
Contents
- 1 Shirur Taluka News: न्हावर्याजवळ गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
Shirur Taluka News: न्हावर्याजवळ गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल
Shirur Taluka News : न्हावरा (ता. शिरूर, जि. पुणे) –
Shirur Taluka News दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 5:15 वाजता न्हावरा गावात बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्या महिलेला शिरूर पोलिसांनी रंगेहाथ पकडले.
Read more >>
महिलेकडे प्लास्टिक कॅन्डमध्ये 5 लिटर गावठी दारू सापडली—-
प्रमिला संजय गव्हाणे (रा. न्हावरा, ता. शिरूर) या महिलेकडे पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक कॅन्डमध्ये 5 लिटर गावठी दारू सापडली. तिच्याकडील दारूची किंमत एकूण 500 रुपये इतकी आहे. सदर महिला ओळखीच्या लोकांना ही दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर महिला पोलीस कॉन्स्टेबल स्नेहल जगन्नाथ होळकर (वय 35, शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण) यांनी कारवाई केली.
शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल —-

या प्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 237/2025 नोंदविण्यात आला असून, आरोपी महिलेवर मुंबई प्रोव्हीजन कायदा कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
Shirur Taluka Crime News: शिरुर तालुक्यातील फाकटे येथे “जळीत कांड ?’
जप्त केलेला मुद्देमाल:
एक 5 लिटर मापाचे पांढऱ्या रंगाचे प्लास्टिक कॅन्ड
त्यामध्ये असलेली 5 लिटर गावठी हातभट्टी दारू (प्रती लिटर 100 रुपये दराने एकूण 500 रुपये किंमतीची)
खास भेट …
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३० मध्ये काय वाचाल ..👇
• वैदिक धर्म व हिंदु धर्म
• शोषितांच्या मुक्तीच तत्वज्ञान उभारणारा लढवय्या
• प्राच्चविद्यापंडित काम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा
• मावळाई प्रकाशनची प्रकाशने….👇
या कारवाईची नोंद सहायक फौजदार साबळे यांनी केली असून, पुढील तपास सहायक फौजदार श्री. बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रभारी अधिकारी संदेश केंजळे (शिरूर पोलीस स्टेशन) तपासावर लक्ष ठेवून आहेत.