
Contents
Shirur Bhaji Bajar Hinsa News : भाजी बाजारात घटनेत फिर्याद व प्रतिफार्याद दाखल !
Shirur Bhaji Bajar Hinsa News 18 April 2025 :
(Satyashodhak News Report )
Shirur Bhaji Bajar Hinsa News: शिरूर येथे १८ एप्रिल २०२५ रोजी शिरूर शहरातील भाजीबाजार परिसरात पाणटपरी ठेवण्याच्या वादातून महिलेसह पाच जणांवर लाकडी काठ्यांनी आणि दगडाने हल्ला करण्यात आल्याची घटना १७ एप्रिल रोजी दुपारी घडली. याप्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या आधी विरोधी बाजुकडुनही फिर्यादी शिरूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
घटनेचे तपशील पुढील प्रमाणे—
फिर्यादी शारदा जगदीश मिश्रा (वय -४९, व्यवसाय – घरकाम, रा. सिंहगड रोड, वडगाव बु., पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शिरूर शहरातील भाजीबाजार परिसरात त्यांच्या वडिलांच्या घरासमोर आरोपी निखील तिवारी, सौ. प्रियंका तिवारी व प्रदीप तिवारी (पूर्ण नाव अज्ञात, सर्व रा. शिरूर) यांनी पाणटपरी ठेवण्याचा प्रयत्न केला. फिर्यादींच्या वडिलांनी हरकत घेतल्याने वाद निर्माण झाला. यावेळी वाद विकोपाला गेला आणि आरोपींनी वडिलांना लाथाबुक्यांनी मारहाण केली.
“पोलीसांत तक्रार केलीस तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी ?
फिर्यादी शारदा मिश्रा आणि त्यांच्या पती, दोन मुले हे वाद सोडवण्यासाठी आले असता आरोपी निखील तिवारी आणि प्रदीप तिवारी यांनी लाकडी काठ्यांनी सर्वांना मारहाण केली. त्याचप्रमाणे सौ. प्रियंका तिवारी हिने मोठ्या आकाराचा दगड घेऊन फिर्यादींच्या डाव्या हाताला दुखापत केली आणि “पोलीसांत तक्रार केलीस तर जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली.
शिरुर पोलिसांकडुन कारवाई —
याप्रकरणी गु.र.नं. 255/2025 अन्वये बी एन एस कलम 118(1), 351(2)(3), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणी पोहवा बनकर यांनी गुन्हा दाखल केला असून तपास पोहवा शिंदे करत आहेत. प्रभारी अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे हे आहेत.