
Contents
- 1 Cafe Madhe Ashlil Vartan : शिरूरमध्ये ‘स्टीम रूम कॅफे’ वर पोलिसांचा छापा – शाळकरी मुलामुलींना अश्लील वर्तनास प्रवृत्त करण्याचा प्रकार उघड !
- 1.1 Cafe Madhe Ashlil Vartan : Cafe चालकावर गुन्हा दाखल!
- 1.1.1 खास भेट :
- 1.1.2 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.3 Cafe Madhe Ashlil Vartan :साध्या वेशातील पोलिसांचा सापळा !
- 1.1.4 Cafe Madhe Ashlil Vartan :Cafe चालकास पोलिसांनी घेतली ताब्यात !
- 1.1.5 हे ही वाचा. …
- 1.1.6 Cafe Madhe Ashlil Vartan :चालकावर गुन्हा दाखल !
- 1.1.7 Cafe Madhe Ashlil Vartan :वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन !
- 1.1.8 About The Author
- 1.1 Cafe Madhe Ashlil Vartan : Cafe चालकावर गुन्हा दाखल!
Cafe Madhe Ashlil Vartan : शिरूरमध्ये ‘स्टीम रूम कॅफे’ वर पोलिसांचा छापा – शाळकरी मुलामुलींना अश्लील वर्तनास प्रवृत्त करण्याचा प्रकार उघड !
Cafe Madhe Ashlil Vartan : Cafe चालकावर गुन्हा दाखल!
Shirur Crime News : 8 March 2025
( Satyashodhak News Report )
Cafe Madhe Ashlil Vartan ; शिरूरमध्ये ‘स्टीम रूम कॅफे’ वर पोलिसांचा छापा – शाळकरी मुलामुलींना अश्लील वर्तनास प्रवृत्त करण्याचा प्रकार उघड झाला आहे.या प्रकरणी Cafe चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत. या तपासामधे वरिष्ट पोलिस अधिकारी मार्गदर्शन करत होते.असे ही समजते.
शिरूर शहरातील रेव्हेन्यू कॉलनी परिसरात असलेल्या ‘स्टीम रूम कॅफे’ (STEAM ROOM CAFE ) मध्ये शाळकरी मुला-मुलींना अश्लील वर्तन करण्यास मुभा दिली जात असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना मिळाली. यावरून शिरूर पोलिसांनी या ठिकाणी ‘छापा’ टाकून धक्कादायक प्रकार उघडकीस आणला.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
Cafe Madhe Ashlil Vartan :साध्या वेशातील पोलिसांचा सापळा !
शिरूर पोलिसांनी याबाबत तत्काळ कारवाई करत पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, महिला पोलीस हवालदार सौ. भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार नितेश थोरात आणि रविंद्र आव्हाड यांना साध्या वेशात कॅफेमध्ये पाठवले. त्यांनी ग्राहक म्हणून नाश्ता मागवला असता, काही शाळकरी मुले-मुली अश्लील व असभ्य वर्तन करताना आढळले.
Cafe Madhe Ashlil Vartan :Cafe चालकास पोलिसांनी घेतली ताब्यात !

पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कॅफे चालक नमो आकाश रमेश लभडे (वय 23, रा. अरणगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या प्राथमिक तपासात असे आढळले की, ग्राहक मुला मुलींना गोपनीयता मिळावी यासाठी कॅफेमध्ये विशेष पार्टीशन करण्यात आले होते, जेणेकरून तेथे अश्लील वर्तनास मुभा दिली जाईल. हे अतिरिक्त पैसा कमवण्यासाठी चालले होते.
हे ही वाचा. …
Sex in Life : ” मानवी जीवनात लैंगिक संबंधांचा महत्त्वाचा वाटा का व कसा आहे? “
कफे चालकावर गुन्हा दाखल : कफे मधे मुला मुलींना, ‘ खास ‘ पार्टिशन?
शिरुर पोलिसांकडुन 21 म्हशीची पारडी ताब्यात ? एक अन्नपाण्याविना मृत्युमुखी !
Cafe Madhe Ashlil Vartan :चालकावर गुन्हा दाखल !
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 156/2025 आहे.तर भारतीय न्याय संहिता कलम 296 अंतर्गत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Cafe Madhe Ashlil Vartan :वरिष्ट पोलिस अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन !
ही कारवाई पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. या मोहिमेत शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, देवीदास खेडकर, महिला पोलीस अंमलदार सौ. भाग्यश्री जाधव, पोलीस अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, रविंद्र आव्हाड, निरज पिसाळ आणि अजय पाटील यांनी सहभाग घेतला.
शिरूर पोलिसांनी शहरातील अशा अनैतिक कृत्यांवर कारवाई करत कडक पावले उचलली आहेत. नागरिकांनी जर अशा कोणत्याही संशयास्पद कृत्याची माहिती मिळाल्यास, तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.