
Contents
- 1 Shirur Women Suside News:
शिरुर मधे 18 वर्षे वयाच्या विवाहित तरुणीची आत्महत्या का घडली ?
- 1.1 Shirur Women Suside News: खास सत्यशोधक न्युज रिपोर्ट वाचा….
- 1.2 शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद करण्यात आल्यानुसार घटना अशी आहे—
- 1.3 ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास?
- 1.4 उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषीत केले—
- 1.5 शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद —
- 1.6 मात्र ‘सत्यशोधक न्युज ‘ने अधिक माहिती घेतली !
- 1.7 काही प्रश्न का निर्माण होतात?
Shirur Women Suside News:
शिरुर मधे 18 वर्षे वयाच्या विवाहित तरुणीची आत्महत्या का घडली ?
Shirur Women Suside News: खास सत्यशोधक न्युज रिपोर्ट वाचा….
Shirur Women Subside News : (Satyashodhak News Report)
Shirur Women Suside News:शिरुर मधे 18 वर्षे वयाच्या विवाहित तरुणीची आत्महत्या घडली ! तशी बातमी सत्यशोधक न्युज कडे प्राप्त झाली.शिरुर पोलिस स्टेशन मधे या तरुणीची ,’आत्महत्या‘(?) म्हणुन नोंद झाली. पण फक्त 18 वर्षे वय असलेली तरुण मुलगी आत्महत्या करणे ही काही सहज घटना नाही.पण वीटभट्टी कामगाराची पुतणी म्हणजे गरीबाची मुलगी ! गरीबाचा विचार करणारे आता कोणी क्वचित अपवाद राहीले आहेत! पण सत्यशोधक न्युज अशा लोकांचा आवाज उठवण्यासाठीच निर्माण झाला आहे. हे संबंधितांनी पक्के ध्यानात ठेवावे !
शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद करण्यात आल्यानुसार घटना अशी आहे—
दिनांक 24 मार्च 2025 रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास खबर देणार राजु रामदास टिपरे, वय -48 वर्षे, धंदा-विटभट्टी मजुरी, सध्या राहणार- पोतदार शाळेजवळ, रामर्लिंग रोड,शिरुर चालुका- शिरूर ,जिल्हा – पुणे ,मुळ राहणार – बान्सी,तालुका – पुसद, जिल्हा – यवतमाळ हे झोपेतुन उठुन विटभट्टी येथे कामास गेले. त्यावेळी त्यांची पुतणी अंजली गजानन टिपरे ,वय- 18 वर्षे ही देखील त्यांच्या सोबत आली होती. त्यानंतर सकाळी 09: 45 वाजण्याच्या सुमारास तिने त्यांना कामावर चहा करून आणुनही दिला. ती त्यांच्या राहत्या घरी निघुन गेली. त्यानंतर 10:30 वाजण्याच्या सुमारास खबर देणारे राजु टिपरे यांची मुलगी उषा ,वय 9- वर्षे ही रडत रडत विटभट्टी कडे आली. तिने त्यांना “दिदीने घराचा दरवाजा बंद केला असुन ती घराचा दरवाजा उघडत नाही” असे सांगितले.
ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास?
त्यावेळी राजू टिपरे व त्यांची पत्नी शितल असे ते घरी गेले.त्यांनी पाहीले असता घराचा दरवाजा बंद होता. त्यावेळी ते पुतणी अंजली गजानन टिपरे ,वय- 18 वर्षे हिला दरवाजा उघडण्यासाठी आवाज देवु लागले. पण आतून ती आवाज देत नसल्याने त्यांनी दरवाजा जोरात ढकलुन उघडला. तेव्हा घरामध्ये वरती असणा-या लाकडाला ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेतल्याचे दिसुन आले. त्यावेळी त्यांनी तिला खाली काढले.
उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषीत केले—
नंतर हे सर्व त्यांनी वीटभट्टी मालक विजय रामदास शिर्के यांना फोन करून कळवले. त्यानंतर मालक विजय शिर्के तेथे आले.नंतर त्यांनी पुतणी अंजली गजानन टिपरे हिला ॲम्बुलन्स मधुन उपचारांसाठी ग्रामीण रुग्णालय शिरूर येथे घेवुन गेले. तेथील डॉक्टरांनी तिला तपासले.त्यानंतर तेथील वैद्यकिय अधिकार्यांनी ती उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषीत केले.
शिरुर पोलिस स्टेशन मधे नोंद —
याची नोंद ( 24/03/2025 रोजी 14:44 वाजता, एन्ट्री नबर- 43/ 2025) व शिरूर पोलिस स्टेशन मधे 32/2025 ; भारतीय न्याय संहिता कायदा कलम एस एस 194 प्रमाणे नोंद केली आहे.
मात्र ‘सत्यशोधक न्युज ‘ने अधिक माहिती घेतली !
शिरुर पोलिस स्टेशन मधे दाखल अंमलदार पोलिस हवालदार शिंदे यांनी केली. पुढील तपासी अंमलदार पोलिस हवालदार श्री. राऊत हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरीक्षक श्री संदेश केंजळे, शिरूर पोलीस स्टेशन यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.असे समजते.
मात्र ‘सत्यशोधक न्युज ‘ने अधिक माहिती घेतली तेव्हा या तरुणीला तिच्या मुळ गावी अंत्यविधीसाठी पाठवण्यात आले आहे. ही तरुणी विवाहित आहे.तिचा विवाह एका अपंग व्यक्तीबरोबर करुन देण्यात आला होता. या विवाहाला साधारण तीन महिने झाले होते.तिचा पती तिला मारहाण करत असे.(कारण?) एकदा अंगावर मारहानीच्या खुणाही दिसल्या होत्या.त्या अवस्थेत ती माहेरी आली होती. नंतर गेली दोन महिने ती तिच्या चुलत्याकडे शिरूरला येवुन रहात होती.
काही प्रश्न का निर्माण होतात?
तिची आत्महत्या शिरूर ला चुलत्याकडे झाली आहे. माहेरी मुळ गावी झाली नाही. इथे ती दोन महिन्यांपासुन रहात होती.मग आत्महत्येच्या दिवशी असे काय घडले आहे की तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला?नंतर असेही समजते की तिच्या नवर्याकडील लोकांनी अंत्यविधीला येण्याचे नाकारले आहे.त्यामागचे कारण काय आहे? पोस्ट मोर्टम रिपोर्ट काय सांगतो? दरम्यानच्या काळात ती आपला पती किंवा अन्य कोणाच्या संपर्कात होती.हे पाहण्यिसाठी ती मोबाईल फोन वापरत होती की नाही? असल्यास आत्महत्येच्या दिवशी व आधी तिचे कुणाशी काही बोलणे झाले होते का? कारण ती इतक्या लांब चुलत्याकडे सुरक्षित असेल तर अचानक कशाची भिती,निराशा किंवा विरह तिला जाणवत होता?यांची नोंद व काही तपास शिरूर पोलीसांनी केला आहे की नाही?
फोन वापरत असेल तर तो ताब्यात का घेतला नाही? त्यातुन आत्महत्येच्या कारणांचा उलगडा जास्त होवु शकतो.हे शिरूर पोलीसांना माहित नाही का? त्याअंगाने शिरुर पोलिसांनी तपासणी करणे गरजेचे नाही का? शिरुर येथेच काही असे घडले का की तिला आत्महत्या करावी वाटली?
शिरुर मधील तिच्या वास्तव्यात नेमके काय काय घडले?तिचा पती शिरुलला आला होता का?इतर कोणी आले होते का?
एकुण एक बाब महत्वपुर्ण असते हत्या किंवा आत्महत्या घडण्याआधी बराच काळ एक एक प्रक्रिया घडते.तशी ती सहजासहजी घडत नाही. माणसाला सर्वात प्रिय स्वतःचा जीव असतो.हे बिरबलाने अकबराच्या दरबारात प्रयोग करून दाखवले होते.
अपेक्षा एवढीच आहे की तरुणीच्या मृत्युला सासरकडचे किंवा माहेरकडचे लोक कोणी जबाबदार आहेत का?नाहीतर वीटभट्टी कामगाराची मुलगी म्हणजे गरीबाची मुलगी म्हणुन नेहमी प्रमाणे जास्त तपास न होता आत्महत्या म्हणुन नोंद होवुन विषय इथेच संपवला जायचा ?
कारण गरीबाकडे आजकाल कोणी लक्ष देणारे राहिले नाही ना ! म्हणुन !