
Contents
- 1 Danewadi Mauli Gavhane Murder Case: माऊली गव्हाणेचा एक खुनी सापडला पण …….
- 1.1 Danewadi Mauli Gavhane Murder Case: माऊली गव्हाणे याचा क्रुर खुन सागर गव्हाणे एकटा कसा करु शकतो?
- 1.1.1 थंड डोक्याने नियोजनपुर्वक खुन करण्यात आला आहे—-
- 1.1.2 ती मुले कोण होती? हे समझणे इतके अवघड आहे का?—“वह कौन थे”
- 1.1.3 गोपाळ लष्करात व पोलिस खात्यात काम करतो—
- 1.1.4 नुकताच 50 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता?
- 1.1.5 आपत्ती व्यवस्थापन केवळ नैसर्गिक कारणासाठीच?—
- 1.1.6 गुन्हा अत्यंत क्रुर व दुर्मिळातील दुर्मिळ—
- 1.1.7 मेनबत्या,कन्डडमार्च असेही काही अभिजन वर्गाला सुचताना दिसत नाही!—-
- 1.1.8 About The Author
- 1.1 Danewadi Mauli Gavhane Murder Case: माऊली गव्हाणे याचा क्रुर खुन सागर गव्हाणे एकटा कसा करु शकतो?
Danewadi Mauli Gavhane Murder Case: माऊली गव्हाणेचा एक खुनी सापडला पण …….
Danewadi Mauli Gavhane Murder Case: माऊली गव्हाणे याचा क्रुर खुन सागर गव्हाणे एकटा कसा करु शकतो?
Shirur Taluka Crime News: 18 March 2025:
(Satyashodhak News Report)
Danewadi Mauli Gavhane Murder Case: माऊली गव्हाणेचा एक खुनी सापडला आहे. पण हा खुनी सागर गव्हाणे माऊली गव्हाणे याचा क्रुर खुन एकटा कसा करु शकतो? असा प्रश्न तर आहेच ! मात्र अहिल्यानगर पोलिस यंत्रणेला तपास करण्यात वेळ लागत आहे. असे दिसते.एरवी सुरेश गाडे या शिरुर तालुक्यातील जांबुत मधुन स्वारगेट बस स्थानक येथे जावुन गुन्हा केलेल्या आरोपीला शोधण्यासाठी मोठा फौजफाटा व ड्रोन सारख्या पद्धतीचा वापर वेगाने केला गेला.तसा त्यापेक्षाही क्रुर व दुर्मिळातील दुर्मिळ अमानुष खुन दाणेवाडी येथे या कोवळ्या 19 वर्षीय मुलाचा झाल्यानंतर देखील अहिल्यानगर पोलिस केवळ सागर गव्हाणे या 20 वर्षीय तरुण आरोपीला ताब्यात घेण्यात सफल झाली आहे. असे सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकरणात अनेक प्रश्न निर्माण होतात.
थंड डोक्याने नियोजनपुर्वक खुन करण्यात आला आहे—-
एक तर पकडला गेलेला आरोपी देखील वयाने लहान आहे. माऊली व सागर गव्हाणे दोघे एकमेकांचे नातलग व जवळचे जिवलग मित्र होते.असे सांगण्यात येत आहे. मात्र हा जो खुन करण्यात आला आहे तो साधा नाही. थंड डोक्याने नियोजनपुर्वक हा खुन करण्यात आला आहे. असे स्पष्ट दिसते.सागर बरोबर कोणी आणखीन जास्त वयाचे मारेकरी असण्याची शक्यता आहे. तो एकटा हे सर्व करु शकणार नाही. असे तर ज्या पद्धतीने हे कृत्य केले गेले आहे. ते पाहता यातील सुत्रधार आणखीन कोणी असण्याची शक्यता जास्त आहे. सागर हा अल्पवयीन मुलगा पुढे करुन पडद्यामागुन कोणी ताकतवर ‘हात’ किंवा ‘अद्रृश्य’ हात , शक्ती तर यात सामिल नाही ना ? अशी शंका येण्यास वाव आहे.
Read more >>
ती मुले कोण होती? हे समझणे इतके अवघड आहे का?—“वह कौन थे”
पाच सहा महिन्यांपुर्वी माऊली गव्हाणे याचे ज्या मुलांशी भांडण झाले होते .ती मुले कोण होती? हे समझणे इतके अवघड आहे का ? शिरुर येथील सी टी बोरा काॅलेज येथे माऊली 12 वीत शिक्षण घेत होता.त्यानंतर हत्येपुर्वी तो परिक्षेचा पेपर देवुन आला होता.त्यावेळी शिरुर येथे ही मुले परत त्याला भेटली होती का ? आजकाल कुमार वयातील मुले ग्रुपने राहत असतात. या वयात मुले मित्रांशी एकनिष्ट व जीवाला जीव देण्याची मानसिकता बाळगतात.ते कुमारवयीन ‘मानसशास्त्र‘चे एक लक्षण आहे.एक वैशिष्ट्य आहे.त्यामुळे असा ग्रुप दाणेवाडी चा असु शकतो.तसा शिरुर चा ही असु शकतो ! तो कोणता आहे.हे शोधणे अवघड जावे का? एकाचे नाव पुढे आले.इतरांची नावे पुढे आणण्यास काय अडचण आहे.
गोपाळ लष्करात व पोलिस खात्यात काम करतो—
माऊली हा गोपाल या जातीतील आहे.गोपाळ समाज शिरुरमधे चांगल्या संख्येने आहे. कुस्ती हा गोपाळांचा पारंपारिक पेशा आहे.हा समाज उत्तर भारतीय गोपालक यादव ,यदुवंशीय म्हणजे कृष्णाशी नाते सांगतो.तो शरीरयष्टीने तगडा असतो.संख्येने कमी असला तरी गोपाळ समाजाचा धाक इतरांना वाटतो.शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने हातभट्टीची दारु बनवण्याचा व्यवसाय तो करतो.होलसेल मधे इतर हातभट्टीची दारु विकतो.परंपरागत गोपालन व्यवसाय राहिला नाही.म्हणुन त्यांनी हा मार्ग पत्करल्याचे शिरुर येथील आमचे मित्र सांगत असतात.धंदा कमी जास्त प्रमाणात चालणे,अवैध दारु म्हणुन पोलिसांची रेड पडण्याची टांगती तलवार सतत असते.पण हा समाज धाडसी ,शौर्य गाजवणारा आहे.बरेच गोपाळ लष्करात व पोलिस खात्यात काम करतात.
Read more >>
Satyashodhak News Special
नुकताच 50 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता?
काही ठिकाणी मोठी झाडे तोडून देण्याचे काम करतात. कटरचा वापर हे दर्शवतो की मारेकर्यांपैकी किमान एकाचा तरी झाडे तोडून देण्याचा व्यवसाय आहे.यातुनच पोलिसांना काही हिंट मिळाली असु शकते.दुसरे असे की अशी झाडे तोडून देण्याचे काम मिळवताना दोन व्यावसायिकांमधे कटुता व पर्यायाने शत्रुत्व निर्माण होवु शकते.एक बातमी अशी ही आहे की त्याचा नुकताच 50 हजार रुपयांचा व्यवहार झाला होता.हा संदर्भ सुद्धा तपासणे आवश्यक आहे. भाऊबंदकीत हा समाज मराठा समाजाइतकाच कट्टर असतो.ही बाब सुद्धा विचारात घेण्याजोगी आहे.
आपत्ती व्यवस्थापन केवळ नैसर्गिक कारणासाठीच?—
गोपाळ समाज देखणा समाज आहे.कोणा मुलीवरुन काय झाले आहे काय ? लोकांमधे बोलताना असा उल्लेख येतो.अशी बाजु देखील तपासणे आवश्यक आहे. तरी सहसा लोकांना असाच संशय घेण्याची एक सवय पडली आहे.त्यामुळे असे घडणे अवघड वाटते.
आपत्ती व्यवस्थापन केवळ नैसर्गिक कारणासाठीच वापरले जात असते,सुरुवातीस स्थानिक पोलिसांनी सांगणे बेजबाबदारपणाचे वाटते.तसे असेल तर तर पोलिसांकडे पर्याय असणे आवश्यक नाही का? दौलतनाना शितोळे यांनी वैतागुन त्यांची स्वतःची आपत्ती व्यवस्थापन टिम वापरणे हे खचितच पोलिस खात्याला शोभणीय नाही.या मधल्या काळात मारेकर्यांना बचावासाठी वेळ त्यामुळे मिळाला असावा. त्यामुळे केवळ एकच संशयीत ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळत आहे.इतरांना पकडण्यास वेळ लागत असेल.
सामाजिक बाजु देखील तपासणे आवश्यक आहे. गोपाळ समाज भटक्या जातींमधे मोडतो.त्याचे राजकारणातील ‘मुल्य’ / उपद्रवक्षमता नगण्य आहे.यात भांडवलदार,आमदार,खासदार जवळ जवळ नाहीतच !) म्हणुन ही दिरंगाई होत आहे का?की गोपाळ समाज्याव्यतिरिक्त इतर प्रभावी जातीतील कोणी या मारेकर्यांमधे आहे?त्याला किंवा त्यांना वाचवण्यासाठी प्रयन्त तर होत नाही ना ?
Read more >>
गुन्हा अत्यंत क्रुर व दुर्मिळातील दुर्मिळ—
कारण गुन्हा अत्यंत क्रुर व दुर्मिळातील दुर्मिळ क्रुरतेला फाशीची शिक्षा मिळते.म्हणुन कोणी धास्तावलेले तर नाही ना?दिल्ली तील निर्भया प्रकरण व कसाबचे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ क्रुर प्रकरण ठरुन आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती ! मधल्या पाच सहा दिवसांमधे यावर विचार होवून कोणी ‘ मोठा’ ‘आका ‘ प्रकरण सौम्य बनवण्याचा प्रयन्त तर करत नाही ना?
मेनबत्या,कन्डडमार्च असेही काही अभिजन वर्गाला सुचताना दिसत नाही!—-
मुख्य प्रवाहातील माध्यमांनी तसी उशीरा दखल घेणे,तीही सौम्य का? एरवी आकाश पाताळ एक करणारा हा मिडीया अजुनही तुरळक बातमी देत आहे.गंभीर विषय म्हणुन पहात नाही.मेनबत्या,कन्डडमार्च असेही काही अभिजन वर्गाला सुचताना दिसत नाही!
सर्व सत्य पुढे येइलही ! पण या क्षणी मात्र तपास यंत्रणा व गृहखाते यांचे काम समाधानकारक नाही,असे वाटते.