
Contents
- 1 Mahashivratri 2025 Shirur: माऊलीआबा कटके फाउंडेशनच्या वतीने अल्पोपहार कार्यक्रमाचे आयोजन ! ( पहा व्हिडिओ सह)
- 1.1 Mahashivratri 2025 Shirur : श्रीराम सेना शिरुर सह पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व भाविकांचा सहभाग!
- 1.1.1 Mahashivratri 2025 Shirur : हा उत्सव दरवर्षी —
- 1.1.2 Mahashivratri 2025 Shirur : यावर्षीचे टाईम टेबल एकंदित असे—-
- 1.1.3 Mahashivratri 2025 Shirur : महत्त्व काय आहे ?
- 1.1.4 Mahashivratri 2025 Shirur निमित्तानेमहाशिवरात्रीचे जास्त महत्त्व कोनते ते पाहु–
- 1.1.5 Mahashivratri 2025 Shirur : एक प्रमुख कथा —-
- 1.1.6 Mahashivratri 2025 Shirur : मंत्र जप एक महत्त्वाचा भाग —
- 1.1.7 महत्वाची शिवमंदिरे–
- 1.1.8 महत्वाचा मंत्र —
- 1.1.9 Mahashivratri 2025 Shirur : समारोप —
- 1.1.10 About The Author
- 1.1 Mahashivratri 2025 Shirur : श्रीराम सेना शिरुर सह पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व भाविकांचा सहभाग!
Mahashivratri 2025 Shirur: माऊलीआबा कटके फाउंडेशनच्या वतीने अल्पोपहार कार्यक्रमाचे आयोजन ! ( पहा व्हिडिओ सह)
Mahashivratri 2025 Shirur : श्रीराम सेना शिरुर सह पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व भाविकांचा सहभाग!
Shirur 27 February 2025:
Mahashivratri 2025 Shirur निमित्त माऊलीआबा कटके फाउंडेशनच्या वतीने शिरुर – रामलिंग रोड वर अल्पोपहार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उत्सवात श्रीराम सेना शिरुर सह पोलिस निरीक्षक संदेश केंजळे व भाविकांचा सहभाग लक्षवेधक ठरला आहे. एकंदरच mahashivratri 2025 Shirur येथे ‘मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. दरवर्षी महाशिवरात्री उत्सव शिरुर सह रामलिंग व परिसरात मोठ्या उत्साहाने व भाविकतेने साजरा होतो. महाशिवरात्री उत्सव 2025 देखील त्याच पद्धतीने साजरा करण्यात आला आहे. यावेळी माऊलीआबा कटके फाउंडेशन, श्रीराम सेना शिरुर चे स्वप्निल रेड्डी, सुनिल जाधव व पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांचा सहभाग लक्षवेधक ठरला. शेकडो शिवभक्तांनी यात सहभाग घेतला. अल्पोपहार देखील घेतला.

Mahashivratri 2025 Shirur : हा उत्सव दरवर्षी —
26 फेब्रुवारी 2025 रोजी शिरुर परिसरात दरवर्षी प्रमाणे व साजरा होणारा महाशिवरात्री हा एक महत्त्वाचा उत्सव शिरुर शहराचे एक महत्त्वाचा सांस्कृतीक भाग बनला आहे. हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. हा दिवस शिव शंकराच्या श्रद्धेनुसार साजरा करण्यात येतो . या सणाला देशविदेशातील हिंदू भाविक उपवास करतात. भक्ती आणि समर्पणाने भगवान शिवाची प्रार्थना करत असतात . भाविक लोक शिरुर जवळील रामलिंग गावच्या मंदिरांना भेट देत असतात. तेथे शिवलिंगाची पूजा करतात. शहराची स्वतःची अशी वेगळी परंपरा आणि विधी आहेत . महाशिवरात्रीच्या या दिवशी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी ते करत असतात. या आगळ्या वेगळ्या उत्सवासाठी शिवभक्त फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला हा उत्सव साजरा करतात .
Read more>>
कॅफे काॅलेज कट्टा’ : एक नाजुक प्रेमकथा !
Mahashivratri 2025 Shirur : यावर्षीचे टाईम टेबल एकंदित असे—-
या वर्षी 26 फेब्रुवारी 2025 रोजी हा शिवरात्री उत्सव साजरा झाला. भगवान शिव यांची या महान रात्रीचे एख आध्यात्मिक महत्त्व आहे. या तारखेला चतुर्दशी तिथी सुरू होते . 26 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता चतुर्दशी तिथी संपते. नंतर 27 फेब्रुवारी 2025 ला सकाळी 8:54 संपते.यात निशिता काल पूजा असते.तिची वेळ 27 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 12:08 ते 12:58 अशी आहे. त्याचबरोबर शिवरात्री पारणाची वेळ ही 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 6:47 ते 8:54 अशी यावर्षी आहे.
या उत्हवात रात्री प्रथम प्रहार पूजा असते. तिची वेळ 26 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 6:18 ते रात्री 9:25 अशी आहे. रात्री दुसरी प्रहार पूजा असते. तिची वेळ 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 9:25 ते दुपारी 12:33 अशी आहे. त्याच दिवशी रात्री तिसर्या प्रहारी पूजा होते.ती फेब्रुवारी 27 वा रात्री 12:33 ते पहाटे ते 3:40 अशी आहे. त्याच रात्री चतुर्थ प्रहार पूजा असते. ती 3:40 ला पहाटे ते 6:47 पहाटेची अशी असते.

Mahashivratri 2025 Shirur : महत्त्व काय आहे ?
शिव भगवान यांना मानणार्या शैव पंथात हा प्रमुख सण आहे. ही महाशिवरात्री म्हणजे ” शिवांची महान रात्र ” असा याचा अर्थ आहे. फाल्गुन महिन्याच्या चौदाव्या रात्रीला ही ‘पवित्र रात्र’ असते. शिव भगवान यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी प्रखर भक्ती, उपवास, जप आणि रात्रभर जागरण केला जातो.
Read more>>
शिरुर मधे नाताळ निमित्त येशुची प्रार्थना संपन्न !
असे मानले जाते की या उत्सवात मोक्ष ( Ultimate Freedom) मिळतो. आध्यात्मिक जागृती व पाप-शुद्धीकरणासाठी ही मोठी शक्ती आहे.

Mahashivratri 2025 Shirur निमित्तानेमहाशिवरात्रीचे जास्त महत्त्व कोनते ते पाहु–
• भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वती यांचे दैवी spiritual मिलन यावेळी होते. भगवान शिव यांनी या रात्री पार्वती देवीशी लग्न केले. यावेळी महिला एकांतात ‘चांगला पती’ मिळावा म्हणून हा विधी व उपवास करतात. वैश्विक cosmos नृत्य (तांडव) हे शिव भगवान करतात.असे पवित्र मानल्या गेलेल्या ग्रंथांमध्ये नमुद आहे. भगवान शिव यांनी महाशिवरात्रीच्या रात्री तांडव नृत्य केले.ते एक वैश्विक नृत्य आहे. ते निर्माण , संचलन आणि नष्टता यांचे चक्र दर्शवते.
• मोक्ष ( liberation) आणि आध्यात्मिक जागृती ( Enlightenment) असते.यावेळी प्रार्थना आणि उपवास केल्यास भक्ताचे दुष्कर्म शुद्ध होतात आणि त्यांना मोक्ष मिळतो असे मानले जाते.
• Mahashivratri 2025 Shirur : या संध्याकाळी आकाशस्थित ग्रहांची स्थिती ध्यान आणि आध्यात्मिक उर्जेला स्फुरण देते.

Mahashivratri 2025 Shirur : एक प्रमुख कथा —-
एका परंपरेनुसार एका शिकार्याने स्वतःला एका झाडात लपून ठेवले होते. त्यावेळी न कळत अनावधानाने शिवलिंगावर बेलाची पाने फेकून शिवपूजा केली. मात्र त्याला मुक्तता मिळाली. कारण वचन पुर्ण करणे हे आहे. या दिवशी व्रत पाळले जाते.भक्त पूर्ण दिवस निर्जला विनापाणी उपवास करतात . काही लोक फक्त सात्विक अन्न खातात. उपवास हे भक्ती, स्वसंयम आणि शुद्धीचे प्रतीक मानले आहे.
Read more>>
‘अ अदानी ‘चा ही सरकारची नवी बाराखडी!: आप ची टीका !
यात रुद्र अभिषेक नावाचा विधी आहे. यात शिवलिंगाला पवित्र अर्पणांनी स्नान घातले जाते.यात गंगा जल,शांती,शुद्धी,दूध,आशीर्वाद, पोषणमध, भक्ती ,गोडवादही,आरोग्य, समृद्धी,बेलाची पाने, महत्वपुर्ण यज्ञ,चंदनाची उटी, थंड, शुद्ध पदार्थ म्हणुन असे वेगवेगळे पदार्थ असतात.
Mahashivratri 2025 Shirur : मंत्र जप एक महत्त्वाचा भाग —
रात्रभर भक्त शिव मंत्रांचा जप करतात.तसेच भक्तीसाठी पंचक्षरी मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय याचा जप करतात. संरक्षण आणि दीर्घायुष्यासाठी महा मृत्युंजय मंत्र जप करतात.
रात्रभर जागरण म्हणजे रात्री जागृत राहणे अज्ञानावर विजय मिळविण्याचे एक प्रतिक मानले आहे. मंदिरांमध्ये भाविक एकत्र येत भक्तिगीते व स्तोत्रे म्हणतात. शिवपुराण, इतर कथांचे वाचन, लिंगाष्टकम, भगवाश शिव यांच्याशी संबंधित कथा वाचतात. किंवा ऐकतात.
महत्वाची शिवमंदिरे–
सोमनाथ, केदारनाथ, उज्जैन, महाकालेश्वर काशी विश्वनाथ (वाराणसी)
या दिवशी गरीबांना अन्न, वस्त्र,दक्षिणा देणे पुण्याचे मानले जाते.
महत्वाचा मंत्र —
“ओम नमः शिवाय..!!
ओम तत्पुरुषाये विद्महे महादेवाये धीमही तन्नो रुद्र: प्रचोद्यत..!!
ओम त्रयंभकम् यजमाहे सुगंधीम् पुष्टीवर्धनम् उर्वरुकमिव बंधनं मृत्युर मुखिया ममृतत्..!!”

Mahashivratri 2025 Shirur : समारोप —
अशा प्रकारे या काही महत्वपुर्ण बाबी आहेत. महाशिवरात्री हा असा एक हिंदु परंपरेत महत्वाचा उत्सव आहे. तो शिव किंवा शंकर किंवा महेश या देवाचा आहे. भगवान शिव यांना मानणार्यांना शैव,विष्णू यांना मानणार्यांना वैष्णव म्हटले जाते. ब्रम्हा हा या त्रिदेव शिव,विष्णू यांमधील तिसरा देव आहे. या शक्तीचे प्रतिक आहेत. ब्रम्हा ब्रंमांड निर्मिती,विष्णू ब्रम्हांड संचलन व शिव ते नष्ट करणारी शक्ती यांचे प्रतिक मानले जातात.ब्रम्हांडाची उत्पति, स्थिती आणि लय असे चक्र अनादी अनंत Eternal असे चाललेले आहे.असे एक महत्त्वाचे तत्वज्ञान मागे आहे.