
Breaking News Ranjangaon MIDC: रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन.
Contents
- 1 Cyber Crime Ranjangaon MIDC :
ढोकसांगवीत सायबर फसवणुकीचा प्रकार: २० लाख रुपयांची रक्कम पोलिसांच्या मदतीने परत मिळविण्यात यश!
- 1.1 Cyber Crime Ranjangaon MIDC: फेक कंपनीच्या नावे देण्यात आला होता 20 लाख रुपयांचा चेक !
- 1.1.1 खास भेट :
- 1.1.2 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.3 Cyber Crime Ranjangaon MIDC: ढोकसांगवी, रांजणगाव एमआयडीसी येथील प्रकार—
- 1.1.4 Cyber Crime Ranjangaon MIDC: कसे घडले हे फसवणुकीचे प्रकरण?
- 1.1.5 हे ही वाचा. …
- 1.1.6 Cyber Crime Ranjangaon MIDC: सायबर क्राईमला कळवले —
- 1.1.7 Cyber Crime Ranjangaon MIDC: सायबर फसवणुकीपासून सुरक्षित कसे राहावे?—
- 1.1.8 Cyber Crime Ranjangaon MIDC:एक सावधानतेचा इशाराच —
- 1.1.9 About The Author
- 1.1 Cyber Crime Ranjangaon MIDC: फेक कंपनीच्या नावे देण्यात आला होता 20 लाख रुपयांचा चेक !
Cyber Crime Ranjangaon MIDC :
ढोकसांगवीत सायबर फसवणुकीचा प्रकार: २० लाख रुपयांची रक्कम पोलिसांच्या मदतीने परत मिळविण्यात यश!
Cyber Crime Ranjangaon MIDC: फेक कंपनीच्या नावे देण्यात आला होता 20 लाख रुपयांचा चेक !
Shirur Taluka Breaking News 9 March 2025:
(Satyashodhak News Report)
Cyber Crime Ranjangaon MIDC
ढोकसांगवीत सायबर फसवणुकीचा प्रकार घडला.परंतु २० लाख रुपयांची रक्कम पोलिसांच्या मदतीने परत मिळविण्यात यश मिळाले आहे. फेक कंपनीच्या नावे 20 लाख रुपयांचा चेक एका व्यावसायिकाकडुन फेक कंपनीला देण्यात आला होता.रांजणगाव एम आय डी सी पोलिसांनी या प्रकरणी सतत या प्रकरणाचा पाठपुरावा केला.परिणामी शेवटी व्यावसायिक सुहास पंढरीनाथ मलगुंडे यांना 20 लाख रुपये रिफंड करण्यात आले आहेत.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
Cyber Crime Ranjangaon MIDC: ढोकसांगवी, रांजणगाव एमआयडीसी येथील प्रकार—

सायबर क्राईम चे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अशाच एका प्रकरणात रांजणगाव एम आय डी सी जवळील ढोकसांगवी येथील सुहास पंढरीनाथ मलगुंडे यांच्या डीएसव्ही पॉलिमर्स या व्यवसायाला सायबर फसवणुकीचा अनुभव आला होता.
Cyber Crime Ranjangaon MIDC: कसे घडले हे फसवणुकीचे प्रकरण?
Yizumi Advanced Processing Technology Private Limited या कंपनीकडून नवीन मशीन खरेदीसाठी मलगुंडे यांना ई-मेलद्वारे संपर्क करण्यात आला होता. या व्यवहारात मलगुंडे यांच्या सेल्समनच्या नावाने फेक ई-मेल पाठवण्यात आला होता. त्यात एका मशीनसाठी अॅडव्हान्स 20 लाख रुपये भरण्याची मागणी करण्यात आली होती.
या फसव्या ई-मेलच्या आधारे मलगुंडे यांनी कंपनीच्या खात्यातून 20 लाख रुपये त्या कंपनीला पाठवले होते. मात्र ही रक्कम संबंधित कंपनीऐवजी इतर कोनत्यातरी व्यक्तीच्या खात्यावर जमा झाली होती.
हे ही वाचा. …
रांजणगाव एम आय डी सी पोलीसांचा नेमका ‘गेम’ (?) पहा व्हिडीओ सह !
माईलस्टोन इंटरनॅशनल स्कुल , कारेगाव येथे दिवाळी पार्टी व दीपोत्सवाचे अनोखे आयोजन !
Cyber Crime Ranjangaon MIDC: सायबर क्राईमला कळवले —
फसवणूक लक्षात आल्यानंतर मलगुंडे यांनी तातडीने सायबर पोर्टलवर तक्रार दाखल केली होती. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी त्वरित चौकशी व तपास सुरू केला होता .नंतर प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलिसांनी योग्य ती कारवाई करत संपूर्ण 20 लाख रुपयांची रक्कम परत मिळविण्यात यश मिळवले आहे.
Cyber Crime Ranjangaon MIDC: सायबर फसवणुकीपासून सुरक्षित कसे राहावे?—
• अनोळखी किंवा अनपेक्षित ई-मेलद्वारे येणाऱ्या पेमेंट मागण्यांची पडताळणी करण्याची दक्षता घेतली पाहिजे.
• नेहमी एखाद्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून किंवा थेट फोनद्वारे व्यवहाराची खात्री करून घेतली पाहिजे .
• ई-मेल आयडीमध्ये बदल किंवा अनोळखी डोमेन असल्यास सतर्क राहिले पाहिजे .
• मोठे आर्थिक व्यवहार करण्यापूर्वी खात्रीशीर पणे सर्व बाबींची तपासणी केली पाहिजे.
• सायबर फसवणुकीसंदर्भात कधीही त्वरित सायबर पोर्टल किंवा स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली पाहिजे.
Cyber Crime Ranjangaon MIDC:एक सावधानतेचा इशाराच —
ही घटना एक सावधानतेचा इशाराच आहे. सायबर गुन्हेगारी किती गंभीर पातळीवर पोहोचली आहे, हे यामुळे लक्षात यायला हरकत नाही. अशा वेळी वेळीच जागरूकता दाखवली पाहिजे. तरच अशा प्रकारच्या फसवणुकीला प्रतिबंध करता येवु शकतो. रांजणगाव एमआयडीसी पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे या व्यावसायिकाचे मोठे आर्थिक नुकसान टळले आहे. ही बाब निश्चितच कौतुकास्पद मानली पाहिजे.
पंकज देशमुख पोलिस अधिक्षक ,अपर पोलिस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलिस निरीक्षक अशोक चव्हाण, पोलिस कान्टेबल शिवणकर व सायबर तपास पथक रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन या सर्वांनी एकत्र काम केले.
1 thought on “Cyber Crime Ranjangaon MIDC : ढोकसांगवीत सायबर फसवणुकीचा प्रकार: २० लाख रुपयांची रक्कम पोलिसांच्या मदतीने परत मिळविण्यात यश!”