
Contents
- 1 Swargate Datta Gade Rape Case:मोठी बातमी ; दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण ; दिवे घाटात नेउन मारहाण !
- 1.1 Swargate Datta Gade Rape Case: वकील सहिल डोंगरे यांच्यावर ससुन मधे उपचार सुरू. ..
- 1.2 खास भेट:
- 1.2.1 सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
- 1.2.2 डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇
- 1.2.3 आता वेगळे वळण—-
- 1.2.4 तरुणीवर करण्यात आला होता बलात्कार?
- 1.2.5 शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना—-
- 1.2.6 वकील साहील डोंगरे यांच्यावर आता हा हल्ला झाला—-
- 1.2.7 मुख्य वकील वाजीद खान यांचे सहायक वकील—-
- 1.2.8 About The Author
Swargate Datta Gade Rape Case:मोठी बातमी ; दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण ; दिवे घाटात नेउन मारहाण !
Swargate Datta Gade Rape Case: वकील सहिल डोंगरे यांच्यावर ससुन मधे उपचार सुरू. ..
Shirur Taluka Crime News 19 March 2025:
(Satyashodhak News Report)
Swargate Datta Gade Rape Case मधे मोठी बातमी प्राप्त होत आहे. दत्ता गाडेच्या वकिलाचे अपहरण करण्यास आले.त्यांना दिवे घाटात नेउन मारहाण करण्यात आली आहे. वकील सहिल डोंगरे असे या वकिलाचे नाव आहे. सध्या त्यांच्यावर पुणे येथील ससुन सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील जांबुत येथील आरोपी दत्ता गाडे स्वारगेट बस स्थानक परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी आहे.तो पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याची बाजु त्याचे वकील अॅड. वाजिद खान व ॲडव्होकेट साहिल डोंगरे हे न्यायालयात त्याची बाजु मांडत आहेत. पण साहिल डोंगरे यांचे अपहरण करण्यात आले.त्यानंतर त्यांना दिवे घाटात नेण्यात आले. तेथे त्यांना मारहाण करण्यात आली आहे. त्यात ते जखमी झाले आहेत.त्यामुळे त्यांना पुणे येथील ससुन सर्वोपचार रुग्णालयामधे दाखल करण्यात आले आहे. ससुन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अशी माहिती सत्यशोधक न्युज कडे प्राप्त होत आहे.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇
१) काम्ब्रेड शरद पाटील शताब्दीचे अभिवादन…
२) समाजक्रांतीसाठी काम्ब्रेड शरद पाटील यांनी केलेल्या संशोधनाची मी साक्षीदार. …
३) मावळाई प्रकाशन ची प्रकाशने कोनती?…
४) प्रयोजन ? व इतर..👇
आता वेगळे वळण—-
Swargate Datta Gade Rape Case प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. आरोपीच्या वकीलांनाच अपहरण व मारहाण करण्याची ही घटना न्यायदानाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा करण्यात येत आहे. आरोप कोनताही असो.आरोपी कोणीही असो.त्याला न्यायालयात आपली बाजु मांडण्याचा अधिकार आहे. त्याचे वकीलपत्र घेण्याचा अधिकार वकीलाला आहे.मात्र आरोपी किंवा त्याचा वकील यांच्यावर प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्याक्षपणे दबाव आणणे बेकायदेशीर कृत्य आहे.
तरुणीवर करण्यात आला होता बलात्कार?

काही दिवसांपूर्वी पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकात एका शिवशाही बसमध्ये एका फलटणकडे जाण्यासाठी आलेल्या तरुणीवर बलात्कार करण्यात आला. अशी तक्रार पिडीत 26 वर्षीय तरुणीने स्वारगेट पोलिस स्टेशन मधे केली होती. या प्रकरणात शिरुर तालुक्यातील जांबुत गावचा दत्ता गाडे हा आरोपी आहे. या प्रकरणात मात्र दिनांक 17 मार्च 2025 रोजी या बलात्कार प्रकरणातील आरोपीच्या वकिलाचे अपहरण केले गेले आहे. अपहरण करुन त्यांना दिवे घाटात नेण्यात आले.तेथे वकील अॅड. साहिल डोंगरे यांना मारहाण झाल्याची माहिती समोर आली आहे. अडव्होकेट डोंगरे यांना मारहाण करुन आरोपी फरार झाले आहेत. पोलिस या आरोपींचा शोध घेत आहेत.
Read more >>
शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना—-
त्यापुर्वी 26 फेब्रुवारीला पुण्याच्या स्वारगेट बस स्थानक येथे पिडीत 26 वर्षीय तरुणीवर तेथे उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये बलात्कार झाल्याची घटना घडली होती. ही 26 वर्षीय तरुणी पुण्याच्या स्वारगेटवरुन फलटणकडे जाण्यासाठी आली होती. तरुणी एकटी असल्याचे हेरुन आरोपी दत्ता गाडे याने तिला आधी बोलण्यात गुंतवले.नंतर अंधारात उभ्या असलेल्या एका शिवशाही बसमध्ये नेले.तेथे तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणात दत्ता गाडे याला अटक करण्यात आली होती. ही अटक जांबुत, तालुका -शिरूर जिल्हा- पुणे येथे पोलीस पथकाच्या मोठ्या परिसरश्रमानंतर तेथील ऊसाच्या शेतामध्ये बलात्कार केल्यानंतर ताब्यात घेण्यात आले होते.त्याधी हे कृत्य करुन आरोपी दत्ता गाडे फरार झाला होता . 75 तासांनी पुणे पोलिसांनी आरोपी दत्तात्रय गाडेला गुनाट गावातून अटक केली होती.
वकील साहील डोंगरे यांच्यावर आता हा हल्ला झाला—-
या आरोपी दत्ता गोडेचे एक वकील साहील डोंगरे यांच्यावर आता हा हल्ला झाला आहे. हा हल्ला 17 मार्च ला संध्याकाळी हडपसर येथुन अडव्होकेट साहिल डोंगरे यांचे अपहरण करुन दिवे घाटात आणुन त्यांना मारहाण करुन तिथेच त्यांना सोडुन देण्यात आले होते . ही मारहाण झाल्यानंतर साहिल डोंगरे यांनी जखमी अवस्थेत हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या हल्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.मात्र या घटनेनंतर राज्यात मोठा जनक्षोभ आरोपी दत्ता गाडे याने केलेल्या कृत्याबाबत झाला होता.मात्र आरोपी दत्ता गाडे याने आपण बलात्कार केलेला नसुन संवंधित तरुणीच्या संमतीने तिच्याशी शरीर संबंध प्रस्थापित केले होते.असा दावा केला होता.मात्र पिडीत तरुणी व पोलिसांनी तो दावा फेटाळला होता.दत्ता गाडे याला अटक केली होती. त्यानंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अडव्होकेट साहिल डोंगरे यांच्यावर आता या हल्ल्यानंतर पुणे येथील ससुन या शासकिय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Read more >>
Swargate Pune Bus Rape Case : आरोपी दत्तात्रय गाडेला अखेर अटक ! ,’ संमतीनेच केले ‘ असाआरोपीचा दावा ?
मुख्य वकील वाजीद खान यांचे सहायक वकील—-
अडव्होकेट साहिल डोंगरे हे आरोपी दत्ता गोडेचे मुख्य वकील वाजीद खान यांचे सहायक वकील आहेत. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी सुरु असताना आरोपीचे वकिल वाजीद खान यांनी पिडितेला अनेक उलते सुलटे प्रश्न विचारले होते.ज्यानंतर त्यांनी काही दावे केले होते. त्यात प्रमुख दावा हा होता की दत्ता गाडे याने जबरदस्तीने या तरुणीला काहीही केले गेले नाही.तर तिच्या सहमतीनेच केले होते. काही पैसेही त्याबदल्यात तरुणीला दिले होते.त्यांच्या मुद्द्याला बळ देताना ही कथित घटना सकाळी घडली होती .त्यावेळी तरुणी ओरडू शकत होती.तिथे वर्दळ असते.मदत मिळाली असती.पण तिने तसे का केले नाही? अर्थात हे जबरदस्तीने काहीही केले गेलेले नाही,” अशी वकील वाजिद खान यांनी दत्ता गाडे याची बाजु मांडताना दत्ता गाडे याचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता.
जनक्षोभ ,एकुण पार्शभुमी ,घटनाक्रम व दावे प्रतिदावे पाहता आता ही घटना घडत आहे.