
Contents
शिरूर : दारूच्या नशेत लोखंडी कोयत्याने मारहाण; गंभीर जखमी
शिरूर (प्रतिनिधी) : (कल्पना पुंडे यांच्याकडुन )
रामलिंग रोड येथील जय हनुमान सोसायटीमध्ये २५ एप्रिल २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास दारूच्या नशेत लोखंडी कोयत्याने व रॉडने मारहाण करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रेखा विजय पालसिंग (वय ४८, व्यवसाय घरकाम) यांच्या दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी ऋषिकेश गोवर्धन साबळे (रा. घोटीमळा, रामलिंग, ता. शिरूर, जि. पुणे) याने जुना वाद पुढे करत दारूच्या नशेत येऊन वाद घालून गंभीर हल्ला केला. त्याच्यासोबत पी.आर. चायनीज सेंटर मधील दोन अनोळखी कामगारही होते.
घटनेच्या वेळी फिर्यादी रेखा सिंग, अर्चना अडसूळ व सोसायटीतील इतर सदस्य जेवणानंतर वॉकिंग करत असताना आरोपी ऋषिकेश याने शिवीगाळ करत मिथुन सिंग याला खाली पाडले. त्यानंतर लोखंडी कोयत्याने हल्ला चढवत मिथुन, जितेंद्र सिंग व योगेश अडसूळ यांना गंभीर मारहाण केली.
या हल्ल्यात फिर्यादीच्या उजव्या हाताला जखम झाली. जितेंद्र सिंग व मिथुन सिंग यांच्या हातपायावर लोखंडी रॉडने व कोयत्याने मारहाण केली गेली. योगेश अडसूळ याच्या पायावर, मानेवर व डोक्यावरही जबर दुखापत करण्यात आली. इतकेच नव्हे तर फिर्यादी रेखा सिंग यांना केस धरून खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व शिवीगाळ दमदाटी केली.
या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम 118(1), 115(2), 352, 351(2)(3), 3(5) सह आर्म्स अॅक्ट कलम 4, 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवा खेडकर करीत आहेत. पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …