
Contents
- 1 मार्क्सवाद म्हणजे काय?
- 1.1 मार्क्सवाद सामान्य माणसाला सोप्या भाषेत समजुन देण्याचा प्रयत्न !
- 1.2 मार्क्सवादाची मूलभूत तत्त्वे कोनती?—-
- 1.3 कार्ल मार्क्स यांचा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत (Theory of Surplus Value):
- 1.4 कार्ल मार्क्स: भांडवलशाहीचा नाश करणे आणि समाजवादाची स्थापना करणे आवश्यक-
- 1.5 ‘धर्म’ ही जनतेसाठी अफू म्हणजे एक नशा असते.(Religion is the Opium of the Masses)
- 1.6 मार्क्सवादाचा प्रभाव कुठे पडला?—-
- 1.7
- 1.8 खास भेट:
- 1.9 निष्कर्ष—
मार्क्सवाद म्हणजे काय?
मार्क्सवाद सामान्य माणसाला सोप्या भाषेत समजुन देण्याचा प्रयत्न !
मार्क्सवाद हे एक तत्वज्ञान आहे.एक विचारधारा आहे. हा विचार कार्ल मार्क्स (1818-1883) व फ्रेडरिक एंगेल्स (1820-1895) यांनी 19 व्या शतकात जगा समोर मांडला . हा विचार समाजाच्या वर्गसंघर्षावर आधारीत (Class Struggle) आहे.तो शोषणविरहित, समतावादी समाज निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. मार्क्सवाद केवळ एक राजकीय विचारपद्धती नसून तो समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि इतिहास यांचा एक सखोल अभ्यास आहे.
मार्क्सवादाची मूलभूत तत्त्वे कोनती?—-
1. वर्गसंघर्ष (Class Struggle):
कार्ल मार्क्स यांच्या मते, समाजात दोन प्रमुख वर्ग असतात –
2.बुर्झ्वा (भांडवलदार वर्ग) :
याच्या हातात उत्पादनाची सर्व साधने (मशीन, फॅक्टरी, जमीन) असतात.
2.सर्वहारा (कामगार वर्ग) –
हा श्रम करून भांडवलदारांकडे असणारी मालमत्ता निर्माण करतो .
कार्ल मार्क्सच्या यांच्या मते जगाचा इतिहास हा या दोन वर्गांमधील संघर्षाचा इतिहास आहे.
कार्ल मार्क्स यांचा अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत (Theory of Surplus Value):
मार्क्स यांच्या मते मजूर/श्रमीक/कामगार /कष्टकरी हा त्यांच्या मजुरीपेक्षा जास्त मूल्य निर्माण करतो. पण ते भांडवलदार मालक तो हडप करतात. यालाच ‘अतिरिक्त मूल्य‘ असे मार्क्स म्हणतात.कार्ल मार्क्स यांच्या मते हेच शोषणाचे मूळ आहे.
कार्ल मार्क्स: भांडवलशाहीचा नाश करणे आणि समाजवादाची स्थापना करणे आवश्यक-
मार्क्सवादी विचारसरणी सांगते की भांडवलवाद हा त्यातील स्वतःच्या अंतर्गत परस्पर विरोधामुळे कोसळेल !मजूर वर्गाची क्रांती होवुन समाजवादाची (Socialism) व्यवस्था स्थापन होईल .पण ही प्रक्रिया इथे थांबणार नाही.तर अखेरीस ही व्यवस्था ‘साम्यवाद‘ (Communism) मध्ये रूपांतरित होईल. जिथे वर्गसंघर्ष नष्ट होईल. सर्वांना समान हक्क मिळतील.
‘धर्म’ ही जनतेसाठी अफू म्हणजे एक नशा असते.(Religion is the Opium of the Masses)
कार्ल मार्क्स यांच्या मते, धर्म हा शोषितांचे लक्ष वास्तविक समस्यांपासून दूर ठेवण्यासाठीचे एक प्रभावी साधन आहे. ते सांगतात,”धर्म हे लोकांसाठी अफू आहे,” म्हणजे तो लोकांना भ्रामक आशा देतो.त्यांना गुंगीत ठेवतो.त्यांना झोपवतो.
मार्क्सवादाचा प्रभाव कुठे पडला?—-
1.रशियन क्रांती (1917):
रशियाच्या व्लादिमीर लेनिन यांच्या नेतृत्वाखाली क्रांती झाली. या क्रांतीमध्ये मार्क्सवाद प्रत्यक्षात आला.असे सांगितले जाते.
2.चीन, क्युबा, व्हिएतनाम इ. देशांमध्ये समाजवादी व्यवस्था राबविण्यामधे मार्क्सवाद महत्वपूर्ण ठरला आहे.
3.भारतातील समाजवादी चळवळी, ट्रेड युनियन्स आणि डावे राजकारण मार्क्सवादाने प्रभावित आहे.
टीका आणि आव्हाने—
• मार्क्सवादाला अनेकांनी ‘अतिशयोक्तिपूर्ण‘व ‘अव्यवहार्य‘ मानले आहे.
• भांडवलवादी देशांनी मार्क्सवादाला व त्याच्या भाकितांना खोटे ठरवले.असे म्हटले जाते. कारण कारण भांडवलवाद कोसळला नाही.तर अजुनही टिकून का आहे?
• समाजवादी देशांमध्ये देखील भ्रष्टाचार, लोकशाही नसते ,एकचालकानुवर्ती व्यवस्था असते.डिक्टेटरशिप असते. आर्थिक मंदी सारख्या समस्याही निर्माण झाल्या.त्या का?
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २८ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
निष्कर्ष—
मार्क्सवाद हा एक क्रांतिकारी विचार आहे.तो शोषणाविरुद्धचा आवाज आहे. जरी त्याच्या अंमलबजावणीत काही त्रुटी झाल्या असतील तरी समाजात असमानता आणि शोषणावर चर्चा करण्यासाठी मार्क्सवाद एक महत्त्वाचे साधन आजही आहे.
—–
तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करावा.खाली कमेंट मध्ये आपले मत सांगा!…