
Shirur Bhaji Bajar Hinsa News:भाजी बाजारात महिलेस तिच्या कुटुंबीयांना मारहाण तिघांविरोधात गुन्हा दाखल !
Shirur Bhaji Bajar Hinsa News 18 April 2025:
( Satyashodhak News Report )
Shirur Bhaji Bajar HinsaNews: शिरूर मधे 18 एप्रिल 2025 रोजी शिरूर शहरातील भाजीबाजार परिसरात एका महिलेसह तिच्या पती व सासूला लाथाबुक्यांनी व काठ्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन आरोपी पुणे येथील—-
पीडित महिला सौ. प्रियंका निखील तिवारी (वय- 28 वर्षे, व्यवसाय – घरकाम) यांनी फिर्याद ही फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे दिली आहे. आरोपींची नावे श्री. जगदीश मिश्रा, ऋतुगंध मिश्रा आणि अशुतोष मिश्रा अशी आहेत. हे तिघेही पुण्यातील सिंहगड रोड, वडगाव बु. येथील निलेश अपार्टमेंटमध्ये राहतात.अशी माहिती प्राप्त होत आहे.
घटनेचा तपशील पुढील प्रमाणे—
17 एप्रिल 2025 रोजी दुपारी सुमारे 1.30 वाजता ही घटना घडली. भाजीबाजार, शिरूर येथील प्रियंका यांचे वडीलोपरजित घराजवळ प्रियंका आपल्या सासऱ्यांसाठी रूम मागत होत्या. त्यावेळी वरील आरोपी हे पाहुणे म्हणून तेथे उपस्थित होते.
लाकडी काठीनेही हल्ला केला–
वाद वाढल्यानंतर आरोपींनी प्रियंका, तिची सासू सौ. जयश्री तिवारी आणि पती निखील तिवारी यांना शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी अशुतोष मिश्रा याने लाकडी काठीनेही हल्ला केला आणि गंभीर इजा केली.तसेच, “जर पोलिसांत तक्रार केली, तर आम्ही आमचा हिसका दाखवू,” अशी धमकीही दिली गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
शिरुर पोलिस स्टेशनमधे गुन्हा दाखल—-
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 256/2025 असा आहे.भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम 118(1), 351(2), 351(3), 352, 3(5) अंतर्गत हा गुन्हा तिघांवर दाखल करण्यात आला आहे.दाखल अमंलदार पोलिस हवालदार श्री.बनकर हे आहेत.तर पुढील तपास पोलिस हवालदार श्री. खेडकर हे करत आहेत. प्रभारी अधिकारी पोलिस निरिक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरु आहे.
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी घडलेली ही घटना परिसरात खळबळ उडवणारी ठरली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
1 thought on “Shirur Bhaji Bajar Hinsa News :भाजी बाजारात महिलेस तिच्या कुटुंबीयांना मारहाण तिघांविरोधात गुन्हा दाखल !”