
Contents
- 1 AI Tools : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) चा तुम्हाला काय फायदा होईल? सविस्तर माहिती वाचा.
- 1.1 AI Tools : कृत्रीम बुद्धीमत्ता तुमचे जीवनच बदलुन टाकणार !
- 1.1.1 AI Tools : Artificial Intelligence क्रांती घेवुन येत आहे —-
- 1.1.2 AI Tools : AI म्हणजे काय? त्याचा इतिहास आणि विकास कसा झाला —
- 1.1.3 हे ही वाचा…..
- 1.1.4 AI Tools : AI नेमके कसे काम करते? ( NLP, Machine Learning, Deep Learning इत्यादी ) —- — AI ची कार्यप्रणाली विविध तंत्रांवर आधारित आहे, ज्यामध्ये प्रमुखपणे मशीन लर्निंग (Machine Learning), डीप लर्निंग (Deep Learning) आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (Natural Language Processing – NLP) यांचा समावेश होतो.
- 1.1.5 खास भेट :
- 1.1.6 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.7 AI Tools : आर्टिफिसीअल इंटेलीजेंस AI च्या मुख्य शाखा आणि प्रकार कोनचे ?—
- 1.1.8 Artificial Intelligence (AI ) चे फायदे आणि तोटे कोनते?—
- 1.1.9 समारोप—
- 1.1.10 About The Author
- 1.1 AI Tools : कृत्रीम बुद्धीमत्ता तुमचे जीवनच बदलुन टाकणार !
AI Tools : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) चा तुम्हाला काय फायदा होईल? सविस्तर माहिती वाचा.
AI Tools : कृत्रीम बुद्धीमत्ता तुमचे जीवनच बदलुन टाकणार !
AI Tools News Marathi 5March 2025:
( Satyashodhak Editorial by Dr.Nitin Pawar )
(Thanks to pixabay.com for Images in this Article)
AI Tools : कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence – AI) याचा तुम्हाला काय फायदा होईल? सविस्तर माहिती वाचा. कृत्रीम बुद्धीमत्ता तुमचे जीवनच बदलुन टाकणार आहे.’मोबाइल तंत्रज्ञानाने तुमचे जीवन बरेच बदलले गेले. त्याचीच पुढची आवृत्ती कृत्रीम बुद्धी सत्ता अर्थात Artificial Intelligence ( AI ) आहे.मराठी माणुस या बदलासाठी किती जागृत आहे ? असा प्रश्न आहे. नाहीतर मोबाइल फोन ,इंटरनेट सारख्या नव्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत तो केवळ ग्राहक बनला. आळसी बनला,एकाकी बनला,अनुत्पादक बनला.’ सत्यशोधक न्युज यासाठी एक उपविभाग Category बनवत आहोत.त्यातुन कृत्रीम बुद्धीमत्ता ( AI ) आपल्या सोप्या पद्धतीने व साध्या मराठी भाषेत तुम्हाला AI ची माहिती आणि उपयोग कसा करायचा हे शिकवणार आहोत.अर्थात काही लोकांना ती माहिती असेलही.पण सर्वसामान्य मराठी माणुस यापासुन वंचित राहू शकतो. म्हणुन आम्ही सत्यशोधक न्युज टिम ने हा लेखन प्रपंच हाती घेतला आहे.
AI Tools : Artificial Intelligence क्रांती घेवुन येत आहे —-

AI आपल्या जीवनात अगदी संपुर्ण क्रांती घेवुन येत आहे. हे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे.पण ‘ अत्याधुनिक’ शब्दाला घाबरुन जाण्याचे कारण नाही. कारण तंत्रज्ञान हे त्याच्या समजण्याच्या व ते वापरण्याच्या नव्या पद्धती देखील घेऊन येत असते.
AI म्हणजे Computer System ला स्वतः विचार करणे, विश्लेषण करणे, निर्णय़ घेणे याबाबत मानवी बुद्धी जसे काम करते तसे करण्याचे प्रशिक्षण computer ला देणे असे आहे. त्याचा उपयोग मानवी जीवन अधिकाधिक उन्नत , सुरक्षित करणे हा खरा आहे. इथे या category मधे सुरुवातीला आपण
कृत्रीम बुद्धीमत्तेचा AI चा इतिहास, त्याची कार्यपद्धती, त्याचे मुख्य प्रकार आणि त्याचे काय फायदे आणि तोटे असतात. याचा सविस्तर पण सामान्य मराठी माणसाला परिचय करुन देत आहोत.
AI Tools : AI म्हणजे काय? त्याचा इतिहास आणि विकास कसा झाला —

कृत्रिम बुद्धिमत्तेमधे संगणक प्रणालीला मानवी बुद्धी प्रमाणे काम करण्याची क्षमता देणे हे आहे. त्यामुळे नंतर त्याच्या मदतीने वेगवेगळी कामे automatic पणे माणसासाठी करुन घेतली जाणार आहे. जात आहे. उदाहरणार्थ एखादी
भाषा ओळखणे,एखादा फोटो ओळखणे, महत्त्वाचा व अगदी साधा निर्णय़ देखील घेणे. हे काम देखील करुन घेतले जाणार आहे.
AI चा इतिहास 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरू झाला. 1956 मध्ये डार्टमाउथ महाविद्याल , अमेरिका येथे एका workshop मधे पहिल्यांदा ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ ( Atificial Inteligence ) हा शब्द वापरला गेला. जेव्हा पासुन AI च्या विकासाची सुरुवात झाली. सुरुवातीला ही AI प्रणाली मर्यादित कार्यक्षमतेच्या होती. परंतु computer च्या क्षमतेत आणि deta storage मधे गती वेगाने वाढत गेली. AI आज जगातील विविध क्षेत्रांत अत्यंत प्रभावीपणे वापरली जात आहे.
हे ही वाचा…..
https://satyashodhak.blog/ai-krutrm-budhimatta-mhanje-kay/
AI Tools : AI नेमके कसे काम करते? ( NLP, Machine Learning, Deep Learning इत्यादी ) —-
—
AI ची कार्यप्रणाली विविध तंत्रांवर आधारित आहे, ज्यामध्ये प्रमुखपणे मशीन लर्निंग (Machine Learning), डीप लर्निंग (Deep Learning) आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (Natural Language Processing – NLP) यांचा समावेश होतो.
मशीन लर्निंग (Machine Learning) म्हणजे काय असते?
मशीन लर्निंग म्हणजे संगणकांना deta वापरून स्वतः शिकण्याची क्षमता निर्माण करुन देणे.ही क्षमता मानव देतो. यातील तज्ञ देतात. हे मात्र खरे. म्हणजे हे माणसाच्याच हातात अजुन तरी आहे. या प्रक्रियेत अनेक compuer models तयार केले जातात. ते deta म्हणजे माहितीचे विश्लेषण करतात. त्यानुसार अंदाजही करतात. जसे इ मेलच्या spam filtering system या spam व non spam इ मेल ओळखतात. जे आपण आपल्या इ मेल account मधे पाहते. ते AI ने केलेले असतात.
AI मधे डीप लर्निंग (Deep Learning) म्हणजे काय असते?
डीप लर्निंग ही मशीन लर्निंगची एक उपशाखा आहे. यामधे न्युरल Neual network चा डेटा किंवा माहिती यांचे विश्लेषण केले जाते.फोटो,प्रतिमा ओळखणे, निरनिराळे voice आवाज ओळखणे, भाषांचे अनुवाद म्हणजे translation यांसारख्या गुंतागुंतीची कामे करते. एखाद्याचा चेहरा ओळखणारे सॉफ्टवेअर सुद्धा deep Learning पद्धतीचा वापर करून काम करत असते .
नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (Natural Language Processing – NLP) म्हणजे काय असते) —
NLP मधे मानवी भाषा computer ला समजुन घेण्याचे व त्यावर प्रक्रिया करण्याचे मशिनला अर्थात संगणकाला शिकवण्यात येते. त्यामुळे computer मानवी भाषेत दिलेले संदेश ओळखतो. त्यानुसार काम करतो. Siri, Alexa) सारख्या व्हरच्युअल असिस्टंट मधे natural language selection चा वापर केला जातो. हे NLP चेच एक उदाहरण आहे.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
AI Tools : आर्टिफिसीअल इंटेलीजेंस AI च्या मुख्य शाखा आणि प्रकार कोनचे ?—
AI शाखा व प्रकार पुढील प्रमाणे —
1. अर्रो AI (Narrow AI)
याला कमकुवत AI (Weak AI) असेही म्हटले जाते. हे specific कामासाठी बनवलेले असतात. वर आपण उदाहरण पाहिले ते email spam filter , चेहरा ओळखणे वगैरे. साधारणपणे ही सिस्टम एका वेळी एकच काम करते. यांची क्षमता मर्यादित असते.
2.General AI ( साधारण AI)
पर्यायाने याला भक्कम AI म्हटले जाते. यात मानवी बुद्धिमत्तेसारखी intelligence सारखी क्षमता असते. या system अनेक गोष्टी शकतात . परिस्थिती नुसार स्वतःला समायोजित करतात. जनरल AI च्या हेच सध्याचे अधिक संशोधनाचे क्षेत्र आहे.
3. Super Intelligence – सर्वात महत्त्वाचे !
यामधे मानवी बुद्धी पेक्षा जास्त क्षमता निर्माण करण्याचे आव्हान आहे. या वेगाने विकसित करण्याचा प्रयत्न जगभर सुरु आहे. हे निर्माण होईल असे चित्र आहे.पण त्यातुन अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.जसे या नव्या System ने माणसालाच replce केले तर ? आपण मानवाचे आदेश prompt का पाळावेत? माणुस आपल्याला गुलामासारखे तर वागवत नाही ना? असे वाटुन त्याने मानवाविरुद्धच बंड केले तर ? चित्रपटांमधुन अशा कल्पना केल्या जात आहेत. स्टिफन हाकिंग यांनी देखील ही भिती व्यक्त केली होती. शिवाय नैतिक व अनैतिक काय असते आणि तेही मानवाच्या समजेप्रमाणे हे ही त्या machine learning ला शिकवण्याचे काम करावे लागेल.

Artificial Intelligence
(AI ) चे फायदे आणि तोटे कोनते?—
अर्थात वरील दोनही आहेतच. ते पुढील प्रमाणे —
AI चे फायदे कोनते?
1.त्याचे स्वतः विचार, काम करणे व ताकत वाढणे : AI विविध उद्योग क्षेत्रात वापरले तर उत्पादन आणि कार्यक्षमता वाढते. जसे रोबोट्स कडुन काम करुन घेणे.
2. वेगात deta विश्लेषण आणि निर्णय : भरपूर माहितीचे तत्काळ विश्लेषण करुन देणे. विश्लेषण करुन संभाव्य धोके सांगणे.हे या क्षेत्रात महत्त्वाचे ठरते.
3. व्यक्तीगत सेवा : व्यक्तीला लागणार्या अनेक सेवा किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी छोटे छोटे instruments तयार केले जाणे.यातुन मानसाचे जीवन सुखकर होईल. ते पुर्वग्रह दुषित काम करणार नाही.
असे अनेक म्हणजे संपुर्ण मानवी जीवन व्यापणारी कामे याद्वारे अगदी एक ‘गर्लफ्रेंड‘ भागवते त्या गरजा सुद्धा AI पुर्ण करेल ! कल्पनेनेच तुम्ही शहारुन गेला असाल ! पण AI मधील शाहेनशहा एलन मस्क यांनी ते केले आहे. अशी बातमी आहे.
AI चे तोटे कोनते ?—
1. तोटे ज्यात नाहीत.असे जगात काय नाही? माणसाला मृत्युच जर मिळाला नाही. तर तो ‘मृत्यु दे’ अशी ईश्वराजवळ मागणी करेल ! अश्वस्थामाची अशी मागणी आहे म्हणे.
2. माणसाची सर्वच कामे जर AI ने केली तर तो दिवसभर काय करणार ? आळशी बनण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्यायाम शरीराला कोनताच झाला नाही तर मृत्यु निश्चितच लवकर होईल.
3. सर्व कामे,उत्पादन AI करु लागला तर लाखो कोटींच्या संख्येने बेरोजगार होतील.त्यांचे व्यवस्थापन कसे होईल ? जगाची लोकसंख्या 8 अब्ज ला जावुन भिडत आहे.
4. अशी सर्व यंत्रे वापरण्यासाठी उर्जा प्रचंड लागेल. ती माणुस कुठुन आणणार ?
समारोप—
नव्या मानवाला आपण जन्माला घालतो आहोत. त्याने आपल्यालाच गुलाम बनवले तर ? अगदी नष्टच केले तर? सेपियन ही आपली प्रजाती नष्ट होईल का?
सुपरमैन निर्माण होईल तर आपण त्याच्यासह पृथ्वीवर अस्तित्वात असु का? मानव प्राण्यांच्या तुलनेत सुपरमैन झाला.आणि हळुहळु इतर प्राणी लोप पावत गेले.असे माणसाच्या बाबतीत घडेल का?
एकंदितच मानव आता स्वतःला सुपरमैन बनवणार असे दिसते.त्याच्या अंतर्मनात अशी इच्छा आहे देखील.नंतर तो इतर ग्रहांवर आपला बसेरा बसवील का? एलन मस्क साहेब मंगळाला पिकनिक पोईंट बनवण्याच्या टप्प्यात आहेत. मानव स्वताचे एक चिपमधे रुपांतर करुन प्रकाशाइतका वेग प्राप्त करून अखंड ब्रम्हांडाची सफर करत राहील का ? या सर्वासाठी प्रचंड उर्जा मात्र लागेल! ती मिळवणे म्हणजे प्रकाशाइतका वेग प्राप्त करावा लागतो. त्याला जवळ जवळ अगणित उर्जा लागतो.की तो एखादा शॉर्ट कट शोधील? एकामागुन एक प्रश्न ? प्रश्न आणि त्यांची उत्तरे शोधणे हाच मानवाचा इतिहास आहे !