
Contents
- 1 Shirur Taluka Crime News: शिरुर तालुक्यातील फाकटे येथे “जळीत कांड ?’
Shirur Taluka Crime News: शिरुर तालुक्यातील फाकटे येथे “जळीत कांड ?’
Shirur Taluka Crime News: जाणुन बुजुन ऊसाला लावली आग !
Shirur Taluka Crime News 5 April 2025:
(Satyashodhak News Report)
Shirur Taluka Crime News: शिरुर तालुक्यातील फाकटे येथे “जळीत कांड (?) झाल्याची बातमी सत्यशोधक न्युज ला प्राप्त होत आहे.जाणुन बुजुन ही ऊसाला आग लावली असल्याची पिडीता सौ.काळे यांनी शिरुर पोलिस स्टेशन मधे फिर्याद दाखल केली आहे.शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत.
Read more >>
सविस्तर बातमी अशी आहे-
सौ. सुमन पंढरीनाथ काळे ,वय -56 वर्षे, धंदा- शेती, राहणार -फाकटे, तालुका-शिरूर, जिल्हा-पुणे या पिडीत महिला आहेत.त्यांनी शिरूर पोलीस स्टेशन अंकित टाकळी हाजी पोलीस चौकी येथे हजर राहून फिर्यादी दिली आहे.
शिरुर तालुक्यातील फाकटे गावची घटना—
फाकटे गावी त्या व त्यांचे पती पंढरीनाथ गणपत काळे, नातु -गुरू प्रदीप काळे ,वय -13 वर्षे व नात कु. परी प्रदीप काळे, वय 9 -वर्षे असे एकत्र राहतात.
उसाला पाणी देण्यासाठी गेल्या होत्या—
ते शेती करून त्यावर त्यांच्या कुटुंबाची उपजिवीका करतात. त्यांच्या मालकीच्या फाकटे, तालुका- शिरूर, जिल्हा- पुणे येथील हददीत जमिन गट नंबर. 93/13 मध्ये एकुण एक एकर क्षेत्रामध्ये 04 महिन्याचा उभा लहान असलेला उस होता. उसाला पाणी देण्यासाठी पाण्याची पाईप लाईनही केलेली होती.
Read more >>
Shirur Taluka News: मेंढपाळाचा बकरी धुताना तळ्यात बुडुन दुर्दैवी मृत्यु!
खास भेट:
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक २९ मध्ये काय वाचाल ..👇
✅ रक्ताचे अर्ध्य…..
✅ अन्वेषण पद्धती….
✅ शरद पाटील यांची ग्रंथ संपदा. …
✅,शिवाजी,महाभारत….👇
काही तरी जळाल्याचा धुर दिसला–
दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी 10:00 वाजण्याच्या सुमारास त्या फाकटे येथील या शेतजमिन गट नंबर. 92/11 मध्ये असलेल्या क्षेत्रात उसाला पाणी देत होत्या. त माझे मालकीचे त्यांना फाकटे ,तालुका- शिरूर, जि्हा-पुणे येथील शेतजमिन गट नंबर. 39/13 मध्ये काही तरी जळयाल्याचा धुर दिसला. ते पाहण्यासाठी त्या तेथे गेल्या.तेव्हा त्यांच्या शेजारील बांधकरी बाळासाहेब धोंडीबा हिंगे व त्याचा मुलगा सचिन बाळासाहेब हिंगे दोन्ही राहतार-अवसरी बुद्रुक तालुका-आंबेगाव, जिल्हा- पुणे यांनी त्यांच्या मालकीच्या शेतातील उस कारखान्याला घालवल्या नंतर सदर क्षेत्रातील उसाच्या पाचटाला आग लावुन ते पेटुन दिले होते.
एक एकर उसाच्या पिकाला आग —-
त्यामध्ये फिर्यादी सौ.काळे यांच्या क्षेत्रातील एक एकर लहान उसाच्या पिकाला आग लागलेली होती. त्यावेळी तेथे योगेश महादु शिंदे, संदिप हुंडारे असे हजर होते.त्यांचा उस हा बाळासाहेब धोंडीबा हिंगे व त्याचा मुलगा सचिन बाळासाहेब हिंगे यांच्या बांधास लागुन असल्याने त्यांच्या शेतातील पाचटाची आग सौ.काळे यांच्या उसाला लागली.
Read more >>
जाणुन बुजुन आग लावली?—-
संपुर्ण उस जळुन जावु शकतो व फिर्यादीचे आर्थिक नुकसान होवु शकते. याची बाळासाहेब धोंडीबा हिंगे व त्याचा मुलगा सचिन बाळासाहेव हिंगे यांना माहिती असताना सुध्दा त्यांनी जाणुन बुजुन त्यांच्या उसाच्या जवळ स्वतःच्या शेतातील उसाच्या पाचटाला आग लावली.
50,000/- रूपयांचे नुकसान—
त्यामुळे सौ.काळे यांचा संपुर्ण एक एकर क्षेत्रातील उस व पाण्याच्या पाईप लाईनचे पाईप असे सदर आगीत जळाले.त्यांचे सर्व मिळुन अंदाजे 50,000/- रूपयांचे नुकसान झाले आहे. म्हणून त्यांनी शेजारील शेतजमीन असणारे शेतकरी बाळासाहेब धोंडीबा हिंगे व त्याचा मुलगा सचिन बाळासाहेब हिंगे, दोन्ही राहणार- अवसरी बुद्रुक, तालुका- आंबेगाव, जिल्हा- पुणे यांच्या विरूध्द कायदेशिर फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे दाखल केली आहे. आग लागली ती वेळ सकाळी 10:00 वाजण्याच्या सुमाराची आहे.
आरोपी –
1) बाळासाहेब धोंडीबा हिंगे
2) मुलगा सचिन बाळासाहेब हिंगे,दोन्ही राहणार राहणार- अवसरी बुद्रुक, तालुका- आंबेगाव, जिल्हा-पुणे
शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल —
शिरुर पोलिस स्टेशन मधे हा गुन्हा रजिस्टर नंबर
224/2025 असा आहे.आरोपींवर भारतीय न्याय संहिता कायदा कलम 326 (F) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दाखल अमंलदार पोलिस हवालदार श्री.आगलावे हे आहेत.पुढील तपासी अमंलदार पोलीस हवालदार श्री.आगलावे हे करत आहेत.हा तपास पोलीस निरिक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.