
महिला कामगार सुरक्षितता महत्वाची!
Contents
- 1 Missing एक 19 वर्षीय तरुणी तर दुसरी विवाहित 24 वर्षीय महिला बेपत्ता!
- 1.1 Missing मानव मिसिंग च्या शिरुर तालुक्यात 2 घटना !
Missing एक 19 वर्षीय तरुणी तर दुसरी विवाहित 24 वर्षीय महिला बेपत्ता!
Missing मानव मिसिंग च्या शिरुर तालुक्यात 2 घटना !
Shirur Crime News 8 March 2025 :
( Satyashodhak News Report )
Missing च्या घटनेत एक 19 वर्षीय तरुणी तर दुसरी विवाहित 24 वर्षीय महिला बेपत्ता झाली असल्याची नोंद शिरुर पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. या मानव मिसिंग च्या 2 घटना शिरुर तालुक्यात घडल्या आहेत.गेल्या काही दिवसांपासुन सातत्याने अशा घटना घडत आहेत. त्यामुळे पालकवर्ग व शिरुर पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
Missing घटना -1
हकीकत अशी आहे. तारीख 07/03/2025 रोजी दुपारी 1:00 वाजण्याच्य सुमारास वडनेर खुर्द, तालुका-शिरुर , जिल्हा- पुणे येथील खबर देणार श्री.नागेश नाथा निचित, वय -43 वर्षे ,धंदा -शेती, राहणार -वडनेर खुर्द, तालुका -शिरूर ,जिल्हा-पुणे यांच्या राहत्या घरातुन कोणास काही एक न सांगता कोठे तरी निघुन गेली आहे. अगर बेपत्ता झाली आहे. तरी तिचा शोध होणेस विनंती आहे.
मिसिंग व्यक्तीचे नाव व वर्णन पुढील प्रमाणे आहे––
• पल्लवी नागेश निचीत, वय- 19 वर्षे,
• रंग -गोरा, डोकीस काळे ,
• केस लांब,
• नाक सरळ, नाकामध्ये मुरली, कानात कर्नफुले, • डाव्या हाताच्या बोटामध्ये चांदीची अंगठी, • गळ्यामध्ये चांदीची चैन, नेसनिस पिवळे साचा टीप व पांढर्या रंगाचा लेगीज,
• शिक्षण 12वी,
• भाषा मराठी व हिंदी बोलते,
• मोटो कंपनीचा मोबाईल व त्यामध्ये एअरटेल कंपनीचे सिम कार्ड आहे.
शिरूर पोलिस स्टेशनमध्ये मानव मिसिंग म्हणुन नोंद करण्यात आली आहे. रजिस्टर नंबर- 37/2025 असा आहे.
अंमलदार दाखल पोलिस हवालदार श्री. मोरे हे आहेत.तर पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. वारे हे करत आहेत.
—–
हे ही वाचा. …
Missing घटना –2
हकीकत अशी आहे. खालील वर्णानाची खबर देणार सोन्याबापु साधु गरदडे ,वय- 30 वर्ष, व्यवसाय- शेती ,राहणार – कु-हाडवाडी, निमोणे ,तालुका-शिरुर , जिल्हा- पुणे यांची पत्नी कांचन सोन्याबापु गरदडे, वय- 24 वर्षे ही दिनांक – 07/03/2025 रोजी 16:38 वाजण्याच्या सुमारास कु-हाडवाडी, निमोणे ,तालुका -शिरूर जिल्हा- पुणे येथुन कोणास काही एक न सांगता कोठेतरी निघुन गेली आहे. अगर बेपत्ता आली आहे.
मिसिंग व्यक्तीचे नाव व वर्णन–
• कांचन सोन्याबापु गरदडे,
• वय -24 वर्षे ,
• रंग -सावळा, डोक्यास लांब काळे केस,
• नाक- सरळ,
• कानात -कर्ण फुले, नाकात -चमकी,
चांदीची अंगठी डाव्या हातात,
• गळ्यात मनी मंगळसुत्र, • नेसणी अंगात लाल रंगाची साडी असुन निळा रंगाचा ब्लाऊज,
• डाव्या हाताला अंगठ्याच्या जवळ एस असे इंग्रजी अक्षर गोंदलेले,
• शिक्षण 10 वी,
• बोली भाषा – मराठी आणि हिंदी
शिरूर पोलिस स्टेशनमध्ये मानव मिसिंग रजिस्टर नंबर- 38/2025 असा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास अंमलदार पोलिस हवालदार श्री. मोरे हे करत आहेत.दाखल अंमलदार पोलिस हवालदार श्री. मोरे हे आहेत.
वरील दोनही घटनांचा तपास पोलिस निरीक्षक श्री.संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.