
Contents
- 1 सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी अभिषेक दादाभाऊ शेळके यांची बिनविरोध निवड !
- 1.1 सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षांकडुन ग्रामस्थांच्या वाढल्या आशा !
- 1.2 सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट—-
- 1.3 अगोदरचे अध्यक्ष सुनील अनंता सोनवणे यांचा राजीनामा—–
- 1.4 सोमेश्वर देवस्थान ट्रस्टची अनेक महत्त्वाची कामे मार्गी—-
- 1.5 ऐतिहासिक यात्रा सोहळा श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट भरवतो—-
- 1.6 महत्त्वाची कामे मार्गी लावणार- श्री. अभिषेक शेळके !—
सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी अभिषेक दादाभाऊ शेळके यांची बिनविरोध निवड !
सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षांकडुन ग्रामस्थांच्या वाढल्या आशा !
Shirur News 2 April 2025:(Satyashodhaknews News Report)
सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी अभिषेक दादाभाऊ शेळके यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे श्री सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षांकडुन ग्रामस्थांच्या आशा व अ पेक्षा वाढल्या आहेत.ते पिंपरी दुमाला या गावचे रहिवाशी आहेत.
सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट—-
सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट हे महाराष्ट्रातील लाखो लोकांच्या भक्तीचे श्रद्धास्थान पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान श्री क्षेत्र सोमेश्वर हे एक आहे. या देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी पिंपरी दुमाला गावचे सामाजिक कार्यकर्ते अभिषेक शेळके यांची निवड झाली आहे.
अगोदरचे अध्यक्ष सुनील अनंता सोनवणे यांचा राजीनामा—–
सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या सोमवारी झालेल्या बैठकीत या मावळते अध्यक्ष सुनील अनंता सोनवणे यांनी राजीनामा दिला होता.या रिक्त अन्यक्षपदाच्या झालेल्या जागेवरती नवीन अध्यक्ष नेमण्याबाबत विश्वस्त मंडळाची चर्चा झाली. या चर्चेमधे विश्वस्त मंडळामधे सर्वानुमते अभिषेक शेळके यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.
Read more >>
सोमेश्वर देवस्थान ट्रस्टची अनेक महत्त्वाची कामे मार्गी—-
श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट विश्वस्त मंडळामध्ये श्री. सुनील सोनवणे ,श्री. शेखर पाटेकर ,श्री. कैलास पिंगळे ,श्री. अरुण कळसकर, श्री. कैलास बडदे ,श्री. डॉ. श्रीकांत सोनवणे हे कार्यरत आहेत. सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट विकासाची अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावण्यात यशस्वी ठरले आहे.
ऐतिहासिक यात्रा सोहळा श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट भरवतो—-
महाराष्ट्रातील लाखो लोकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट, पिंपरी दुमाला येथील ऐतिहासिक यात्रा सोहळा जणु भक्तीचा महासागर बनतो. विविध जाती, धर्मातील लोकांना एकत्र आणून माणुसकी समृद्ध करण्याचा हा सोहळा ट्रस्ट साजरा करत असते. सोमेश्वर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून भक्तांना सुख सुविधा देण्याबरोबरच विविध सामाजिक उपक्रम देखील सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट पंचक्रोशी मध्ये नेहमी राबवित असते.
Read more >>
श्रीराम BCA / BCS महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीची विद्यापीठ संघात निवड !
महत्त्वाची कामे मार्गी लावणार- श्री. अभिषेक शेळके !—
सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर श्री. अभिषेक शेळके यांनी, ‘माझ्या अध्यक्ष पदाच्या काळामध्ये सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट व मंदिर परिसरातील महत्त्वाचे कामे मार्गे लावणार’ असल्याचे सांगितले आहे.
Read more >>
दिग्दर्शक, अभिनेते श्री.रामदास राऊत व्यावहारिक जीवनातही प्रगतीशिल !
श्री. अभिषेक शेळके यांच्या या निवडीचे सर्व स्तरातुन स्वागत करण्यात येत आहे.त्याचबरोबर त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.त्यामुळे आता नवनियुक्त अध्यक्ष श्री. अभिषेक शेळके यांची जबाबदारी वाढली आहे.
1 thought on “सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्षपदी अभिषेक दादाभाऊ शेळके यांची बिनविरोध निवड !”