
Contents
- 1 Pune/Shirur News: शिरूरच्या 20 वर्षीय युवकाचा ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू; शिरूर पोलिसांकडून तपास सुरू !
Pune/Shirur News: शिरूरच्या 20 वर्षीय युवकाचा ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू; शिरूर पोलिसांकडून तपास सुरू !
Pune/Shirur News: पुणे, 8 मार्च 2025 —
(Satyashodhak News Report)
Pune/Shirur News शिरूर येथील 20 वर्षीय युवक भाऊसाहेब गव्हाणे याचा ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, सदर प्रकरणाची नोंद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे. पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार तपास करत आहेत.
ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू—-
शिरूर तालुक्यातील एका 20 वर्षीय युवकाचा ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. भाऊसाहेब पाटलोबा गव्हाणे (वय 20 वर्षे, रा. शिरूर, पुणे) असे मयत तरुणाचे नाव आहे.
शिरूर पोलीस स्टेशनचे पोलिस हवालदार पी. एस. भगत यांना ही माहिती पोलिस हवालदार चव्हाण (ससून ओपीडी) यांच्या माध्यमातून मिळाली. त्यांना ही माहिती जमादार चिचने यांनी ससून हॉस्पिटलमधून समक्ष येऊन दिली.
Read more >>
भाऊसाहेब गव्हाणे असे मृताचे नाव —
भाऊसाहेब गव्हाणे यांना पोट आणि छातीत तीव्र वेदना होत असल्याने 8 मार्च रोजी सकाळी 9.30 वाजता उपचारासाठी पुणे येथील ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना तातडीने वार्ड क्रमांक 7 मध्ये ऍडमिट करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रात्री 10:45 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा ML C क्रमांक 10358/25 असा आहे.
मृत्यूची नोंद शिरूर पोलीस स्टेशन मधे —

सदर घटनेबाबतची अधिकृत कागदपत्रे शिरूर पोलिसांना आज प्राप्त झाली असून, यावरून मृत्यूची नोंद रजिस्टर क्रमांक 38/2025 अन्वये BNS SS 194 कलमानुसार करण्यात आली आहे. ही नोंद सहायक फौजदार श्री. साबळे यांनी केली असून, पुढील तपास सहायक फौजदार श्री. बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
खास भेट …
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३० मध्ये काय वाचाल ..👇
• वैदिक धर्म व हिंदु धर्म
• शोषितांच्या मुक्तीच तत्वज्ञान उभारणारा लढवय्या
• प्राच्चविद्यापंडित काम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा
• मावळाई प्रकाशनची प्रकाशने….👇
शिरूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण प्रकरण तपासले जात आहे. मृत्यूचे नेमके कारण आणि त्यामागची पार्श्वभूमी शोधण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे.
1 thought on “Pune/Shirur News: शिरूरच्या 20 वर्षीय युवकाचा ससून हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू; शिरूर पोलिसांकडून तपास सुरू !”