
Contents
- 1 Ambale Accident Case :
आंबळे गावाजवळ दुचाकी आणि बोलेरो पिकअपच्या धडकेत एक जण मृत्युमुखी पडलेल्या प्रकरणातील चालकास अटक !
- 1.1 Ambale Accident Case : अज्ञात चालकावर दाखल झाला होता गुन्हा दाखल !
- 1.1.1 Shirur 3 March 2025 :
- 1.1.2 ( Satyashodhak News Report )
- 1.1.3 हे ही वाचा…
- 1.1.4 Ambale Accident Case : या घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे —-
- 1.1.5 Ambale Accident Case: या अपघाताची प्राथमिक माहिती आणि फिर्याद —
- 1.1.6 हे ही वाचा. …
- 1.1.7 Ambale Accident Case: शिरुर पोलीसांचा तपास आणि पुढील कारवाई —
- 1.1.8 Ambale Accident Case: वरिष्ट पोलिस अधिकारी तपासात सहभागी —-
- 1.1.9 हे ही वाचा. ..
- 1.1.10 Ambale Accident Case: करडे घाटात वाहतूक सुरक्षेची गरज जास्त—
- 1.1.11 Ambale Accident Case: स्थानिक प्रशासनाची भूमिका–
- 1.1.12 Ambale Accident Case: नागरिकांची जबाबदारी काय आहे —
- 1.1.13 Ambale Accident Case: अपघात घडल्यानंतरची त्वरित मदत–
- 1.1.14 Ambale Accident Case:या घटनेतुन निष्कर्ष काय निघतो ? —
- 1.1.15 About The Author
- 1.1 Ambale Accident Case : अज्ञात चालकावर दाखल झाला होता गुन्हा दाखल !
Ambale Accident Case :
आंबळे गावाजवळ दुचाकी आणि बोलेरो पिकअपच्या धडकेत एक जण मृत्युमुखी पडलेल्या प्रकरणातील चालकास अटक !
Ambale Accident Case : अज्ञात चालकावर दाखल झाला होता गुन्हा दाखल !
Shirur 3 March 2025 :
( Satyashodhak News Report )
Ambale Accident Case : आंबळे गावाजवळ दुचाकी आणि बोलेरो पिकअपच्या धडकेत एक जण मृत्युमुखी पडला होता.अज्ञात चालक फरार झाला होता. पण अखेरीस शिरुर पोलिसांना त्याला अटक करण्यात यश मिळाले आहे. अज्ञात चालकावर 17 फेब्रुवारी 2025 रोजी शिरुर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अपघात शेखर धायगुडे यांचा मृत्यु झाला होता. नेवासा येथील नितीन गडाख हा चालक या अपघातास जबाबदार ठरला आहे. पुढील तपास शिरुर पोलिस करत आहेत.
17/2/ 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता शिरुर तालुक्यातील आंबळे गावाजवळील देशमुख वस्ती जवळ केसरी हॉटेलपासुन 500 मीटर अंतरावर मृताची दुचाकी आणि बोलेरो पिकअपच्या धडकेत 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता . या घटनेमुळे शिरुर तालुक्यात हळहळ व्यक्त केली गेली होती.शिरुर पोलिस या अपघातातील अज्ञात चालकाचा शोध घेत होते .
हे ही वाचा…
Ambale Accident Case : या घटनेचा तपशील पुढीलप्रमाणे —-
मृत व्यक्तीचे नाव शेखर बाळासाहेब धायडुडे (वय- 23 वर्षे) असून ते धायगुडे वस्ती, कुसमाडे, तालुका- माळशिरस, जिल्हा – सोलापूर येथील राहणारे होते. ते त्यांच्या MH 45 AY 0709 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून शिरुरकडे जात होते. आंबळे गावाच्या देशमुख वस्तीजवळ असलेल्या ‘केसरी’ या हॉटेलच्या 500 मीटर अंतरावर मृताच्या दुचाकीला बोलेरो पिकअप गाडी नंबर- (MH 17 CV 1973) ने धडक दिली होती . या अपघातात शेखर धायडुडे गंभीर जखमी होता आणि त्यांचा मृत्यू झाला होता.
Ambale Accident Case: या अपघाताची प्राथमिक माहिती आणि फिर्याद —
या अपघाताची तक्रार प्रविण दादासाहेब धायडुडे यांनी दाखल केली होती .त्या आधारे शिरूर पोलीस स्टेशन मधे आता गुन्हा नोंद क्रमांक 104/2025 असा नोंदविण्यात आला आहे . आरोपी पिक अप चालक नितीन किसनराव गडाख, राहणार- धनगर वस्ती, नेवासा, तालुका- नेवासा, जिल्हा- अहमदनगर याच्यावर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 184, 134/177 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा. …
Shirur Jalit Kand : न्हावरा येथील कंपनीत जळीत कांड घडले ! 5 कोटी रुपयांचे नुकसान? (पहा व्हिडिओ सह)
Ambale Accident Case: शिरुर पोलीसांचा तपास आणि पुढील कारवाई —
शिरूर पोलीस स्टेशन चे पोलीस हवालदार नारायण जाधव यांच्या नेतृत्वाखाली या तपास पथकाने या प्रकरणाचा तपास सुरू केला होता .पोलिस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या आदेशानुसार तपास पथकातील नाथसाहेब जगताप, रवींद्र आव्हाड आणि अजय पाटील यांनी आरोपीला अखेर पकडले आहे. या प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी 50 + सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली .नंतर आरोपी नितीन गडाख यांना अटक करण्यात आली. आता पुढील तपास सुरू आहे.
Ambale Accident Case: वरिष्ट पोलिस अधिकारी तपासात सहभागी —-
हा तपास वरिष्ट पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी शिरुर उपविभाग प्रशांत ढोले, सहायक पोलिस निरीक्षक श्री. दिपक करांडे, पोलिस सब इन्पेक्टर शुभम चव्हाण, पोलिस हवालदार नाथसाहेब जगताप, नारायण जाधव, पोलिस अंमलदार अजय पाटील, रविंद्र आव्हाड ,सचिन भोई,नितेश थोरात, विजय शिंदे या पोलिस पथकाने ही अवघड कामगिरी पार पाडली आहे.
हे ही वाचा. ..
Ambale Accident Case: करडे घाटात वाहतूक सुरक्षेची गरज जास्त—
ही दुर्दैवी घटना वाहनचालकाने वाहतूक नियमांचे पालन न करणे हे स्पष्ट दाखवते. रस्ते सुरक्षा नियमांचे पालन न केल्यामुळे असे अपघात घडतात. यात निष्पाप लोकांचे प्राण जातात. वाहन चालकांनी वेग मर्यादा, सिग्नल आणि इतर वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
वाहनचालकांनी मद्यपान करून वाहन चालवू नये. मोबाइल फोनचा वापर गाडी चालवताना टाळावा. यामुळे रस्ते अपघातांची कमी होऊ शकतात .
Ambale Accident Case: स्थानिक प्रशासनाची भूमिका–
स्थानिक प्रशासनाने रस्ते सुरक्षेचे उपाय करणे आवश्यक आहे. रस्त्यांवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविणे, वेग मर्यादा दाखवणारे फलक लावणे आणि लोक जागृती कार्यक्रम आयोजित करणे आवश्यक आहे. शाळा, महाविद्यालये आणि इतर सार्वजनिक ठिकाणी रस्ते सुरक्षेबाबत कार्यशाळा घेऊन नागरिकांमधे जागरूकता वाढवणे आवश्यक आहे.
Ambale Accident Case: नागरिकांची जबाबदारी काय आहे —
नागरिकांनी देखील रस्त्यांच्या सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक असते . पादचारी रस्ता ओलांडताना सावध राहणे, हेल्मेट, सीटबेल्ट घालणे आवश्यक आहे. लहान मुलांना रस्ते सुरक्षा नियमांची माहिती देणे आणि त्यांना योग्य पद्धतीने रस्ते ओलांडण्याचे शिक्षण देणे आवश्यक आहे.
Ambale Accident Case: अपघात घडल्यानंतरची त्वरित मदत–
कोठेही अपघात झाल्यानंतर लवकर वैद्यकीय मदत मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते . त्यामुळे रस्त्यांवर आपत्कालीन सेवा उपलब्ध करणे आवश्यक आहे. स्थानिक रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा केंद्रांनी त्वरित प्रतिसाद देणे गरजेचे आहे. नागरिकांनी देखील अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी पुढे येणे व त्वरित वैद्यकीय सेवांसाठी आरोग्य केंद्रात संपर्क साधणे आवश्यक असते .
Ambale Accident Case:या घटनेतुन निष्कर्ष काय निघतो ? —
आंबळे जवळील या दुर्दैवी अपघातामुळे एका तरुणाला आपले प्राण गमवावा लागला . या घटनेमुळे रस्ते सुरक्षा नियमांचे पालन करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. वाहन चालकांनी आणि नागरिकांनी रस्ते सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे व अशा दुर्दैवी घटनांना आळा घालावा. स्थानिक प्रशासनाने रस्ते सुरक्षा वाढविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. त्यामुळे भविष्यात अशा अपघातांची संख्या कमी होवु शकते.
1 thought on “Ambale Accident Case : आंबळे गावाजवळ दुचाकी आणि बोलेरो पिकअपच्या धडकेत एक जण मृत्युमुखी पडलेल्या प्रकरणातील चालकास अटक !”