
Contents
शिरूरमध्ये हॉटेलवर तलवार-लाठ्यांनी हल्ला; 8 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
शिरूर, ता. २६ एप्रिल २०२५: (कल्पना पुंडे यांच्याकडुन यांच्याकडुन )
शिरूरमध्ये हॉटेलवर तलवार-लाठ्यांनी हल्ला:
शिरूर तालुक्यातील श्रीनिवास नगर येथील पी.आर. हॉटेलमध्ये मोठ्या गर्दीने घुसून तलवार आणि लाठ्यांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी प्रशांत गोवर्धन साबळे (वय ३२, व्यवसाय हॉटेल) यांनी फिर्याद दाखल केली आहे. या घटनेनंतर शिरूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि आर्म अॅक्टच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना तपशील:
दि. २५ एप्रिल २०२५ रोजी रात्री ११:३० वाजता आरोपी मिथुन सिंग, जितू सिंग, रेखा सिंग, योगेश अडसूळ, सनी अमल नेरी, संदीप खोले, साईनाथ कुलकर्णी, शाहरुख खान आणि त्यांच्या बरोबरचे १०-१५ अज्ञात इसम पी.आर. हॉटेलमध्ये आले. त्यांनी “तुझा भाऊ ऋषिकेश कुठे आहे? आज त्याला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी दिली.
तलवारीच्या उलट्या बाजूने मिथुन सिंगने हल्ला—
घाबरून फिर्यादी प्रशांत साबळे व त्यांचा भाऊ ऋषिकेश हॉटेलच्या बाहेर पळाले. मात्र हॉटेलमध्ये काम करणाऱ्या निरज बिस्ट याच्यावर तलवारीच्या उलट्या बाजूने मिथुन सिंगने हल्ला केला आणि संदीप खोलेंनी लाकडी काठीने मारहाण केली. इतरांनीही शिवीगाळ, दमदाटी करत हॉटेलमधील साहित्याची तोडफोड करून मोठे नुकसान केले.
गुन्हा:
भारतीय न्याय संहिता कलम 118(1), 115(2), 352, 351(2),(3), 324(4), 189(2), 191(2), 191(3), 190
तसेच आर्म अॅक्ट 4, 25 अंतर्गत गुन्हा दाखल.
पुढील तपास:
पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक साबळे करीत आहेत.
गुन्हा दाखल अंमलदार: पोलीस हवालदार उबाळे
प्रभारी अधिकारी: श्री संदेश केंजळे, पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन
शिरूर पोलीसांकडून आरोपींच्या शोधासाठी अधिक तपास सुरू आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …