
शिरुर पोलीस स्टेशन
Suicide: गळफास घेऊन तरुणाचा मृत्यू :
Suicide News 17 April 2025:(Satyashodhak News Report )
Suicide News: शिरुर तालुक्यातील काठापुर खुर्द या गावात एक दुःखद घटना घडली आहे. येथील दिलीप बबन औटी (वय- 35) यांनी स्वतःच्या राहत्या घरात छताच्या लोखंडी गॅल्डरला गळफास लावून आत्महत्या केली आहे. अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. ही घटना 6 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8:50 च्या सुमारास घडली आहे.शिरुर पोलिस अधिक तपास करत आहेत.
Read more >>
खबर देणारे संदीप बबन औटी (वय -38 वर्षे, व्यवसाय – शेती) यांनी शिरुर पोलिसांना ही माहिती दिली आहे.या माहितीनुसार दिलीप बबन औटी यांनी गळफास घेतल्यानंतर त्यांना तत्काळ पारगाव येथील आधार हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
Read more >>
त्यानंतर बबन औटी यांना मंचर येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले. मात्र,तेथील डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी मंचर पोलिसांकडून प्राप्त झालेल्या कागदपत्रांच्या आधारे शिरूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. (रजिस्टर क्रमांक 41/2025). या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार श्री.आगलावे करत आहेत. नोंद पोलिस हवालदार श्री. वारे यांनी केली आहे. प्रभारी अधिकारी पोलिस निरजक्षक निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
Read more >>
हा प्रकार घडल्यानंतर गावात दुःखाची लाट पसरली आहे. दिलीप औटी यांच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गळफास घेऊन मृत्यु केल्याने आत्महत्येचा संशय व्यक्त होत आहे.शिरुर पोलिस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत.