
Contents
- 1 ब्रेकिंग न्यूज: १० वर्षाच्या मुलीचे अपहरण; शिरुर पोलिसांची जलद कारवाई, तीन आरोपी अटकेत!
ब्रेकिंग न्यूज: १० वर्षाच्या मुलीचे अपहरण; शिरुर पोलिसांची जलद कारवाई, तीन आरोपी अटकेत!
ब्रेकींग न्युज : अपह्त 10 वर्षीय मुलीला बेलापूर मुंबई येथे नातलगांकडे ठेवले होते!
शिरुर,दिनांक २३ मार्च २०२५: ( सत्यशोधक न्युज रिपोर्ट )

ब्रेकिंग न्यूज: १० वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते.मात्र शिरुर पोलिसांची जलद कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे.आरोपींनी 10 वर्षीय मुलीला बेलापूर, मुंबई येथे नातलगांकडे ठेवले होते. शिरुर पोलिसांकडुन सी सी टिव्ही व तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढण्यात आला.नंतर बेलापूर मुंबई येथे शिताफीने आरोपींना थांगपत्ता लागु न देता पकडण्यात आले.शिरुर पोलिसांनी पुन्हा एकदा ,’ धडाकेबाज एक्शन ‘ केली आहे.शिरुर मधील नागरिक पोलिसांचे अभिनंदन करत आहेत.
Read more >>
शिरुर तालुक्यात 2,66,200 रुपये किमतीचा मुरुम गेला चोरीला !
शिरुर,जोशीवाडी, शिरुर येथे १३ मार्च २०२५ रोजी सकाळी ७ ते दुपारी १.३० दरम्यान १० वर्षाच्या बालिकेचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक 182/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 137(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
Read more >>
शिरुर पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी नितेश थोरात, रविंद्र आव्हाड, विजय शिंदे यांच्या विशेष पथकाला तपासाचे आदेश दिले. तपासादरम्यान १०० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली.तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपींचा माग काढण्यात आला.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
आरोपींमध्ये लताबाई बशीर काळे, आकाश बशीर काळे, आणि सुप्रिया उर्फ रॅम्बो आकाश काळे यांचा समावेश आहे. त्यांनी अपहृत मुलीला बेलापूर, मुंबई येथे नातलगाकडे ठेवले होते. मुलगी त्यांचीच असल्याचे सांगत तिला दवाखान्यात न्यायचे आहे, असे भासवण्यात आले.
Read more >>
शिरुर पोलिसांचे नीरज पिसाळ आणि महिला पोलिस अंमलदार गीता सुळे हे देखील तपास पथकात सहभागी होते. पोलिसांनी आरोपींना बेलापूर, मुंबई येथे शोधून काढले आणि अटक केली. या तपासात वरिष्ठ पोलिस अधिकारीही सहभागी होते.
शिरुर पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे मुलीची सुखरूप सुटका झाली असून आरोपींना अटक करण्यात यश आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई ओलिस अधिक्षक पंकज देशमुख,अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी,शिरुर उपविभाग प्रशांत ढोले,पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, नितेश थोरात, रविंद्र आव्हाड, विजय शिंदे ,नीरज पिसाळ, महिला पोलिस अंमलदार गीता सुळे या पोलीस पथकाने पार पाडली आहे.