
Contents
बातमी – शिरूर पोलिसांची कारवाई : दारू विक्री करणाऱ्या इसमावर गुन्हा दाखल
शिरूर, 26 एप्रिल 2025:(प्रकाश करडे यांच्याकडुन)
मांडवगण फराटा (ता. शिरूर, जि. पुणे) येथील हॉटेल ‘रान जत्रा’ मध्ये परवानगीशिवाय देशी व विदेशी दारू विक्री करताना एका इसमावर शिरूर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी मुंबई प्रोव्ही अॅक्ट 65(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हॉटेल रान जत्रा–
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
दिनांक 26 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास फिर्यादी पोलीस शिपाई अजय हरिश्चंद्र पाटील (वय 25 वर्षे, शिरूर पोलीस स्टेशन) यांना माहिती मिळाली की, हॉटेल रान जत्रा येथे एक इसम बेकायदेशीररीत्या दारू विक्री करत आहे.
देशी व विदेशी दारू विक्रीसाठी—
त्यावेळी तपासादरम्यान प्रदीप कुबेर गिरी (वय 40 वर्षे, रा. रामलिंग रोड, शिरूर) हा आपल्या ताब्यात 5110 रुपयांच्या किंमतीची देशी व विदेशी दारू विक्रीसाठी ठेवलेली असल्याचे आढळले. पोलिसांची चाहूल लागताच तो पळून गेला. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जप्त करण्यात आलेली दारू :
• देशी दारू (पॉवर लाईम पंच कंपनी) – 48 बाटल्या (3360 रू)
• विदेशी दारू (इम्प्रियल ब्लू) – 10 बाटल्या (850 रू)
• विदेशी मॅकडॉल रम – 6 बाटल्या (600 रू)
• विदेशी ऑफिसर चॉईस ब्ल्यू – 2 बाटल्या (300 रू)
• एकूण अंदाजे मालमत्ता किंमत सुमारे 5110 रुपये इतकी आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पो.हवा जगताप ब न 25 यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. प्रभारी अधिकारी पो.नि. श्री. संदेश केंजाळे यांच्या देखरेखीखाली ही कारवाई पार पडली.
खास वैचारिक भेट….
काम्ब्रेड शरद पाटील यांच्या प्रेरणेने साकारलेले , जगभर वाचले जाणारे ,’ वैचारिक साप्ताहिक ‘ – ‘ ‘सत्यशोधक मार्क्सवादी’ खास ‘सत्यशोधक न्युज’ च्या वाचकांसाठी वैचारिक भेट ——-
सौजन्यः डॉ.सुभाष गवळी, मावळाई प्रकाशन, शिरुर.
डिजिटल साप्ताहिक सत्यशोधक मार्क्सवादी, अंक ३2 मध्ये काय वाचाल ..👇
• शरद पाटील: जात्यंतक क्रांतीचे सुत्रकार ….
• सवाई शिवाजी …
• दासशुद्रांची गुलामगिरी …
• ‘मावळाई प्रकाशन ची प्रकाशने ..अंक ३२, सत्यशोधक मार्क्सवादी (1) …