
Contents
- 1 Shirur Taluka Crime: शिरूरतालुक्यातील मांडवगण फराटा येथे आणखीन एक मोटारसायकल चोरीची घटना
- 1.1 घटना मांडवगण फराटा येथील —–
- 1.2 मोटारसायकल जागेवर दिसली नाही—
- 1.3 अज्ञात चोरट्याने लंपास केली मोटरसायकल —
- 1.4 मोटारसायकल 20,000/- रुपये किंमतीची—
- 1.5 खास भेट …
Shirur Taluka Crime: शिरूरतालुक्यातील मांडवगण फराटा येथे आणखीन एक मोटारसायकल चोरीची घटना
Shirur Taluka Crime 11 April
2025:
( Satyashodhak News Report )
Shirur Taluka Crime News :शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा गावात एका वयोवृद्ध शेतकऱ्याची मोटारसायकल चोरट्यांनी भरबाजारातून लंपास केल्याची घटना घडली आहे.
Read more >>
घटना मांडवगण फराटा येथील —–
फिर्यादी हणुमंत गोविंद होले (वय 67 वर्षे, व्यवसाय – शेती, रा. मांडवगण फराटा, ता. शिरूर, जि. पुणे) हे दिनांक 11 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास बाजारासाठी बाजार मैदानासमोर गेले होते. त्यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस (क्र. MH12 QV 3266, काळा रंग) ही मोटारसायकल बाजार मैदानासमोर उभी केली होती.

Shirur Taluka Crime News:शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे हणुमंत होले यांच्या मोटारसायकलची बाजारात चोरट्यांनी चोरी केली. शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू.
Read more >>
Shirur Electric Current Death: इलेक्टीक करंट लागुन 42 वर्षीय इसम मृत्युमुखी !
मोटारसायकल जागेवर दिसली नाही—
सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते बाजार करून परत आले असता त्यांना मोटारसायकल जागेवर दिसली नाही. त्यांनी परिसरात वडगाव रासाई, तांदळी, बाभुळसर या गावांमध्ये शोध घेतला, परंतु ती कुठेही आढळून आली नाही.
अज्ञात चोरट्याने लंपास केली मोटरसायकल —
शक्यतेनुसार कोणी अज्ञात चोरट्याने मोटारसायकल चोरल्याचा ठाम संशय त्यांनी पोलिसांना नोंदवला. या प्रकरणी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये CR नंबर 247/2025 नुसार भारतीय न्याय संहिता कायदा कलम 379 (चोरीचा गुन्हा) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Read more >>
मोटारसायकल 20,000/- रुपये किंमतीची—
चोरट्याने नेलेली मोटारसायकल अंदाजे 20,000/- रुपये किंमतीची आहे. तिचा चॅसी नंबर MBLHAR071JHH14470, तर इंजिन नंबर HA10AGJHH20551 असा आहे.
खास भेट …
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३० मध्ये काय वाचाल ..👇
• वैदिक धर्म व हिंदु धर्म
• शोषितांच्या मुक्तीच तत्वज्ञान उभारणारा लढवय्या
• प्राच्चविद्यापंडित काम्रेड शरद पाटील यांची ग्रंथसंपदा
• मावळाई प्रकाशनची प्रकाशने….👇
या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार श्री. शिंदे करत आहेत, तर गुन्हा पोलीस हवालदार श्री. वाघमोडे यांनी नोंदवला आहे. प्रभारी अधिकारी श्री. संदेश केंजळे (शिरूर पोलीस स्टेशन) यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.