
Contents
- 1 Pahelgam Incident:’जुम्मे की रात’ पाकिस्तान साठी ‘खतरनाक’?
- 1.0.1 ओमर अब्दुल्लांचा आरोप:
- 1.0.2 सरकार व पोलिस यंत्रणेच्या कोनत्या चुका झाल्या?
- 1.0.3 3. स्थानिक प्रशासनाची दिरंगाई झाली का?––
- 1.0.4 4. संवादाचा अभाव का होता?—
- 1.0.5 राजकीय प्रतिक्रिया कोणत्या आल्या?
- 1.0.6 शुक्रवारी ,’ जुमे की रात’ पाकिस्तान ची ,’तबाही की रात’—
- 1.0.7 भविष्यातील उपाय योजना काय असु शकतात?
- 1.0.8 निष्कर्ष काय निघतो?
- 1.0.9 About The Author
Pahelgam Incident:’जुम्मे की रात’ पाकिस्तान साठी ‘खतरनाक’?
Pahelgam Incident News 26 April 2025:
(Satyashodhak News Report)
Pahelgam Incident:जम्मू-काश्मीरमधील पेहलगाम येथे ‘दर्दनाक’ दहशतवादी हल्ला झाला.त्यात 26 लोक ठार झाले. पहेलगाम मधुनच अमरनाथ यात्रेची सुरुवात होत असते.या घटनेने संपूर्ण देश या हल्याने हादरून गेला. या हल्ल्यानंतर अनेक राजकीय व सामाजिक स्तरावर विशेषत: जम्मु काश्भीर च्या ओमर अब्दुल्ला सरकार व जम्मु काश्मीर पोलिसांवर टीका सुरू झाली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला सरकार व पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
ओमर अब्दुल्लांचा आरोप:

ओमर अब्दुल्ला यांनी स्पष्टपणे म्हटले की, “हल्ल्याचे ‘इनपुट्स” आधीपासून आले होते.तरीही सुरक्षा व्यवस्था अपुरी ठरली.” ओमर अब्दुल्ला यांचा रोष केंद्र सरकारच्या नियोजनशून्यतेवर व सरकारच्या अंतर्गरत (आय बी/IB ) व बाह्य (रा/RAW) या गुप्तचर यंत्रणांच्या अपयशावर (?) होता.पण ते जम्मु काश्मीर मधील सरकार व पोलिस यंत्रणेफाबत काही गंभीर दिसले नाहीत.ते केंद्र सरकारवर जबाबदारी ढकलत होते.मात्र ते व त्यांच्या सरकारने काही बाबतीत बेसावधपणा व बेजबाबदारपणा केला आहे, असे म्हणायला जागा आहे!
Read more >>
पाकिस्तान काश्मीर साठी भारताबरोबर 10 युद्धे लढण्यास तयार ! पण एका लढाई नंतर शिल्लक राहिला तर ना ?
सरकार व पोलिस यंत्रणेच्या कोनत्या चुका झाल्या?
1. गुप्तचर यंत्रणांचे अपयश-
अशा प्रकारच्या हल्ल्याच्या धमक्या आधीच प्राप्त झाल्या होत्या.त्या ‘नेहमीच्याच’ म्हणुन नोंद ओमर अब्दुल्ला यांनी केली आहे. हे कमालीचे बेजबाबदारपणाचे लक्षण आहे. सध्या तेथे पर्यटकांची गर्दी होती. अशा परिस्थितीत मिळत असलेल्या ‘इनपुट’ कडे दुर्लक्ष का झाले? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जम्मु काश्मीर चे एल जी घटनेच्या वेळी दुसर्या राज्यात काय करत होते व का करत होते?
2. सुरक्षा बंदोबस्त कमी कसा?
पहेलगाम येथे पर्यटकांची गर्दी होती. तेथुनच अमरनाथ यात्रा सुरु होते.असा तो भाग आहे.तरी स्थानिक पोलिस बंदोबस्त अपुरा का होता? लष्कराचे युनिट तेथे का नाही? की अशी घटना तेथे घडण्याची कोणी वाटच पहात होते?
3. स्थानिक प्रशासनाची दिरंगाई झाली का?––
दहशतवादी हल्ल्याच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्वरित उपाययोजना करण्यात अपयश आले आहे. ते का? हल्यानंतर तेथे एकच गडबड उडाल्याचे दिसते.कोनतीही पुर्वतयारी दिसत नाही. जम्मु काश्मीर मधे आता 370 कलम नाही.लोकनियुक्त राज्य सरकार आहे.त्या सरकारने या गोष्टी पाहिल्या पाहिजेत की केंद्र सरकारने?
4. संवादाचा अभाव का होता?—
जम्मु काश्मीर मधील स्थानिक पोलिस, गुप्तचर यंत्रणा आणि भारतीय लष्कर यांच्यात योग्य समन्वय का नव्हता? त्यामुळे संबंधित अतिरेक्यांना तेथे जाता आले.बाजुंना पहाड आहेत.अतिरेकी जम्मु काश्मीर मधीलच आहेत.एकाचे घर उडवण्यात आले आहे.एक जण ठार झाला आहे.तर इतर (6?) जण कोनत्याही क्षणी मारले जातील.अशी भारतीय लष्कर तेथे कारवाई करत आहे.
Read more >>
Lucky Bisht लकी बिश्त भारताच्या शत्रूंसाठी कर्दनकाळ ! वाचा ते कोण आहेत आणि काय करतात सविस्तर. …
राजकीय प्रतिक्रिया कोणत्या आल्या?
ओमर अब्दुल्लांच्या टीकेला भारतीय जनता पक्ष व इतर पक्षांनी ‘राजकीय भुमिका’ मांडली आहे का? असा पण प्रश्न निर्माण होतो.परंतु हा राष्ट्रिय सुरक्षिततेचा प्रश्न नाही का? सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रिय सुरक्षिततेच्या प्रश्नावर एक भुमिका राजकारणापलिकडे जावुन घेतली जाणे अपनेक्षित आहे.
शुक्रवारी ,’ जुमे की रात’ पाकिस्तान ची ,’तबाही की रात’—
जम्मु काश्मीर मधील सामान्य नागरिक मात्र भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत.भारतामध्ये या घटनेबद्दल तीव्र आक्रोष आहे.लोक रस्त्यावर येवुन पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी करत आहे.मिडिया पाकिस्तान किती घाबरला आहे.हे दाखवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिरेकी जगात कुठल्याही कोपर्यात लपले तरी शोधुन ‘खत्म’ केले जातील असे म्हटले आहे.भारत सरकार यापुर्वी कधी केली नाही अशी एक्शन करण्याची तयारी करत आहे. असे समजते.नेमके काय करणार हे आपल्याला दिसेलच.आज शुक्रवारी ,’ जुमे की रात’ पाकिस्तान ची ,’तबाही की रात’ होणार असे मिडीया सांगत आहे.
Read more >>
Trump as Dictator ? : ट्रंफ यांचे नवीन terrif धोरण हुकुमशाही प्रवृत्तीचे आहे का ?
ब्रिटेन, इराण ,अमेरिका भारताबाबत सकारात्मक भुमिका घेत आहेत.पण ‘पुराना’ पाकिस्तान ची बाजु घेणारा तुर्कस्तान किंवा टर्की पर्यंत या घटनेचे कनेक्शन जोडले जात आहे.
भविष्यातील उपाय योजना काय असु शकतात?
• स्थानिक गुप्तचर यंत्रणा अधिक सक्षम करणे.
• स्थानिक पोलीस व लष्करात समन्वय वाढवणे.
• सर्वसमावेशक आपत्कालीन योजनेचा अंमल करणे.
• बेसावध कधीच राहु नये.
• शत्रुला कमी समजु नये.
• शत्रु फार घाबरलेला आहे,असा गोड गैरसमज होऊ न देणे.
• काश्मीर साठीची लढाई दिर्घकालीन आहे,याचे भान ठेवून सावध राहणे.
• जम्मु काश्मीर मधील नैसर्गिक रचना लक्षात घेऊन पोलीस, लष्कर व पर्यटक यांनी खबरदारी घेणे.
निष्कर्ष काय निघतो?
हल्ला झाल्यानंतर ‘राजकीय’ दोषारोप करत बसण्यापेक्षा, सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी ओळखून त्याबाबत सुधारणा करणे अधिक महत्त्वाचे आहे. ओमर अब्दुल्ला यांचे मत ‘राजकीय’ वाटले तरी ते एकुणच तपासुन पाहिले पाहिजे.ओमर सरकार मधील पाकिस्तान धार्जिणे शोधुन खत्म केले पाहिजेत. ‘आतल्या ‘ मदतीशिवाय अतिरेकी अशी कृती करणे सोपे नाही.ही बाब तपासली पाहिजे. गुप्तचर यंत्रणा आणि भारतीय सरकारने अशा घटना घडण्याआधीच शत्रुचे मनसुबे उधळुन टाकण्यास सक्षम पाहिजेत. इस्राएल चे नुसते उदाहरण देवुन नाही तर कृतीने आपण खंबीर आहोत हे दाखवले पाहिजे!