
Contents
शिरूर : नलगेमळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात ९५ वर्षांच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू!
शिरूर : नलगेमळा येथे बिबट्याच्या हल्ल्यात ९५ वर्षांच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू!:शिरूर तालुक्यातील नलगेमळा (ता. शिरूर, जि. पुणे) येथे एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास बिबट्याच्या हल्ल्यात लक्ष्मीबाई बबन भोईटे (वय ९५ वर्षे) यांचा मृत्यू झाला.
घराच्या पेंडवीत झोपल्या होत्या—
प्राथमिक माहितीनुसार, २४ एप्रिलच्या रात्री जेवणानंतर लक्ष्मीबाई भोईटे या घराच्या पेंडवीत झोपल्या होत्या. पहाटे सुमारे ४:४८ वाजता त्यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांच्या मुलाने, शंकर बबन भोईटे यांनी दरवाजा उघडून बाहेर पाहिले असता, एका बिबट्याने त्यांच्या आईच्या गळ्याला पकडून फरफटत ऊसाच्या शेतात नेल्याचे पाहिले. त्यांनी तात्काळ आरडा ओरडा केला, मात्र तोपर्यंत बिबट्या आईला घेऊन निघून गेला होता.
गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम!पण..
राहुल बाळासाहेब नलगे यांना संपर्क करून व गावकऱ्यांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. सकाळी साडेसहाच्या सुमारास लक्ष्मीबाई यांचा मृतदेह सापडला. मात्र मृतदेहाचा केवळ धड मिळाला असून डोके अद्याप सापडलेले नाही.
वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल—
या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह न्हावरा ग्रामीण रुग्णालयात नेला असून पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे अधिकारी हवालदार शिंदे व पोलीस अंमलदार उबाळे करत आहेत.
या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाकडे तातडीने योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …