
Contents
Malthan Gawathi Daru Vikri Prakaran:शिरुर पोलिसांची गावठी दारु विक्री करणाऱ्यांवर रेड !
शिरूर, 23 एप्रिल 2025:(कल्पना पुंडे यांच्याकडुन)
Malthan Gawathi Daru Vikri Prakaran:स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीणच्या पथकाने मौजे मलठण परिसरात गावठी हातभट्टीच्या दारूच्या विक्रीवर कारवाई करत एका तरुणाला अटक केली. ओम विजय मुरकुटे (वय 23, रा. मलठण, ता. शिरूर) याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मलठण येथील मका शेताजवळील पत्र्याच्या गावठी दारू विक्री—
पोलिस हवालदार संजू ज्ञानदेव जाधव (पो. हवा. ब. नं. 1499) यांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 एप्रिल रोजी सकाळी 12.30 च्या सुमारास पोलीस पेट्रोलिंगदरम्यान मलठण येथील मका शेताजवळील पत्र्याच्या शेडमध्ये आरोपी मुरकुटे हा गावठी दारू विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाली. लगेचच पोलिसांनी दोन पंचांच्या साक्षीने शेडवर छापा टाकून मुरकुटेला रंगेहाथ पकडले.
छाप्यात मिळालेला मुद्देमाल:
• 10 लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू
• किंमत: प्रति लिटर 100 रुपये, एकूण किंमत 1000 रुपये
दारू सॅम्पल पुढील तपासणीसाठी सुरक्षित करण्यात आले आहे.याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 270/2025 अंतर्गत महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
• तपास अधिकारी: पोलिस हवालदार उबाळे
• दाखल अंमलदार: सहायक फौजदार कदम
• प्रभारी अधिकारी: श्री.संदेश केंजळे
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …