
Contents
- 1 Machine Learning Deep Learning: मशिन लर्निंग आणि डिप लर्निंग मधील फरक काय?
Machine Learning Deep Learning: मशिन लर्निंग आणि डिप लर्निंग मधील फरक काय?
Machine Learning Deep Learning: AI संबधित जास्त महत्त्वाची क्षेत्रे—
प्रस्तावना :
Machine Learning Deep Learnings तंत्रज्ञान विशेषता AI क्षेत्रात वेगाने प्रगती होत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व त्याच्याशी संबंधित अनेक क्षेत्रे जास्त महत्त्वाची ठरत चालली आहेत. यामधील मशिन लर्निंग (Machine Learning – ML) व डिप लर्निंग (Deep Learning – DL) या दोन महत्त्वाच्या उपशाखा AI च्या विकसित होत आहेत.बर्याच वेळा या दोन संकल्पना एकसारख्या वाटतात. पण तसे नाही.दोन्हींमधे मूलभूत फरक आहे. या लेखात आपण मशिन लर्निंग आणि डिप लर्निंग यांच्यामधील महत्त्वाचे फरक जाणुन घेऊयात.
मशिन लर्निंग म्हणजे काय?

मशिन लर्निंग हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) चे एक उपक्षेत्र आहे. यामधे संगणक प्रणाली स्वतः शिकण्यास सक्षम केली जाते किंवा ती होते. यामधे अल्गोरिदमच्या मदतीने डेटा विश्लेषण करतात.त्यातुन काही निष्कर्ष काढतात. त्यावरर निर्णय घेतले जातात.
Read more >>
DeepSeek काय आहे? कृत्रीम बुद्धीमत्तेच्या क्षेत्रात चीनचे अमेरिकेला आव्हान !
मशिन लर्निंग कसे काम करते?
1. डेटा संकलन: यात मोठ्या प्रमाणात डेटा जमा केला जातो.
2. डेटा प्रक्रिया: यात अनावश्यक डेटा काढून टाकतात. डेटा व्यवस्थाापित केला जातो.
3. मॉडेल प्रशिक्षण: यात योग्य अल्गोरिदम निवडला जातो. त्यानुसार मॉडेल ट्रेन करतात.
4. मॉडेल चाचणी: यात नवीन डेटानुसार मॉडेलची अचूकता तपासतात.
5. निर्णय घेणे: यामधे नव्या परिस्थितीत व पद्धतीने हे मॉडेल निर्णय घेते.
मशिन लर्निंगचे प्रकार:
मशिन लर्निंगचे प्रमुख तीन प्रकार आहेत–
1. सुपरवाइज्ड लर्निंग (Supervised Learning) – यात डेटा लेबल करतात. त्यानुसार मशीन शिकते. (उदा. ई-मेल स्पॅम फिल्टरिंग)
2. अनसुपरवाइज्ड लर्निंग (Unsupervised Learning) –यात डेटा लेबल केलेला नसतो पण मशीन पॅटर्न शोधते. (उदा. कस्टमर सेगमेंटेशन)
3. रिइनफोर्समेंट लर्निंग (Reinforcement Learning) –यात मशीनला एक उद्दिष्ट देतात. योग्य कृतींसाठी बक्षीस देखील देतात. (उदा. शतरंज खेळणारा AI)
डिप लर्निंग म्हणजे काय?

डिप लर्निंग हे मशिन लर्निंगचे पुढील प्रगत स्वरूप असते.यात न्यूरल नेटवर्क्स (Neural Networks) वापरतात. मानवी मेंदूची कसा कार्य करतो. तसा संगणक मल्टी-लेअर न्यूरल नेटवर्क्स च्या सहाय्याने शिकतो.
Read more >>
डिप लर्निंग कसे कार्य करते?
1. मल्टी-लेअर न्यूरल नेटवर्क्स तयार करणे.
2. प्रत्येक पातळीवर डेटा प्रक्रिया करणे
3. अनेक पातळीवर विशेष नमुने ओळखले जातात.
4. स्वतः सुधारणा करत अचूक निर्णय घेणे.
डिप लर्निंगच्या काही महत्त्वाच्या अॅप्लिकेशन्स:

• चेहऱ्याची ओळख पटवणे (Face Recognition)
• नैसर्गिक भाषा प्रक्रिया (Natural Language Processing – NLP)
• स्वयं चालित वाहने (Self-Driving Cars)
• आरोग्य क्षेत्रातील निदान (Medical Diagnosis)
मशिन लर्निंग आणि डिप लर्निंग मधील महत्त्वाचे फरक-
मशिन लर्निंग आणि डिप लर्निंग कुठे वापरावे?
• डेटा मर्यादित असताना व अल्गोरिदम साधे असेल , तर मशिन लर्निंग हा उत्कृष्ट पर्याय ठरतो .
• मोठ्या प्रमाणात डेटा व जटिल समस्या असताना डिप लर्निंग प्रभावशाली असते.
समारोप —
मशिन लर्निंग व डिप लर्निंग हे दोन्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचाच भाग आहेत.पण डिप लर्निंग हे जास्त प्रगत आहे. मशिन लर्निंग करताना मानवी हस्तक्षेप आवश्यक ठरतो. तर डिप लर्निंग स्वयंचलितपणे शिकण्याची व निर्णय घेण्यास सक्षम होते. भविष्यात डिप लर्निंगमुळे अनेक विशेषत: औद्योगीक क्रांती व AI आधारित प्रणाली जास्त सक्षम ठरतील.