
Contents
शिरूर येथे भीषण अपघात: ट्रॅक्टरने कारला जोरदार धडक दिली, सुदैवाने जीवितहानी टळली!
शिरूर (पुणे): (कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरूर येथे भीषण अपघात:दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शिरूर शहरातील बी.जे. कॉर्नर ते पाबळ फाटा रस्त्यावर भीषण अपघात घडला. शिरूर एस.टी. डेपो समोरून जात असलेल्या मारुती ब्रिझा कारला एका ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली.
लोणी येथील एका विवाह समारंभासाठी जात होते–
ललित बाळा शिनलकर (वय २३, रा. रानमळा, लोणी, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, ते व त्यांचे मित्र ऋषिकेश पिसे, सिद्धेश राणे आणि मालोजी निंबाळकर हे सर्वजण लोणी येथील एका विवाह समारंभासाठी जात होते. कार (क्रमांक MH14-JN-7936) मधून प्रवास करत असताना, शिरूर गावातून लोणीकडे जाताना त्यांच्यावर हा अपघात झाला.
कारला जोरदार धडक––
पाठीमागून भरधाव येणाऱ्या अर्जुन कंपनीच्या लाल रंगाच्या ट्रॅक्टर (क्रमांक MH16-CQ-6108) ने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडकेमुळे कारच्या मागच्या भागाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने अपघातात कोणालाही शारीरिक दुखापत झाली नाही.
अपघाताची नोंद शिरूर पोलीस स्टेशन येथे—
या प्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून, चालकाचे नाव व पत्ता अद्याप अज्ञात आहे. अपघाताची नोंद शिरूर पोलीस स्टेशन येथे मोटार अपघात रजिस्टर नंबर ०५/२०२५ अंतर्गत करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार राऊत करीत आहेत.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …