
Contents
शिरूर तालुक्यातून 23 वर्षीय तरुणी बेपत्ता : नागरिकांना मदतीचे आवाहन!
मांडवगण फराटा (शिरूर) | 26 एप्रिल 2025:(प्रकाश करडे यांच्याकडुन )
शिरूर तालुक्यातून 23 वर्षीय तरुणी बेपत्ता:शिरूर पोलीस ठाण्यात दाखल माहिती नुसार, वैष्णवी संजय फराटे (वय 23 वर्षे) या तरुणीचा बेपत्ता झाल्याचा प्रकार समोर आला आहे.
शिरूर पोलीस ठाण्यात नोंद —
वैष्णवी दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9:00 वाजता आपल्या राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून गेली असून, ती अद्याप घरी परतलेली नाही. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात एन्ट्री नंबर 08/2025 प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
बेपत्ता व्यक्तीचे वर्णन:
नाव: वैष्णवी संजय फराटे
वय: 23 वर्षे
उंची: 5 फूट
रंग: गोरा
कपडे: हिरव्या रंगाचा टॉप व पांढऱ्या रंगाची लेडीज पंजाबी ड्रेस, पायात पांढऱ्या रंगाची सॅंडल.
तपास अधिकारी ए.एस.आय. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. प्रभारी अधिकारी सौ. संदेश केजले यांनी देखील नागरिकांना मदतीचे आवाहन केले आहे.
जर कोणाला वैष्णवीबद्दल काही माहिती मिळाल्यास कृपया खालील संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा:
संजय वसंत फराटे – मो. 8307325781
शिरूर पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना जागरूक राहण्याचे आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …