
Contents
- 1 Atrocity Act नुसार अल्पवयीन मुलीशी दोन वेळा शारीरीक संबंध व धमकी दिल्याने गुन्हा दाखल!
- 1.1 Atrocity Act सह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल!
- 1.1.1 खास भेट :
- 1.1.2 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.1.3 Atrocity Act नुसार गुन्हा: घटना कारेगाव येथील —
- 1.1.4 Atrocity Act नुसार गुन्ह्यात जीवे मारण्याची धमकी?
- 1.1.5 Atrocity Act नुसार गुन्ह्यातील आरोपी विधीसंघर्षित —-
- 1.1.6 हे ही वाचा….
- 1.1.7 Atrocity Act नुसार गुन्हा रांजणगाव पोलिस स्टेशन मधे दाखल —-
- 1.1.8 Atrocity Act च्या गुन्ह्यात वरिष्ट पोलिस अधिकार्यांची दखल—
- 1.1.9 About The Author
- 1.1 Atrocity Act सह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल!
Atrocity Act नुसार अल्पवयीन मुलीशी दोन वेळा शारीरीक संबंध व धमकी दिल्याने गुन्हा दाखल!
Atrocity Act सह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल!
Shirur Taluka Crime News 9 March 2025:
( Satyashodhak News Report)
Atrocity Act नुसार अल्पवयीन मुलीशी दोन वेळा शारीरीक संबंध व धमकी दिल्याने गुन्हा दाखल करण्याची घटना कारेगाव ,तालुका शिरुर ,जिल्हा- पुणे येथे घडली आहे. आरोपी व पिडीत हे अल्पवयीन आहेत. आरोपीवर Atrocity Act सह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रांजणगाव पोलिस व वरिष्ट पोलिस अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
Atrocity Act नुसार गुन्हा: घटना कारेगाव येथील —
याबाबत सविस्तर हकिगत अशी आहे. यातील फिर्यादी- वय -39 वर्ष, व्यवसाय -घरकाम, राहणार,कारेगाव, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे यांनी रांजणगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, दिनांक 07/02/2025 रोजी दुपारी 15.00 वाजता व दिनांक 06/03/2025 रोजी दुपारी 14.00 वाजण्याच्या सुमारास कारेगाव, तालुका- शिरूर ,जिल्हा- पुणे येथील मल्हार हिल्स येथे एका अल्पवयीन मुलाने वय- 16 वर्ष फिर्यादी मुलगीस वय- 14 वर्ष 11 महीने ,राहणार – कारेगाव, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे ती अनुसुचीत जातीची असल्याचे माहीत असताना देखील त्याने तिच्या सोबत इन्स्टाग्राम आय. डी वर ओळख केली. तिच्याशी मैत्री केली.
Atrocity Act नुसार गुन्ह्यात जीवे मारण्याची धमकी?
कारेगाव येथील त्याच्या राहत्या घरी घेवुन गेला. “मी तुझ्यावर खुप प्रेम करतोय, तु मला खुप आवडतेस” असे म्हणाला. जबरदस्तीने दोन वेळा शारीरीक संबंध केले आहेत. तसेच सदर गोष्ट कोणाला सांगितलीस तर जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली आहे.
Atrocity Act नुसार गुन्ह्यातील आरोपी विधीसंघर्षित —-
म्हणुन सदर सदर मुलाविरुद्ध कायदेशिर फिर्याद रांजणगाव पोलिस स्टेशन येथे दाखल केली आहे.आरोपी विधीसंघर्षित बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा….
Girls Missing Shirur Taluka शिरुर तालुक्यात मुली बेपत्ता होत आहेत ?
Swargate Pune Bus Rape Case : आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक ! ,’ संमतीनेच केले ‘ असाआरोपीचा दावा ?
Atrocity Act नुसार गुन्हा रांजणगाव पोलिस स्टेशन मधे दाखल —-
आरोपीवर रांजणगाव पोलिस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर- 72/2025 असा आहे. भारतीय न्याय संहिता कायदा कलम 2023 च्या कलम 64 (2) (I)(M), 65(1),351(2) (3) व बाल लैंगिक अत्याचार संहिता अधिनीयम 2012 च्या कलम 4,8,12,अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधिनियम 2015 च्या कलम 3(1) (w) (i) (ii),3(2)(v) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दाखल अधिकारी पोलिस सब इन्पेक्टर श्री. काळे रांजणगाव पोलीस स्टेशन हे आहेत.
Atrocity Act च्या गुन्ह्यात वरिष्ट पोलिस अधिकार्यांची दखल—
तपासी अधिकारी माननीय प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी ,शिरुर विभाग (पुणे ग्रामीण) हे करत आहेत. तसेच अधिकारी – मा. प्रशांत ढोले, उपविभागीय पोलीस अधिकारी ,शिरुर विभाग (पुणे ग्रामीण) यांनी संबंधित घटनास्थळाला भेट दिली आहे.
पोलीस निरीक्षक, रांजणगाव पोलीस ठाणे महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.