
Contents
- 1 Shirur Iftar Party News:शिरुर पोलिसांच्या कडुन इफ्तार पार्टी चे आयोजन !
- 1.1 Shirur Iftar Party News: पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांचा नागपुर घटनेच्या पार्शभुमीवर शिरुर मधे एकोप्याचा,’संदेश ‘ !
- 1.2 भारतीय जनमाणस हे मुलभुत स्वरुपात धर्मनिरपेक्ष वृत्तीचे—
- 1.3 शिरुर शहरात धर्मनिरपेक्षतेची परंपरा—
- 1.4 एकात्मता ,अखंडता तोडण्याचे मनसुबे !
- 1.5 जग विश्वयुद्धाच्या उंबरठ्यावर–
- 1.6 शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टी—
- 1.7 खास भेट:
Shirur Iftar Party News:शिरुर पोलिसांच्या कडुन इफ्तार पार्टी चे आयोजन !
Shirur Iftar Party News: पोलिस निरिक्षक संदेश केंजळे यांचा नागपुर घटनेच्या पार्शभुमीवर शिरुर मधे एकोप्याचा,’संदेश ‘ !
Shirur Iftar Party News 24 March 2025:
(Satyashodhak News Report)
Shirur Iftar Party News:शिरुर पोलिसांच्या कडुन इफ्तार पार्टी चे आयोजन दिनांक 23 मार्च रोजी करण्यात आले.यावेळी शिरुर पोलिस स्टेशनचे पोलीस निरिक्षक श्री.संदेश केंजळे यांनी नागपुर घटनेच्या पार्शभुमीवर शिरुर मधे एकोप्याचा ‘संदेश ‘ दिला आहे.या कार्यक्रमाला शिरुर शहरातील विविध जाती,धर्माचे लोक उपस्थित होते.
भारतीय जनमाणस हे मुलभुत स्वरुपात धर्मनिरपेक्ष वृत्तीचे—
मुस्लीम धर्मीयांसाठी रमझान महिना हा महत्त्वाचा धार्मिक उत्सव व प्रार्थनेचा असतो.भारतीय संविधानाने ,’ धर्मनिरपेक्षता ‘ स्वीकारलेली आहे.भारतीय जनमाणस हे मुलभुत स्वरुपात धर्मनिरपेक्ष वृत्तीचे आहे.त्याचा पुरावा हा आहे की आजही भारतात जगातील सर्व धर्माचे लोक अस्तित्वात आहेत.जगातील इतर कोनत्याही देशापेक्षा भारतात आजही प्रत्येक धर्माच्या लोकांना जीवन जगणे सुसह्य वाटते.हे वास्तव आहे.त्याचा मुळ गाभा हा भारतीय समाज्याची मानसिक ,अध्यात्मिक जडणघडण व भारतीय संविधान हे आहे.
Read more >>
जागतिक महिला दिन: शिरूर पोलीस ठाण्यात महिला सशक्तीकरणाचा अनोखा उत्सव संपन्न !
शिरुर शहरात धर्मनिरपेक्षतेची परंपरा—
शिरुर शहरात धर्मनिरपेक्षतेची परंपरा अबाधित आहे.परंतु राज्यपातळीवर, देशपातळीवर आज धोकादायक परिस्थिती येवुन ठेपली आहे.विशेषतः ती धर्मसंबंधात आहे.भारत,पाकिस्थान, बांगलादेश हे तीन देश धार्मिक आधारावर विभागले गेले. हा इतिहास दुर्दैवी आहे.देशाची फाळणी झाली.हे आजही सहन होत नाही.पण झाली.मात्र जगाचा इतिहास हा जगाचा राजकीय नकाशा सतत बदलण्याचा इतिहास आहे.
एकात्मता ,अखंडता तोडण्याचे मनसुबे !
आजच्या भारतात काही परकीय शक्ती,एजंट भारताची एकात्मता ,अखंडता तोडण्याचे मनसुबे बाळगुन नेहमी असतात.परंतू धार्मिक असो वा सामाजिक असो.भारतीय समाजाने ते सफल होवु दिले नाहीत.ही महत्वाची बाब आहे.याचे कारण अशाच मानसिकतेमधे आहे.या मानसिकतेचा प्रत्यय शिरुर पोलिसांकडुन येतो.ही सकारात्मक बाब ठरते. कोनत्याही अल्पसंख्यांक समुहांना भारतात असुरक्षित वाटले नाही.कारण भारतातील सैनिक व पोलीस सुद्धा मुळ असलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या वातावरणातुन घडत असतात.तो भारतीय माणसाचा एक स्थायिभाव दर्शवतो.
Read more >>
जग विश्वयुद्धाच्या उंबरठ्यावर–
याचीच सध्याच्या वर सांगितलेल्या तीन देशांमधे आवश्यकता आहे.जग विश्वयुद्धाच्या उंबरठ्यावर आहे.अशावेळी वर उल्लेख केलेल्या या तीन देशांमधे जगातील तीस टक्के लोकसंखा राहते.म्हणुन या देशातील शांतता जगाला सुद्धा तिसर्या महायुद्धापासुन परावृत्त करु शकते.एवढे महत्व या देशांतील धार्मिक सलोख्याला आहे.
शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने इफ्तार पार्टी—
त्याच दृष्टिकोनातुन
शिरुर पोलीस स्टेशनच्या वतीने दिनांक 23/03/2025 रोजी 6:45 वाजण्याच्या सुमारास बाजार मस्जिद,शिरूर येथे रमजान महिन्याच्या अनुषंगाने मुस्लिम समाजाकरिता रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात केले होते.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २७ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
सदर इफ्तार पार्टी करिता शिरूर शहरामधील प्रतिष्ठित नागरिक माजी उपनगराध्यक्ष जाकिरखान पठाण , मौलाना कैसर ,मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद , माधव सेनेचे रवींद्र सानप ,अल बैतुल माल कमिटीचे फिरोजभाई बागवान ,भाजपाचे प्रवीण मुथा , प्रवासी संघाचे अनिल बांडे , बाजार समितीचे माजी सचिव दिलीप मैड , मनसेचे शहराध्यक्ष ॲड . आदित्य मैड , रवि लेंडे , आखिल भारतीय मराठा महासंघाच्या शोभना पाचंगे , शशिकला काळे ,उद्योजिका सविता बोरुडे , खिदमत फाउंडैशनचे मुश्ताक शेख , शिक्षण मंडळाचे माजी सदस्य प्रवीण गायकवाड , राजेंद्र खेतमळीस ,गोपीनाथ पठारे , फिरोज शिकलगार , शिवाजी औटी ,शिरूर पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार आदी उपस्थित होते.
Read more >>
रक्तदान शिबिराचा स्तुत्य उपक्रम शिरुर पोलिसांकडुन 26 जानेवारीला !
तसेच नुकताच नागपूर येथे झालेला हिंसाचार घटनेच्या अनुषंगाने सदर इफ्तार पार्टीमध्ये जातीय सलोखा राहावा.तसेच दोन समाजात भाईचारा राहण्याचा दृष्टीने सातत्याने शिरूर पोलीस स्टेशन च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते.त्याचाच एक भाग हा कार्यक्रम आहे.
शिरूर पोलीस स्टेशन च्या वतीने पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,’ शिरुर शहराची सलोख्याची व एकोप्याची परंपरा अबाधित राहण्यासाठी कटिबध्द राहूया.तसेच रोजे हे सर्वाना शांतीचा माणूसकीचा संदेश देतात.’