
Contents
Bepatta:शिरूर बसस्थानकातून कोण बेपत्ता झाले?वाचा सविस्तर. ..
Bepatta: कुटुंबीयांची शोधण्याची भावनिक विनंती !
Bepatta News Shirur 16 April 2025:
(Satyashodhak News Report)
Bepatta : बसस्थानकातून एक ४७ वर्षीय पुरुष बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. संजय सदाशिव आगळे (वय ४७ वर्षे) हे दिनांक ११ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.४५ वाजता शिरूर येथील एस. टी. बसस्थानकातून बेपत्ता झाले आहेत. त्यांच्या बेपत्ताबाबतची खबर त्यांच्या पत्नी नंदा संजय आगळे (वय ४३ वर्षे, व्यवसाय शिवणकाम, रा. जोशीवाडी, शिरूर) यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे.

Read more >>
त्यादिवशी संजय आगळे यांना त्यांच्या मुलीने मिरी (ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) येथे जाण्यासाठी नगरच्या बसमध्ये बसवले होते. मात्र, ते ठरलेल्या ठिकाणी पोहोचले नाहीत. कुठल्याही नातेवाइकाला किंवा ओळखीच्या व्यक्तीला काहीही सांगितले न देता ते कुठेतरी निघून गेले असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी दिली.
Bepatta/मिसिंग व्यक्तीचे वर्णन:
• नाव: संजय सदाशिव आगळे
• वय: ४७ वर्षे
• रंग: सावळा
• उंची: ५ फूट ५ इंच
• बांधा: सडपातळ
• अंगावरील कपडे: निळ्या रंगाचा शर्ट, काळ्या रंगाची पँट, पायात चप्पल
• ओळख: उजव्या हातावर इंग्रजी अक्षरात “NS” असे गोंदलेले आहे. उजव्या डोळ्याजवळ टाके पडलेले व्रण आहे.
Read more >>
या घटनेची नोंद शिरूर पोलीस स्टेशनमध्ये दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ६.५७ वाजता (रजिस्टर नंबर ६२/२०२५) करण्यात आली आहे. प्रकरणाचे तपास अधिकारी सफौ साबळे असून प्रभारी अधिकारी पो. नि. केंजळे हे आहेत.
संपर्क साधावा—
कोणाला काही माहिती असल्यास खालील क्रमांकावर संपर्क साधावा:
नंदा संजय आगळे – ९६२८६८२८९३
कृपया यांना शोधण्यात मदत करा. एक परिवार आपल्या प्रिय व्यक्तीच्या प्रतिक्षेत आहे.