
Contents
- 1 Shirur News: पाबळ फाटा ते रिलायन्स पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता ठिक झाला नाही तर मनसे ‘रत्यावर रांगोळी काढणार’ किंवा ‘खडी मुख्याधिकार्यांच्या कार्यालयात टाकणार’ ?
- 1.1 Shirur News:ॲड. स्वप्नील किशोर माळवे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकार्यांना दिले निवेदन !
- 1.2 मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना निवेदन—
- 1.3 आधीही एक निवेदन दिले होते —
- 1.4 अर्धवट केलेल्या रस्त्यामुळे अनेक अपघात—-
- 1.5 खास भेट:
- 1.6 गाडी स्लीप होऊन अंबिका हॉटेलजवळ अपघात झाला होता —
- 1.7 रस्यावर प्रतिकात्मक रांगोळी स्पर्धेच आयोजन करू—
- 1.8 कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास—
Shirur News: पाबळ फाटा ते रिलायन्स पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता ठिक झाला नाही तर मनसे ‘रत्यावर रांगोळी काढणार’ किंवा ‘खडी मुख्याधिकार्यांच्या कार्यालयात टाकणार’ ?
Shirur News:ॲड. स्वप्नील किशोर माळवे यांनी आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकार्यांना दिले निवेदन !
Shirur News 23 March 2025: (Satyashodhak News Report)
Shirur News: पाबळ फाटा ते रिलायन्स पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता ठिक झाला नाही तर मनसे या ‘रत्यावर रांगोळी काढणार‘ किंवा या रस्यावरील ‘खडी मुख्याधिकार्यांच्या कार्यालयात टाकणार’ ? असा इशारा ॲड. स्वप्नील किशोर माळवे यांनी आक्रमक भूमिका घेत शिरुर नगरपालिका मुख्याधिकार्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना निवेदन—
या निवेदनाद्वारे मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील किशोर माळवे यांच्या वतीने रस्त्याच्या संदर्भात आक्रमक भूमिका घेत मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.’ हे खराब रस्त्याचे काम ३,४ दिवसात न झाल्यास सदरच्या रस्त्याच्या कडेला असणारी खडी उचलून मुख्याधिकारी कार्यालयात टाकणार’ अशी आक्रमक भूमिका मनसे शिरुरने घेतली आहे.
आधीही एक निवेदन दिले होते —

या निवेदनात पुढे म्हटले आहे की,
‘शिरूर शहरातील पाबळ फाटा ते रिलायन्स पेट्रोल पंप या अंतर्गत रस्त्याच्या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मुख्याधिकार्यांना संदर्भीय पत्र क्रमांक – १ देण्यात आले होते. त्या अनुषंगाने मुख्याधिकारी यांच्या विनंतीला मान देऊन सदरचे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.
Read more >>
Shirur Nagarpalika Parking : शिरुर नगरपालिकेचे पार्कींग बाबत अक्षम्य दुर्लक्ष्य!
अर्धवट केलेल्या रस्त्यामुळे अनेक अपघात—-
त्यावेळी मुख्याधिकार्यांनी सदरच्या बाबत तात्काळ कार्यवाही करून सदरचे रस्त्याचे काम चालू करून नागरिकांना तात्पुरता दिलासा देण्याचा बहाणा करून रस्त्याचे काम चालू झाले आहे. असे नागरिकांच्या व मनसेच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु सत्य परीस्थिती ही वेगळीच होती.
सदरचे रस्त्याचे काम गेली अंदाजे ८ महिने ठेका देऊन देखिल पूर्ण करण्यात आले नाही. सदरच्या अर्धवट केलेल्या रस्त्यामुळे अनेक अपघात होऊन अनेक नागरिक जखमी झाले आहेत. त्यापैकी ॲडव्होकेट स्वप्नील माळवे हे देखील आहेत . याबाबत देखील त्यांनी मुख्याधिकारी यांना फोनद्वारे संपर्क करून त्यांच्या डोळ्याला गाडीचा खडा लागून जखमी झाल्याबाबतचा संबधित घडलेला प्रकार कानावर टाकलेला होता.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
गाडी स्लीप होऊन अंबिका हॉटेलजवळ अपघात झाला होता —
तसेच काही दिवसांपूर्वी रस्त्याच्या कडेला साचलेली खडी यामध्ये गाडी स्लीप होऊन अंबिका हॉटेल या ठिकाणी एक मोठा भीषण अपघात झाला होता . मात्र सुदैवाने कोणताही अनुचित घटना घडली नाही. तसेच प्रीतम प्रकाश नगर याठिकाणी एक महिला व तिची मुलगी देखील एस टी बसच्या चाकाखाली जाता जाता वाचली.
Read more >>
सदरचे झालेले अपघात व होत असलेले अपघात हे संबधित ठेकेदार, संबंधित अधिकारी व नगरपालिका कार्यालयाच्या व मुख्याधीकार्यांच्या हलगर्जीपणामुळे होत आलेल्या आहेत. सदरच्या अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या असून नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी प्रवास करावा लागत आहे.
लहान मुलांना शाळेत सोडविण्यासाठी जेष्ठ नागरिक व मुले यांची वर्दळ —-
तसेच सदरच्या रस्त्यावरून लहान मुलांना शाळेत सोडविण्यासाठी, जेष्ठ नागरिक, व्यायामासाठी तसेच दैनंदिन कामकाज करण्यासाठी नागरिकांची सतत वर्दळ चालू असते. सदरची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली असून प्रशासनाचा यावर कोणताही अंकुश राहिलेला नाही. त्यामुळे संबंधित वाढत चाललेल्या घटनेला संबंधित ठेकेदार, संबंधित अधिकारी हे जबाबदार असल्याने त्यांचेवर तात्काळ कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित ठेकेदार याला काळ्या यादीत समाविष्ठ करण्यात यावे, संबधित अधिकारी यांनी आपले कामात कसूर केल्याप्रकरणी वरिष्ठ कार्यालयास कार्यवाही अहवाल त्वरित पाठविण्यात यावा.
Read more >>
रस्यावर प्रतिकात्मक रांगोळी स्पर्धेच आयोजन करू—
तसा शेरा आपल्या रोजनाम्यात नमूद करावा. संबंधित रस्त्याच्या संदर्भात येत्या ३ – ४ दिवसात कारवाई न झाल्यास संबधित रस्त्याच्या बाबत संदर्भीय पत्र क्रमांक १ अन्वये खड्ड्यामध्ये “रांगोळी स्पर्धा” यांचे आयोजन करून निषेध नोंदविला जाईल. अथवा रस्त्यावरील संपूर्ण पडलेली खडी उचलून मुख्याधिकार्यांच्या कार्यालयात टाकून निषेध नोंदविण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे या निवेदनात म्हटले आहे. तसेच संदर्भीय रस्त्यात काहीही अनर्थ घडल्यास वा अपघात झाल्यास त्यास सर्वस्वी मुख्याधिकारी व त्यांच्या कार्यालयास जबाबदार धरण्यात येईल.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास—
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास देखील मुख्याधिकारी व त्यांचे कार्यालय जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी. अशा आशयाचे निवेदन 21 मार्च रोजी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. स्वप्नील माळवे यांच्या वतीने मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांना देण्यास आले आहे.
1 thought on “Shirur News: पाबळ फाटा ते रिलायन्स पेट्रोल पंपापर्यंतचा रस्ता ठिक झाला नाही तर मनसे ‘रत्यावर रांगोळी काढणार’ किंवा ‘खडी मुख्याधिकार्यांच्या कार्यालयात टाकणार’ ?”