
Contents
- 1 Electric इलेक्ट्रिक मोटर चोरांचा धुमाकुळ ! एका दमात 5 मोटारी लांबवल्या !
- 1.1 Electric Motor इलेक्ट्रिक मोटर चोरीची घटना शिरुर तालुक्यातील निमगाव दुडे येथील!
Electric इलेक्ट्रिक मोटर चोरांचा धुमाकुळ ! एका दमात 5 मोटारी लांबवल्या !
Electric Motor इलेक्ट्रिक मोटर चोरीची घटना शिरुर तालुक्यातील
निमगाव दुडे येथील!
शिरुर तालुका क्राइम न्युज 14 मार्च 2025: (सत्यशोधक न्युज रिपोर्ट)

Electric Motor इलेक्ट्रिक मोटर चोरांचा धुमाकुळ चालला आहे. चोरट्यांनी एका दमात 5 इलेक्ट्रिक मोटारी लांबवल्या आहेत. इलेक्ट्रिक मोटर चोरीची ही घटना शिरुर तालुक्यातील निमगाव दुडे येथील आहे.एकुण 70,000/- रूपये इतकी या इलेक्ट्रीक मोटारींची किमत आहे. शिरुर पोलिस ठाण्यात याची तक्रार नोंदवण्यात आली आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
Read more >>
Shirur Jalit Kand : न्हावरा येथील कंपनीत जळीत कांड घडले ! 5 कोटी रुपयांचे नुकसान? (पहा व्हिडिओ सह)
ऊस तोडणी कामगार देतो म्हणून 10 लाख 95 हजार रुपये घेऊन पसार झाला होता पण पुढे काय घडले ते वाचा…..
पार्श्वभूमी इलेक्ट्रीक मोटार चोरींची —
गेल्या काही महिन्यांपुर्वी शिरुर तालुक्यातील शेतक-यांच्या शेतातील इलेक्ट्रीक मोटार चोरी हाेण्याच्या घटना वारंवार चालु होत्या.पण चोरटे सापडले नव्हते. नंतर एकाच वेळी अनेक इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे शिरुर पोलिसांना सापडले होते. नंतर काही काळ हा प्रकार बराच कमी झाला होता.पण या ताज्या बातमीने पुन्हा इलेक्ट्रीक मोटार चोरी करणारे सक्रिय झाले आहेत असे दिसत आहे.
खास भेट :
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास सत्यशोधक न्युज च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २६ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
निमगाव दुडे येथे 5 इलेक्ट्रीक मोटार चोरीला—
इलेक्ट्रीक मोटार चोरीची सविस्तर घटना अशी आहे. तारीख 12 मार्च 2025 रोजी दुपारी अडीच ते दिनांक 13 मार्च 2025 रोजी सकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान निमगाव दुडे, तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे या ठिकाणी घोडनदीवरील दिपक दुठे यांच्या मालकीच्या क्षेत्रातून कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी 5 इलेक्ट्रीक मोटार चोरून नेल्या आहेत.
Read more >>
Breaking News ब्रेकींग न्युज : 6 लाख 60 हजार रुपये किंमतीच्या 11 मोटरसायकल चोरी करणार्यास अटक !
चोरीला गेलेल्या माल पुढील प्रमाणे —-
1) 15000/- रूपये किंमतीची एक निळ्या रंगाची टेक्समो कंपनीची 12.5 एच.पी. ची इलेक्ट्रीक मोटार व वॉल (2013 साली विकत घेतलेली)
2) 15000/- रूपये किंमतीची एक निळ्या रंगाची टेक्समो कंपनीची 12.5 एच. पी. ची इलेक्ट्रीक मोटार व वॉल (2013 साली विकत घेतलेली प्रभाकर गेणभाऊ रावडे यांची)
3) 15000/– रूपये किंमतीची एक निळ्या रंगाची टेक्समो कंपनीची 12.5 एच.पी. ची इलेक्ट्रीक मोटार व वॉल (2013 साली विकत घेतलेली शिवनाथ गेणू रावडे यांची)
4) 15000/- रूपये किंमतीची एक निळ्या रंगाची टेक्समो कंपनीची 12.5 एच. पी. ची इलेक्ट्रीक मोटार व वॉल (2013 साली विकत घेतलेली दशरथ रामभाऊ शिंदे यांची)
5)10000/-रूपये किंमतीची एक निळ्या रंगाची लोकल कंपनीची 7.5 एच. पी. ची इलेक्ट्रीक पाणबुडी मोटार. (2022 साली विकत घेतलेली सुमित भानुदास कांदळकर यांची)
असा एकुण 70,000/- रूपये किंमतीचा हा माल आहे.
Read more >>
शिरुर पोलिसांकडुन तपास सुरू —-

शिरूर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल रजिस्टर नंबर-173/2025 असा आहे. तर भारतीय न्याय संहीता कायदा कलम-303 (2) प्रमाणे अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमलदार पोलीस हवालदार श्री. उबाळे हे करत आहेत. तर दाखल अंमलदार सहायक फौजदार श्री. साबळे हे आहेत. प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू आहे.
या इलेक्ट्रीक मोटार चोरीच्या घटनेने पुन्हा शेतकरी वर्ग चिंतीत झाला आहे.त्याच्या शेतांमधील काम इलेक्ट्रीक मोटार वर अवलंबुन असते .ती चोरीला गेली तर त्याचे आर्थिक नुकसान तर होतेच.पण मानसिक त्रासही होतो. त्यामुळे आता इलेक्ट्रीक मोटार चोरी बाबत प्रतिबंधात्मक कारवाई शिरुर पोलिसांनी करावी.अशी शिरुर तालुक्यातील शेतक-यांची अपेक्षा आहे.