
Contents
- 1 शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीचा प्रकार: नागरगाव येथील मजुराची मोटारसायकल रांजणगाव सांडस फाट्यावरून चोरीला !
- 1.1 शिरूर तालुक्यातील नागरगावमध्ये मोटारसायकल चोरीचा प्रकार, हॉटेलसमोरून वाहन गायब !
- 1.2 मात्र नाश्ता करून बाहेर आल्यावर मोटरसायकल गायब!
- 1.3 शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल —
- 1.4 मोटारसायकल सुमारे 25,000 रुपये किंमतीची—
- 1.5 खास भेट …
शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीचा प्रकार: नागरगाव येथील मजुराची मोटारसायकल रांजणगाव सांडस फाट्यावरून चोरीला !
शिरूर तालुक्यातील नागरगावमध्ये मोटारसायकल चोरीचा प्रकार, हॉटेलसमोरून वाहन गायब !
Shirur Crime News 14 April 2025:
(Satyashodhak News Report )
शिरूर तालुक्यात मोटारसायकल चोरीचा प्रकार:
दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी सुमारे 4:45 वाजता शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस फाट्यावरील ‘हॉटेल गणेश’ येथे एक मोटारसायकल चोरीला गेल्याची घटना घडली आहे. नागरगाव येथील रहिवासी अमोल श्रीराम नवघरे (वय 30 वर्षे, व्यवसाय – मजुरी) हे आपल्या मुलांना नाश्ता चारण्यासाठी हॉटेल गणेश येथे आले होते.
Read more >>
मात्र नाश्ता करून बाहेर आल्यावर मोटरसायकल गायब!
त्यांनी त्यांची हिरो एच.एफ. डिलक्स मॉडेलची मोटारसायकल (MH-38-AG-280204, चासी नंबर – MBLHAW10XM5H01142, इंजिन नंबर – HA11EXM5H51178) हॉटेलसमोर हँडल लॉक करून उभी केली होती. मात्र नाश्ता करून बाहेर आल्यावर त्यांना मोटारसायकल त्या ठिकाणी आढळून आली नाही.
शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल —

अमोल नवघरे यांनी तत्काळ हॉटेल परिसरात आणि आजूबाजूला मोटारसायकलचा शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. त्यांनी पुढील काही दिवसातही अनेक ठिकाणी शोध घेतला, मात्र यश आले नाही. अखेर त्यांनी खात्री करून शिरूर पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.या प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर CR No. 248/2025 प्रमाणे भारतीय न्याय संहिता कायदा कलम 379 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
मोटारसायकल सुमारे 25,000 रुपये किंमतीची—
चोरी गेलेली मोटारसायकल सुमारे 25,000 रुपये किंमतीची आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार श्री. खबाले करत असून, प्रभारी अधिकारी संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरु आहे.
Read more >>
खास भेट …
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३० मध्ये काय वाचाल ..👇
• वैदिक धर्म व हिंदु धर्म
• शोषितांच्या मुक्तीच तत्वज्ञान उभारणारा लढवय्या
• प्राच्चविद्यापंडित काम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा
• मावळाई प्रकाशनची प्रकाशने….👇
हॉटेलसमोरून मोटारसायकल चोरी होणे ही गंभीर बाब असून स्थानिक नागरिकांमध्येही यामुळे चिंता निर्माण झाली आहे. पोलीस यंत्रणेकडून लवकरात लवकर आरोपीला पकडून वाहन परत मिळवण्याची अपेक्षा आहे.