
श्री.देवेंद्र फडणवीस
Contents
- 1 What’s App Var Seva : महाराष्ट्र सरकार करणार 500 सरकारी सेवा व्हाट्स अपवर उपलब्ध !
- 1.1 What’s App Var Seva : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती !
What’s App Var Seva : महाराष्ट्र सरकार करणार 500 सरकारी सेवा व्हाट्स अपवर उपलब्ध !
What’s App Var Seva : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती !
Shirur 3 March 2025 :
( Satyashodhak News Report )
What’s App Var Seva महाराष्ट्र सरकार 500 सरकारी सेवा व्हाट्स अपवर उपलब्ध करणार आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या सेवेमुळे राज्यातील नागरीकांना अनेक कामे आपल्या मोबाइल फोनचा वापर करून करुन घेता येणार आहे. या सेवांचा लाभ घेण्यासाठी आधी सरकारी कार्यालयात किंवा अधिकृत ठिकाणी जावे लागत होते. ते आता टळणार आहे.
हे ही वाचा. ..
What’s App Var Seva : मुंबई ‘टेक वीक’ —
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी ‘मुंबई टेक वीक’ कार्यक्रमाचे उद्घाटन नुकतेच झाले.त्याप्रसंगी त्यांनी ही माहिती दिली आहे. यावेळी ते म्हणाले, ‘”व्हॉट्स अप आता सर्वत्र वापरला जात आहे. अगदी खेडे गावांमध्येही हे अप्लिकेशन वापरले जाते. आता या नवीन योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि जलद राज्य सरकारच्या सेवा मिळतील,” असे देखील मुख्यमंत्राी देवेंद्र फडणवीस फडणवीस म्हणाले.
ही वाचा. …
Shinde Fadnaहेvis Cold War : तर तुमचा टांगा पलटी करु – एकनाथ शिंदे !
What’s App Var Seva : बीकेसी येथे एक भूखंड देणार —
राज्य सरकार नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) बीकेसी येथे त्यांचे जागतिक मुख्यालय स्थापन करणार आहे. एमएमआरडीएने यासाठी एनपीसीआयला बीकेसी येथे एक भूखंड प्रदान केला आहे. उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘उद्योजकता संग्रहालय’ स्थापन केले जाईल.
‘वॉर रूम’ मुळे प्रकल्पांची निर्णय प्रक्रिया वेगवान झाली आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यापूर्वी मुंबईत प्रकल्प सुरू करण्यासाठी १८ वेगवेगळ्या सरकारी संस्थांकडून परवानगी घ्यावी लागत होती.
हे ही वाचा. …
What’s App Var Seva: आता विलंब होणार नाही —
त्यामुळे प्रकल्पांना विलंब होत असे. मात्र आता , ‘ वॉर रूम’ द्वारे संबंधित सर्व अधिकाऱ्यांना एकाच ठिकाणी एकत्र आणले जात होते. आणि जलद निर्णय घेतले जात होते. यामुळे मेट्रो, कोस्टल रोड आणि अटल सेतू सारख्या प्रकल्पांना चालना मिळाली आहे.
What’s App Var Seva: सेवा गावांमध्ये सहज उपलब्ध होणार —
शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मुंबई ‘टेक वीक’ कार्यक्रमात ‘मेटा’ आणि ‘राज्य आयटी विभाग’ यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे .त्यामुळे “व्हॉट्स अप आता सर्वत्र, अगदी गावांमध्येही वापरला जातो. या नवीन योजनेमुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर आणि जलद सेवा मिळतील,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.