
शिरुर पोलिस स्टेशन
Contents
Shirur kamgar Mrutyu: शिरूर येथे प्लास्टर कामादरम्यान मजुराचा मृत्यू, बांधकाम सुरक्षेवर प्रश्नचिन्ह?
Shirur kamgar Mrutyu News 23 April 2025 :
(Satyashodhak News Report )
(प्रकाश करडे यांच्या कडुन )
Shirur kamgar Mrutyu: शिरूर तालुक्यातील थापे मळा येथे बांधकाम कामादरम्यान एक दुर्दैवी अपघात घडला. गंगा एज्युकेशन सोसायटीच्या इमारतीवर प्लास्टर करत असताना, दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने अखिलेश कुमार (वय ४५, मुळगाव मुन्दिपुर, सिवान, बिहार) या मजुराचा मृत्यू झाला.
श्री गणेशा हॉस्पिटल, शिरूर येथे ने त्यात आले होते–
हा दुर्दैवी प्रकार २२ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १.४५ वाजता घडला. मजुराचे काम चालू असताना अचानक तोल जावून तो खाली पडला आणि गंभीर जखमी झाला. तातडीने श्री गणेशा हॉस्पिटल, शिरूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असतानाच २.२० वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
टुनटुन पंडित हे -लेबर कॉन्ट्रॅक्टर—
घटनेची खबर टुनटुन पंडित (वय ३३, व्यवसाय – लेबर कॉन्ट्रॅक्टर) यांनी दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आवश्यक ती चौकशी सुरु केली असून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालय, शिरूर येथे ठेवण्यात आला आहे.
या घटनेनंतर कामगार सुरक्षेबाबत मोठे प्रश्न उपस्थित होत आहेत. अद्याप अपघाताचे नेमके कारण स्पष्ट नसले तरी कामगार सुरक्षेचे नियम आणि उपाय याकडे संबंधित यंत्रणांचे लक्ष जाणे गरजेचे आहे.
शिरुर पोलिस पुढील तपास करत आहेत–
• प्रभारी अधिकारी,पोलीस .निरिक्षक संदेश केंजळे, शिरूर पोलीस स्टेशन.
• दाखल अंमलदार: पोलिस.हवालदार श्री. गवळी
• तपास अधिकारी: पोलिस हवालदार श्री खेडकर.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …