श्री. कोथळकर हे करत आहेत.
Read more>>
ओला उबेर कंपणीच्या गाड्या बुक करुन चालकांना लुटणारा रांजणगांव गणपती एम आय डी सी पोलिसांनी केला जेरबंद !
—–
घटना – 2
शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आल्यानुसार घटना अशी – खालील वर्णनाच्या व किमतीच्या दिनांक – 20/02/2025 रोजी सायंकाळी 6.00 वाजण्याच्या ते दिनांक 21/02/2025 रोजी सकाळी 11.00 वाजण्याच्या दरम्यान रांजणगाव सांडस, तालुका – शिरूर, जिल्हा- पुणे येथे भीमा नदीच्या पूर्व बाजूच्या काठावर भीमाशंकर स्मशानभूमी जवळ आहे. तेथे फिर्यादी -महादेव नाथू असवले ,वय- 56 वर्ष , धंदा -शेती राहणार- कामठे वाडी ,रांजणगाव सांडस, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे हे व साक्षीदार यांच्या एकूण 5 इलेक्ट्रिक मोटारी कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडून नुकसान करून त्यातील 50 किलो वजनाच्या तांब्याच्या तारा किंमत अंदाजे 25000/- रुपये त्यांच्या व साक्षीदार यांच्या संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने चोरून नेले आहे.
फिर्यादी 2 –
महादेव नाथू असवले, वय- 56 वर्ष ,धंदा – शेती, राहणार- कामठे वाडी ,रांजणगाव सांडस, तालुका -शिरूर ,जिल्हा – पुणे.
म्हणून त्यांनी अज्ञात चोरट्यां विरुद्ध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
शिरूर पोलीस स्टेशन मधे
अज्ञात चोरटया विरुदध गुन्हा रजिस्टर नंबर-असा आहे -125/2025. तर या अज्ञात चोरटया विरुदध शिरुर पोलिस स्टेशनमध्ये कलम -303(2)324(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more>>
दाखल अमंलदार पोलीस हवालदार श्री. मोरे हे आहेत.तर पुढील तपास अमंलदार पोलिस उप निरीज्ञक श्री. बनकर हे करत आहेत. प्रभारी आधिकारी पोलिस निरीक्षक श्री.संदेश केंजळे ,शिरुर पोलिस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही गुन्ह्यांचा तपास सुरु आहे.
एकंदरीत कालची बातमी होती ती मोटर सायकल चोरीची ! चोर्यांच्या या घटना किमाण शिरुर शहर आणि शिरुर तालुक्यात काही कमी होताना दिसत नाहीत. चोरांना हे माहीत नसते. की एकदम बर्याच चोर्या उघडकीस येतात. आपण काही सुटणार नाही. पण चोरी तो करतो. कारण इथे चर्चा करण्याचे ठिकाण आता या बातमीत तरी नाही, पण काही दिवसांतच चोर पकडले जातात. शिरूर पोलीसांचा तसा इतिहास आहे. पिडीताला आर्थिक व मानसिक त्रास मात्र होतो. इतर नागरिकांच्याही अनेक वस्तूंची चोरी होत असते. ते थोडे भितीग्रस्त होत असतात. हे खरे !