
शिरुर पोलीस स्टेशन
Contents
Shirur Bal Laingik Atyachar Prakaran: बाल लैंगिक अत्याचार प्रकरण: शिरूरच्या बबलु बालेस 10 वर्षांची सक्तमजुरी !
Shirur Bal Laingik Atyachar Prakaran News 22 April 2025 : (Satyashodha News Report)
पुणे, 21 एप्रिल 2025 – शिवाजीनगर सत्र न्यायालयाने आज एका बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात महत्त्वपूर्ण निकाल देत शिरूर तालुक्यातील आरोपी बबलु उर्फ अमीर शब्बीर बाले (वय 31) याला 10 वर्षांची सक्तमजुरी आणि दंड ठोठावला आहे.
या प्रकरणात गुन्हा रजिस्टर क्रमांक 289/2014 असून आरोपीवर भारतीय दंड विधानाच्या कलम 376 तसेच पोक्सो कायद्याच्या कलम 4, 6, 8, 12 अंतर्गत आरोप होते. विशेष खटला क्रमांक 293/14 मध्ये निकाल देताना श्री ए. एस. वाघमारे (सत्र न्यायाधीश, पुणे) यांनी आरोपीला दोषी ठरवले.
सरकारी पक्षातर्फे वकिली करताना श्री. मारुती वाडेकर यांनी युक्तिवाद केला. तपास अधिकारी म्हणून भगवान निंबाळकर (सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक) व सुवर्णा हुलवान (सध्या मुंबई) यांनी तपास केला.
कोर्टाने आरोपीस कलम 376 अंतर्गत 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा तसेच 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिन्याची अतिरिक्त शिक्षा सुनावली. याशिवाय पोक्सो कायद्याखालीही 10 वर्षे शिक्षा व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.
या खटल्यात पोलिस निरीक्षक संदेश केंजळे (शिरूर पोलीस स्टेशन) हे प्रभारी अधिकारी होते. कोर्ट पेरवी अधिकारी म्हणून पो. हवा. बाळासाहेब गदादे व मपोकाॅ रेणुका भिसे यांनी कार्य पार पाडले. सेशन कोर्टात श्री. विद्याधर निचीत, जिल्हा कोर्टात श्री. संतोष घोळवे तर समन्स अंमलदार म्हणून पो.हवा. वाडेकर कार्यरत होते.
हा निकाल पीडितेला न्याय मिळवून देणारा ठरला असून, बालकांविरोधात गुन्हे करणाऱ्यांसाठी एक इशारा आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …
1 thought on “Shirur Bal Laingik Atyachar Prakaran: बाल लैंगिक अत्याचार प्रकरण: शिरूरच्या बबलु बालेस 10 वर्षांची सक्तमजुरी !”