
Contents
- 1 Shirur Taluka Crime News: लागोपाठ महिलेचे सोन्याचे गंठन हिसवावुन चोरटे पसार!
- 1.1 Shirur Taluka Crime News: दुसरी घटना सविंदणे येथील!
- 1.2 सविस्तर घटना अशी—-
- 1.3 फिर्यादी सौ. वत्सलाबाई दत्तात्रय सुके, 77 वर्षीय—
- 1.4 गेलेला माल पुढील प्रमाणे –
- 1.5 शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल —
- 1.6
- 1.7 खास भेट:
Shirur Taluka Crime News: लागोपाठ महिलेचे सोन्याचे गंठन हिसवावुन चोरटे पसार!
Shirur Taluka Crime News: दुसरी घटना सविंदणे येथील!
Shirur Taluka Crime News 29 March 2025:
(Satyashodhak News Report)
Shirur Taluka Crime News: लागोपाठ महिलेचे सोन्याचे गंठन हिसवावुन चोरटे पसार झाले आहेत.ही दुसरी घटना शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील आहे.यात वत्सलाबाई दत्तात्रय सुके, वय -77 वर्षें यांचा सोन्याचा 1 लाख 10 हजार रुपये किमतीचा गंठण चोरट्यांनी खेचुन ते पसार झाले आहेत.
सविस्तर घटना अशी—-
सविस्तर घटना अशी आहे.दिनांक 27 मार्च 2025 रोजी सांयकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास संविदणे,तालुका – शिरूर, जिल्हा – पुणे गावच्या हद्दीतील मलठण-नारायणगाव अष्टविनायक हायवे रोडवरील ‘बंटी हॉटेल’ च्या पुढे धुमस्थळकडे जाणारा कच्चा रोड आहे.त्याच्या जवळ दोन अज्ञात इसम अंदाजे वय 25 ते 30 वर्षे वयाचे आले. त्यांनी जबरदस्तीने हिसकावून चोरून घेतले.नंतर ताबडतोब त्यांनी आणलेल्या मोटार सायकलवरुन ते पळून गेले आहेत.
फिर्यादी सौ. वत्सलाबाई दत्तात्रय सुके, 77 वर्षीय—
म्हणून फिर्यादी सौ. वत्सलाबाई दत्तात्रय सुके, वय -77 वर्षे, व्यवसाय -शेती ,राहणार – खडकवाडी, पोस्ट- लोणी, धामणी, तालुका – आंबेगाव जिल्हा – पुणे.
यांनी त्या दोन अनोळखी इसमांच्या विरुध्द शिरुर पोलिस स्टेशन मधे फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
गेलेला माल पुढील प्रमाणे –
1) 1,10,000/- रूपये किंमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मणी व दोन वाट्या असलेले गंठण.
हे दोन अज्ञात इसम फिर्यादी यांच्या समोर आले तर त्या त्यांना ओळखु शकतात. असे फिर्यादी चे म्हणणे आहे. तसेच त्यांचे सोन्याचे गंठण सापडले तर तेही त्या ओळखतील असे सांगतात.
शिरुर पोलीस स्टेशन मधे गुन्हा दाखल —

शिरुर पोलीस स्टेशन मधे भारतीय न्याय संहिता कायदा कलम 309 (4), 3 (5) नुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २८ मध्ये काय वाचाल ..👇
• भविष्यातील धोक्यांचा मुकाबला करण्यासाठी सज्ज रहा – डा.उमेश बगाडे!
• काम्ब्रेड शरद पाटील यांची सौदर्यशास्त्र संदर्भातील मांडणी….
• कांब्रेड शरद पाटील यांची ग्रंथ संपदा कोठे मिळेल ?.👇
पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक श्री. कारंडे हे करत आहेत.तरदाखल अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक श्री.कारंडे हे आहेत. प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.