
Contents
- 1 News Shirur Crime : फार्म हाऊस मधुन 26,500 रुपये किंमतीचे घर सामान चोरीला !
- 1.1 News Shirur Crime;शिरुर तालुक्यातील करडे येथील घटना!
News Shirur Crime : फार्म हाऊस मधुन 26,500 रुपये किंमतीचे घर सामान चोरीला !
News Shirur Crime;शिरुर तालुक्यातील करडे येथील घटना!
News Shirur Crime 10 March : (Satyashodhak News Report)
News Shirur Crime : फार्म हाऊस मधुन 26,500 रुपये किंमतीचे घर सामान चोरीला गेले आहे. ही घटना शिरुर तालुक्यातील करडे येथे घडली आहे. शिरुर पोलिस स्टेशन मधे अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २५ मध्ये काय वाचाल ..👇
१) सम्यक् विद्रोहाचे साहित्य.
२) कोसला : भारतीय परात्मतेचा परमोत्कर्ष.
३) ‘समा’कारांची पत्रकारिता.
४) प्रयोजन ? व इतर..👇
News Shirur Crime:शिरुर तालुक्यातील करडे येथील घटना —
ही घटना अशी आहे. दिनांक 06/03/2025 रोजी संध्याकाळी 05:00 ते दिनांक 08/03/25 सकाळी 09:00 वाजण्याच्या पुर्वी करडे, तालुका – शिरुर, जिल्हा – पुणे हद्दीत बांदलमळा शेत ,583 मध्ये असलेल्या फिर्यादी राहुल गौतम कदम यांची बहिण मोनिका अशोक पवार हिच्या फार्म हाउस मर्धील घराचे कुलूप कोणीतरी अज्ञात इसमाने कशाने तरी उघडले. घरातील टिव्ही, साउंड, गॅस सिलेडर टाकी, ड्रील मशिन, गोपी कंपनीचा मिक्सर, जेवनाचे 30 स्टिलचे ताटे व इत्यादि वस्तु चोरून नेल्या आहेत.
म्हणुन फिर्यादी यांनी ज्ञात चोरट्या विरुध्द शिरुर पोलीस स्टेशन मधे कायदेशिर फिर्याद दाखल केली आहे.
हे ही वाचा. ..
उसतोड कामगार देतो म्हणुन 5 लाख 5 हजार रुपयांना गंडा घातला ! 420 पणा केला ! पुढे काय घडले ते वाचा.
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
गेलेल्या मालाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे –
• 12,000/- रुपये किमतीचा हायर कंपनीचा काळ्या रंगाचा 40 इंची टिव्ही .
• 6000/- रुपये किमतीचे ब्युट्युत साउंड बॉक्स काळ्या रंगाचा .
• 2000/- रुपये किमतीची भारत गॅस कंपनीची सिलेंडरची गॅस टाकी लाल रंगाची.
• 2000/- रुपये किमतीचे ड्रील मशिन काळ्या रंगाचे.
• 1500/- रुपये किमतीचा गोपी कंपनीचा मिक्सर.
• 3000/- रुपये किमतीचे जेवनाची 30 स्टिलची ताटे.
एकून 26500/- रुपये किमतीचे सामान चोरीला गेले आहे.
News Shirur Crime: अज्ञात चोरटयाविरूद्ध गुन्हा दाखल —

शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा रजिस्टर नंबर 158 / 2025 असा आहे. तर अज्ञात आरोपीवर भारतीय न्याय संहिता कायदा कलम – 331 (3), 331(4), 305 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अमंलदार भोते हे आहेत. तर पुढील तपास देखील अमंलदार भोते हे करत आहेत. हा तपास पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.