
Contents
- 1 Kawathe Yemai Jaminicha Vaad News: कवठे येमाई जमिनीच्या वादात आता प्रतिफिर्याद दाखल!
Kawathe Yemai Jaminicha Vaad News: कवठे येमाई जमिनीच्या वादात आता प्रतिफिर्याद दाखल!
Kawathe Yemai Jaminicha Vaad News 19 April 2025: (Satyashodhak News Report )

Kawathe Yemai Jaminicha Vaad News: शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील इचकेवाडीत जमिनीच्या वादातून मोठा वाद निर्माण झाला असून यामध्ये सात जणांनी मिळून एका कुटुंबाला मारहाण व दमदाटी केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read more >>
प्रतिफिर्याद दाखल —-
आधी विरोधी बाजुकडुन सात जणांवर फिर्याद शिरुर पोलिस स्टेशन मधे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यातील आरोपींनी त्यांच्या बाजूने आता आधीच्या पिडीतांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
18 एप्रिल 2025 रोजी इचकेवाडी येथे घडला होता प्रकार—
गुन्हा क्रमांक 260/2025 अन्वये बीएनएस कलम 115(2), 352, 351(2)(3), 189(2), 191(2), 190 अंतर्गत आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दिनांक 18 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:45 वाजता कवठे येमाई, इचकेवाडी येथे घडला.
Read more >>
कांद्याची आरण (चाळ) बांधत होते—
फिर्यादी श्री. संतोष बाळकृष्ण इचके (वय- 40 वर्षे, व्यवसाय – शेती, राहणार-.कवठे येमाई, तालुका- शिरूर यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, त्यांच्या मालकीच्या गट नं 104 मधील रस्त्यालगत आरोपी बाबुराव सगाजी इचके, सगाजी कोंडाजी इचके, अनिता बाबुराव इचके व इतर पाच अनोळखी नातेवाईक कांद्याची आरण (चाळ) बांधत होते. त्यांना विरोध करताच संतोष इचके व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली.
Read more >>
Shirur Koyata Prakaran: कृषी सेवा केंद्रात कोयत्याने मारहाण व कोयता फिरवुन हवा करण्यार्या तिघांना पोलिसांनी केली अटक !
Read more >>
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३१ मध्ये काय वाचाल ..👇
• भारताच्या शासन संस्थेचे सर्वंकष आरिष्ट व त्याची क्रांतीकारक सोडवणुक…..
• शूर्पनखेच्या जनस्थानाचा काम्रेड शरद पाटील पुरस्कृत शोध…
• एक सांस्कृतिक युगप्रवर्तरक शाहिर गव्हाणकर….
मावळाई प्रकाशन ची पुस्तकें. …फिर्यादीसह त्यांचे भाऊ, भावजई, आई,पत्नीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण—
या झटापटीत फिर्यादीसह त्यांचे भाऊ, भावजई, आई व पत्नीला हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ व धमकी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी पोलीस हवालदार शिंदे यांनी गुन्हा दाखल केला असून तपासाची जबाबदारी पोलीस हवालदार वारे यांच्याकडे देण्यात आली आहे.