Shirur Crime; सी टी बोरा कालेज समोरुन महिलेचे 1 लाख 28 हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र चोरट्यांनी खेचुन नेले.
Shirur Crime: शिरूर शहरातील सी. टी. बोरा कॉलेजसमोर एका महिलेच्या गळ्यातील 1 लाख 28 हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी खेचून नेले. या धक्कादायक घटनेमुळे संबंधित महिला भीती व मानसिक तणावाने आजारी पडली. अखेर, त्यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.
Shirur Crime; सी टी बोरा कालेज समोरुन महिलेचे 1 लाख 28 हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र चोरट्यांनी खेचुन नेले आहेत.या घटनेचा धसका घेत महिला भितीने व काळजीने आजारी पडली ! शेवटी शिरूर पोलिस स्टेशन मधे जावुन पिडीत महिलेने फिर्याद नोंदवली आहे. शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
सविस्तर हकीकत अशी आहे—
सविस्तर हकीकत अशी आहे. दिनांक 18 मार्च 2025 रोजी सायंकाळी 7:45 वाजण्याच्या सुमारास शिरूर, चालुका- शिरूर, जिल्हा – पुणे, सिटी बोरा कॉलेजचे समोर ही घटना घडली आहे.
फिर्यादी नंदा राजाराम घोलप, वय- 58 -वर्ष, व्यवसाय- गृहिणी,राहणार -गुजरमळा,शिरूर,तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे या रोडने चालत जात होत्या.त्यावेळी दोन अनोळखी इसम एका काळ्या रंगाच्या स्कुटी गाडीवरून तेथे आले.त्यांच्या गळ्यातील खालील वर्णनाचे व किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र जबरदस्तीने खेचले.
जबरी चोरी करून मगर हॉस्पीटल बाजुकडे स्कुटी वरून पळून गेले.म्हणुन त्यांनी त्या दोन अनोळखी चोरट्यांविरुद्ध कायदेशीर फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन येथे दिली आहे.
गेलेल्या मालाचे वर्णन पुढील प्रमाणे आहे –
1) 1,20,000/ रूपये किमंतीचे 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र ; त्याला खालील बाजुस दोन वाट्या असलेल्या
त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र चोरी झाल्यापासुन त्या आजारी होत्या. आज त्यांना बरे वाटले.म्हणुन त्या त्यांची मुलगी रूपाली प्रशांत कर्डीले,वय- 32 वर्षे राहणार – बाफना मळा, तालुका – शिरूर,जिल्हा – पुणे हिला सोबत घेवुन तक्रार देण्यासाठी त्या शिरुर पोलिस स्टेशन मधे आल्या.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २८ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?
शिरुर पोलीस स्टेशन मधे अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कायदा कलम 304 (2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सब इन्स्पेक्टर चव्हाण हे करत आहेत.
दाखल अधिकारी सहायक पोलीस निरिक्षक श्री. कारंडे हे आहेत.तर प्रभारी अधिकारी श्री.संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक,शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
डॉ. नितीन पवार (D.M.S. – Management)
पत्रकार, संपादक, लेखक, ब्लॉगर व मानव अधिकार कार्यकर्ते.
शिरूर (पुणे) येथील रहिवासी.
सत्य, निष्पक्ष आणि समाजाभिमुख पत्रकारितेद्वारे ग्रामीण भागाचा आवाज बुलंद करण्यासाठी कार्यरत.
📧 np197512@gmail.com | 🌐 www.shirurnews.com
1 thought on “Shirur Crime; सी टी बोरा कालेज समोरुन महिलेचे 1 लाख 28 हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र चोरट्यांनी खेचुन नेले.”