
Contents
- 1 Shirur Taluka News: शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीची घटना: करडे येथे होंडा शाईन चोरट्यांनी लंपास केली
Shirur Taluka News: शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीची घटना: करडे येथे होंडा शाईन चोरट्यांनी लंपास केली
Shirur Taluka News |Shirur 7 April 2025 |
(Satyashodhak News Report)
Shirur Taluka News:शिरूर तालुक्यातील करडे गावात भरदिवसा मोटारसायकल चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. फिर्यादी राजू रामाजी जाधव (वय ३७ वर्षे, व्यवसाय – मजुरी) हे करडे येथील भैरवनाथ टी सेंटरजवळ चहा पिण्यासाठी थांबले असता, त्यांची पार्क केलेली मोटारसायकल चोरीला गेल्याचे उघडकीस आले आहे.
मोटारीची अंदाजे किंमत 90000 /-रुपये —
फिर्यादी यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या काळ्या रंगाच्या होंडा शाईन मोटारसायकल (MH-25/BD-1199) ही टी सेंटरसमोर पार्क केली होती. ती मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने लंपास केली. सदर मोटारसायकलवर ‘वेताळबाबा प्रसन्न’, ‘मयुरी’ असे समोरील भागावर लिहिलेले असून, मागील नंबर प्लेटवर ‘बजरंग बली’ असा मजकूर आहे. तिची अंदाजे किंमत 90000 /-रुपये असून इंजिन नंबर JC94E62182399 व चासी नंबर MB43C9421 RG549869 आहे.
Read more >>
https://satyashodhak.blog/bekayadeshi-veshya-vyavasayavar-dhad/
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल —
या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 238/2025 नुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक फौजदार बनकर हे करत असून प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे.
खास भेट …
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३० मध्ये काय वाचाल ..👇
• वैदिक धर्म व हिंदु धर्म
• शोषितांच्या मुक्तीच तत्वज्ञान उभारणारा लढवय्या
• प्राच्चविद्यापंडित काम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा
• मावळाई प्रकाशनची प्रकाशने….👇