
Contents
शिरूरमध्ये हातभट्टीच्या दारूचा साठा जप्त; आरोपीला पोलिसांनी अटक
शिरूर (जि. पुणे) : (कल्पना पुंडे यांच्याकडुन )
शिरूरमध्ये हातभट्टीच्या दारूचा साठा जप्त:स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शिरूर तालुक्यातील बाबुराव नगर येथे मोठी कारवाई करत गावठी हातभट्टीच्या दारूचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणात शफीकुल अस्बर अली (वय ३५ वर्षे) या इसमास अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी धाड—
दिनांक २५ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत एका काळ्या रंगाच्या ३५ लिटरच्या कॅनमध्ये सुमारे २५ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली. सदर दारूची किंमत अंदाजे २५०० रुपये असून, प्रति लिटर दर १०० रुपये असा होता.
दारूबंदी अधिनियम १९४९ नुसार गुन्हा दाखल —
फिर्यादी संजू ज्ञानदेव जाधव (वय ३९ वर्षे, पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, पुणे ग्रामीण) यांच्या तक्रारीवरून आरोपी शफीकुल अस्बर अली याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास सुरू —
या कारवाईचा तपास पोलीस हवालदार शिंदे (क्रमांक २४९८) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, प्रभारी अधिकारी म्हणून श्री. संदेश केंजळे (पोलीस निरीक्षक, शिरूर पोलीस स्टेशन) कार्यरत आहेत.
पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा क्रमांक ५७/२५ असून गुन्हा दाखल करण्याची वेळ २५ एप्रिल रोजी रात्री १०.५४ वाजता आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती पुढीलप्रमाणे आहे की, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या सतर्कतेमुळे अवैध दारू विक्रेत्यांवर मोठा धक्का बसला आहे.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …