
Contents
Shirur News:112 क्रमांकाचा गैरवापर करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी युवकावर अदखलपात्र गुन्हा दाखल
—
Shirur News 10 April 2025 – (Satyashodhak News Report)

Shirur News:सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. होनेवाडी टाकळी हाजी येथून प्रसाद भानुदास देशमुख (रा. नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे – मुळ गाव जाखुरी, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) या व्यक्तीने खोट्या माहितीच्या आधारे 112 नंबरचा गैरवापर केल्याची घटना घडली आहे.
किडनॅप करून 5 लाख रुपयांची खंडणी मागितली?—
प्रसाद देशमुख याने आपल्या मोबाईल क्रमांक 9309953834 वरून गौरव हारदे (वरिष्ठ अधिकारी, रा. राहुरी, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांना फोन करून खोटी माहिती दिली की, शेतकरी नवनाथ शंकर होणे व इतर आठ जणांनी त्यांना किडनॅप करून 5 लाख रुपयांची खंडणी मागितली आहे.
Read more >>
सरकारी यंत्रणेची हालचाल झाली व पोलिस यंत्रणेचा वेळ व संसाधने वाया—
या खोट्या माहितीच्या आधारे प्रसाद देशमुख यांच्या कंपनीतील सहकारी पंकज शिंदे (रा. नारायणगाव) यांनी 112 नंबरवर कॉल करून तात्काळ मदत मागितली. यामुळे सरकारी यंत्रणेची हालचाल झाली व पोलिस यंत्रणेचा वेळ व संसाधने वाया गेली.
गुन्हा दाखल —
या प्रकरणात शिरूर पोलीस स्टेशनमध्ये पोलिस अंमलदार संतोष सुभाष बनसोडे यांच्या फिर्यादीवरून प्रसाद देशमुख याच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खास भेट …
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३० मध्ये काय वाचाल ..👇
• वैदिक धर्म व हिंदु धर्म
• शोषितांच्या मुक्तीच तत्वज्ञान उभारणारा लढवय्या
• प्राच्चविद्यापंडित काम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा
• मावळाई प्रकाशनची प्रकाशने….👇
पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांचे आवाहन—
शिरूर पोलीस स्टेशनचे संदेश केंजळे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, 112 नंबरवर केवळ खरी व आपत्कालीन माहितीच द्यावी, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. खोटी माहिती देणे हा गंभीर गुन्हा असून, अशा प्रकारांपासून सर्वांनी सावध राहावे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.